रविवार सकाळची वेळ
होती.
तो
हॉलमध्ये पेपर वाचत बसला होता.
ती
नुकतीच अंघोळ करुन बाहेर आली
होती.
“चहा घेणार का तुम्ही?”
असं
म्हणाली.
तो
तिच्याकडं न
पाहताच “हो.”
म्हणाला आणि
पुन्हा पेपर वाचण्यात गढून गेला.
त्याच्याजवळून जाताना तिनं केसांचा नाजूक झटका दिला.
त्यातून उडालेल्या तुषारांनी पेपर मात्र ओला
झाला.
त्यानं उगाचच खट्याळ नजरेने तिच्याकडं पाहिले.
तिनंही मग
खोट्या रागाने तोंड आपले फिरवले.
तो
हळूच उठला खूर्चीवरुन आणि
स्वयंपाक घरात आला.
तिनं त्याच्याकडं बघावं म्हणून फ्रिजवर तबला वाजवू लागला.
तिनं मात्र न
पाहताच चहाचे भांडे ठेवले आणि
त्याला चिडवण्यासाठी आपलं नाक
मुरडलं.
तिच्या त्या पाठमोर्या रुपाकडे पाहत तो
क्षणभर तसाच थांबला.
उगाच तिला मनातून दुखवले म्हणून स्वत:शीच भांडला. हळूच मग मागून जाऊन मग त्याने तिच्या कमरेला विळखा घातला. पण गडबडीत चहाच्या भांड्याला
लागून हात
त्याचा भाजला.
तो
कळवळून हात
झटकताना ती
मात्र मनसोक्त हसली.
चावटपणाची वेडी लहर
मग
त्याच्या मनात उठली.
त्याने तिला मिठीत जखडले.
ती
म्हणाली,
“जाऊ द्या ना?”
तो
म्हणाला,
“तुला माझ्यात सामाऊ दे ना !”
ती
लाजून म्हणाली,
“अहो, असं काय करताय? चहा उकळतोय.”
तो
म्हणाला,
“उकळू दे. इथे माझा जीव जळतोय.”
“अहो, असं काय करताय? दूध उतू जाईल ना?”
तो
परत
म्हणाला,
“कशाला उगीच काळजी करतेस. मी परत आणून देईना ना !”
ती
उगाच कारण देत
होती,
तो
प्रत्येक कारण उडवत होता.
तिला अजून जवळ
घेत
त्याच्या मनासारखं घडवत होता.
शेवटी तिनं कारण दिलं,
“अहो, सिलेंडरचा
बहुतेक वास
येतोय.”
तो
म्हणाला,
“हो का!”
त्याला वाटलं की
त्याचा चावटपणा अती
होतोय.
तेवढ्यात दाराची बेल
वाजली.
त्याने मनातल्या मनात बाहेरच्या व्यक्तीला शिवी घातली.
तिनं झटकन स्वत:ला त्याच्या
तावडीतून सोडवून घेतले आणि
हळूच त्याला धक्का मारला व
स्वयंपाक घराच्या बाहेर ढकलले.
त्याने वैतागून दार उघडले तर समोर कचरावाला दिसला. ह्याचा खांद्याचा शर्ट ओला झालेला होता. तो पाहून कचरावाला गालातल्या गालात हसत होता. त्यानं कचरा देऊन झटकन दार लावून घेतलं. पण मागे वळताच क्षणी काहीतरी विचित्र घडणार आहे असे त्याला वाटत होते. त्याला स्वयंपाक घरातून दूध जळण्याचा वास आला. लगेचच अचानक कान दनानून सोडणारा सिलेंडरचा स्फोट झाला. तो धावत आत गेला. त्याचं आणि तिचं हृदय धडधडत होतं. त्याच्या डोळ्यासमोर तिचं पातळ आगीत फडफडत होतं. त्याचे डोळे झरत होते. त्यानं तिला उचलून घेतलं. तिच्या करपलेल्या चेहऱ्यावरुन त्याचे हात फिरत होते. मोठ्या कष्टाने तिनं डोळे उघडले. त्याला पाहून तिच्या ओठांवर हास्य उमटले. ती त्याला म्हणाली, “एकदा मला तुमच्या मिठीत घ्या ना ! मरण्यापूर्वी मला तुमच्यामध्ये सामाऊ द्या ना.” त्यानं तिला उराशी कवटाळले आणि देवाचे स्मरण करु लागला. ती वाचावी म्हणून त्याची करुणा भाकू लागला. पण दुध उतू गेले होते, ओटा मात्र फेसळला होता. त्या दोघांचं अमर अलिंगन पाहून तिच्या मृत्यू क्षणभर रेंगाळला होता.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा