शुक्रवार, १६ डिसेंबर, २०२२

88. व्यवसायाची निवड करताना

           कोणताही व्यवसाय हा लांबून दिसतो तेवढा सोपा तर नाहीच  व अवघड तर अजिबात नाही. फक्त स्वत:ला शोधलं पाहिजे.  नुसते युट्युब च्या यशोगाथा पाहून, लगेच उतावळे होऊ नका. कारण ते यशस्वी का झाले?  त्यांनी किती मेहनत केली? त्यांचं सातत्य काय होतं? हा पहिला अभ्यास करावा. कष्टाशिवाय पर्याय नाही.  आपण त्या पाञतेत बसतो का प्रथम स्वतःला प्रश्न विचारा व उत्तर योग्य आले तरच पुढची पावले ऊचला. यामधे अनेकजनांनी अपुरा अनुभव, खरेदी करताना केलेल्या चुका, मजुरांच्या जिवावर स्वप्न पाहनारे कितीतरी पैशावाले सुद्धा तोट्यात गेलेत म्हनुन आपल्याला घाई न करता प्रथम अनुभव घेवुन शिकायचं आहे. व्यवसायाला विरोध करणारे जगात तर भरपूर आहेच परंतु प्रथम विरोध आपल्या घरातूनच होतो. त्यामुळं जोपर्यंत यशाची किरणे या व्यवसायात दिसत नाही तोपर्यंत घरातल्यांचा सुद्धा आपल्यावर  विश्वास नसतो. तीन वर्षाच्या अग्नीपरिक्षेमधुन जेंव्हा आपन यशस्वी होतो त्यावेळेस माञ आपल्या स्वत:पेक्षा घरात जे प्रथम विरोध करत होते ते तुमच्या पुढे ऐक पाऊल नक्की असतील व तुम्हाला भरपुर साथ देतील. फक्त सुरवातीचे तीन वर्ष फार महत्वपुर्ण असतात हे कळलं पाहिजे. कारण जन्मानंतर पहिले तीन वर्षे प्रत्येकाचे खुप महत्वाचे असतात तिन वर्षात काय अडचनी असतात हे माता पित्यांनाच माहित असते. त्याप्रमाने ह्या व्यवसायात जम बसायला पुर्ण तीन वर्षाचा कालावधी पाहिजे ,जे कुनी झटपट श्रीमंत व्हायचे स्वप्न पाहत असतील त्यांनी यात पडु नये कारण,👇👇👇

दूधाला दुःख दिले की दही बनते.
दह्याला दुखावले की ताक बनते.
ताकाला त्रास दिला तर लोणी बनते.
आणि लोण्याला लोळवले तर तूप बनते.
दुधापेक्षा दही महाग.
दह्यापेक्षा ताक महाग.
ताकापेक्षा लोणी महाग.
लोण्यापेक्षा तूप महाग.
परंतु या सर्वांचा रंग एकच, शुभ्र.
याचाच अर्थ पुन्हा पुन्हा संकटे आणि *दुःख झेलुनही जो माणुस यातुन तिन वर्षे सातत्य ठेवील त्याला परत कोनाच्याही अनुभवाची गरज नाही तो स्वत:दुसर्याला अनुभव देनारा नक्की बनेल 🐏
दूध उपयोगी आहे पण एक दिवसात *नासते*.
दूधाचे विरजण दही दोन दिवस *टिकेल*.
दह्याच्या घुसळलेल्या ताकाचे *दिवस तीन*.
ताकामधले लोणी *आठवडाभर राहील*.
पण लोण्याचे कढवलेले तूप मात्र कधीही *खराब होत नाही*.
          आता बघा आहे की नाही गंमत, एका दिवसातच नासण्याऱ्या दूधात कधीही न नासणारे तूप लपले आहे...!  तसेच आपले मन अथांग आहे. त्यात सकारात्मक विचार घालून नीट मंथन करा...!व नुसता पैसा दिसतो म्हनुन नव्हे तर आवड म्हनुन हा व्यवसाय निवडा नंतर पैसा तर भरपुर मिळेलच 🤝👏हे वास्तव आहे.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...