शनिवार, १० डिसेंबर, २०२२

79. हवाई सुंदरी

     एक हवाई सुंदरी होती. ती दिसायला तर सुंदर होतीच पण त्यापेक्षाही सुंदर तिची आपल्या नवऱ्यावर प्रेम करण्याची पध्दत होती. जेंव्हा जेंव्हा ती बाहेरच्या देशात असे तेंव्हा तेंव्हा ती रोज एक गुलाबाचे फूल आपल्या नवऱ्याला पाठवत असे आणि जाणवून देत असे की मी कुठेही असले तरी मनाने फक्त तुझ्याजवळच आहे. तो दुसरीकडे असताना तिच्या रोज येणाऱ्या गुलाबाच्या फुलाची तिच्या नवऱ्याला आता सुखद सवय झाली होती. पण कदाचित त्या हवाई सुंदरीचे प्रेम देवालाही आवडले असावे म्हणून की काय देवाने तिला आपल्याकडे बोलावून घेतले. तिच्या विमानाचा अपघात झाला आणि बिचारी आपले प्राण गमवून बसली. ही बातमी ऐकून तिचा नवरा एवढा रडला की उभ्या आयुष्यात तो कधी एवढा रडला नसेल किंवा त्याच्याइतके कोणी रडले नसेल.
     पण इथे तिचे प्रेम संपले नव्हते. ते आता सुरु झाले होते. तिच्या दुर्दैवी मृत्यूनंतरही रोज त्याला गुलाबाचे फूल मिळत होते. हे बघून तिचा नवरा आश्चर्यचकित झाला ह्या मागचे कारण शोधण्यासाठी त्याने रोज फूल घेऊन येणाऱ्या मुलास विचारले, तुला हे फूल कोण देतं नक्की. माझी बायको मरुन 15 दिवस झाले तरी तू रोज फूल आणून देत आहेस. नक्की काय प्रकार आहे. मुलगा म्हणाला, साहेब तुमची बायको तुमच्यावर खूप प्रेम करते. तिची विचारसरणी पुढची होती. म्हणून तिनं आधीच विचार करुन ठेवला होता की जर विमानाचा अपघात झाला तर माझे जीवन संपेल पण प्रेमाला कधी संपवायचे नाही.  आणि ह्या विचाराने तिने आधी मला भरपूर पैसे देऊन ठेवले आहेत जेणेकरुन आयुष्यभर ती आता तुम्हाला रोज एक गुलाबाचे फूल देऊ शकेल आणि तिचे नसणेसुध्दा तुम्हाला असण्याची जाणीव करुन देईल.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...