शुक्रवार, २ डिसेंबर, २०२२

68. 1945 मधील प्रेमकथा

       ही कथा आहे त्या काळातली ज्या काळात मनोरंजनासाठी टी.व्ही. वैगरे नव्हता. त्यावेळी फक्त होता रेडिओ. रेडिओवर लागणारे कार्यक्रम खूपच लोकप्रिय होत असत. त्या काळात एखाद्या घरात रेडिओ असणं म्हणजे श्रीमंताचं लक्षण मानलं जायचं. गौरी ही अशाच  एका मध्यमवर्गीय घरातील मुलगी होती. जिचं वय सतराच्या आसपास आहे. ती एका खेड्यातील मुलगी आहे. हे साल होतं 1945. त्यांच्या घरात एक छोटासा रेडिओ आहे. त्यावर लागणारे कार्यक्रम गौरीला आवडायचे. पण त्यापैकी सकाळी सात वाजता लागणारा कार्यक्रम तिला खूप आवडायचा. कारण सिनेमातली गाणी त्यावर लावली जायचीच, पण कार्यक्रमाच्या शेवटी याचा सूत्रधार ज्याला पार्थ या टोपन नावाने सगळे ओळखायचे तो गाणे म्हणायचा. त्याचा आवाज इतका सुंदर होता की गौरी फक्त त्याचेच गाणे ऐकण्यासाठी तो कार्यक्रम ऐकायची. तो कार्यक्रम लागला की सर्व काम सोडून ती तो ऐकायची. त्याचा गोड आवाज ऐकल्याशिवाय तिला चैनच पडायचं नाही. तिची आई तर खूप ओरडायची तिच्या नावाने. आणि एक दिवस याच कार्यक्रमाच्या सुरवातीला घोषणा झाली की मित्रांनो आज ह्या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसिध्द होतोय. त्यामुळे आज मी गाणारं गाणं कदाचित तुम्ही माझ्या तोंडून ऐकणार शेवटचं गाणं असेल.  हे ऐकताच गौरीची खूप निराशा झाली. तिच्या डोळ्यातून पाणी आलं. कारण त्याच्या आवाजापलीकडे जाऊन तिचं त्याच्यावर प्रेम जमलं होतं जे तिला कधी कळालंच नाही. आणि हेच प्रेम तिच्या अश्रूरुपी डोळ्यातून वाहत होतं. त्याचा आवाज ऐकायला मिळत नसल्याने ती खूपच उदास दु:खी व्हायची.
    एक दिवस राहून त्याला भेटण्यासाठी ती पुण्याला गेली. त्या रेडिओच्या कार्यालयात गेली खरं पण्त्या लोकांनासुध्दा त्याच्या पार्थ ह्या टोपन नावाशिवाय काहीही माहिती नव्हतं. तिची निराशा झाली. ती जेंव्हा घरी परत आली तेंव्हा तिचे आई-वडील खूपच चिडले होते. आपली मुलगी दोन दिवस झाले हरवली आहे अशी त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. ती परत आल्यावर तिच्या आईने तिला खूपच मारले. तिच्या आई-वडीलांनी पुण्यातल्याच एका चांगल्या कुटुंबात तिच्या मनाविरुध्द तिचं लग्न लावून दिलं. त्या दोघांच्यात आठ वर्षाच अंतर होतं. मुलगा एकदम साधा होता पण हुशार होता. लग्नानंतर ती त्याला कधीही स्वत:ला हात लावू द्यायची नाही आणि त्यानेही तिच्यावर तशा प्रकारची जबरदस्ती केली नाही. त्या एकमेकांचे संवाद जेवढ्यास तेवढेच असायचे. तू असे का करतेस असं एकाही शब्दानं त्यानं तिला कधीच  विचारलं नाही. त्यांचं नातं म्हणजे दोघांसाठी केवळ औपचारितकताच होती. कधी कधी तर ते बोलायचेच नाही. तो तिची खूप काळजी घ्यायचा. तिला कसलाही त्रास होऊ नये म्हणून विचारपूस करायचा. ती जेवढ्यास तेवढी उत्तरे द्यायची. एक दिवस काही कामानिमित्त तो मुंबईला गेला होता. पण दोनचं दिवसांत त्याचा अपघात झाल्याची बातमी तिच्या कानावर आली. तिचे सासू सासरे आई-वडील तडख मुंबईला निघाले. जेंव्हा त्यांनी त्याला पाहिले तेंव्हा त्याचे आईवडील खूप रडले. कारण त्याचा शव पाहण्यासाठी काही उरलंच नव्हतं. त्याने घेतलेल्या काळजीपोटी का होईना तिच्या डोळ्यातूनही दोन थेंब पाणी आलं. काही वर्षे अशीच निघून जातात.
      गौरीला तिच्या नवऱ्याची जरासुध्दा आठवण येत नाही. पण पार्थच्या त्या गोड गाण्यांची आठवण अजूनही तिच्या मनात भरलेली आहे. ती तिच्या भूतकाळातच गुरफटून बसलीय. कदाचित तिलाच त्यातून बाहेर यायचं नाहीये. पन्नास वर्षानंतर तिचे सासू-सासरे मध्यंतरी नियतीच्या नियमानुसार वय झाल्यामुळे देवाघरी निघून गेले. ती आपल्या सुरकूत्या पडलेल्या हातांनी जेंव्हा घराची साफसफाई करत असते तेंव्हा तिच्या नवऱ्याच्या व्ययक्तीक कपाटाचा तळाशी  तिला काही कागदपत्रे सापडतात. ते पाहून तर ती बेशुध्दच पडली. तिला जेंव्हा शुध्द आली तेंव्हा ती हॉस्पीटलच्या बेडवर पडलेली होती. तिला सलाईन लावण्यात आलं होतं. तिच्या शेजाऱ्यांनी तिला तिथं आणलेलं असतं. त्या कागदपत्रातील एक कागद तिने तिच्या हातात तसाच घट्ट पकडलेला असतो. तो कागद दुसरं तिसरं काही नसून पार्थला त्याच्या शेवटच्या दिवशी रेडिओ ऑफिसमधून मिळालेलं प्रमाणपत्र असतं आणि त्यावर तिच्याच नवऱ्याचा ब्लॅक ॲन्ड व्हाईट फोटो चिकटवलेला असतो. त्याच्याकडे बघून ती पुन्हा पुन्हा रडत असते. ज्याच्यावर आपण आयुष्यभर डोळे मिटून प्रचंड प्रेम केले तो तिचा सख्खा नवरा होता. पण प्रत्यक्षात कधीही माझ्या प्रेमाचा वाटेकरी होऊ दिलं नाही. याचीच खंत तिला मरणापर्यंत राहिली.
      माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, प्रेम ज्याच्या त्याच्याजवळ असतं. त्याला ओळखून त्याच्यावर प्रेम करा. नाहीतर आयुष्यभर शेवटी हॉस्पीटलमधल्या पलंगावर पडलेलं असताना तुम्ही जगलेल्या आयुष्याची जेंव्हा गोळाबेरीज करत असाल, तेंव्हाच तुम्हाला कळेल की सुख फक्त एका पावलावरच होतं पण ते पाऊलही टाकण्याची हिंमत मी दाखविली नाही आणि जन्मभर दु:खाला कवटाळून बसलो. या कथेतून मला तुम्हाला काय सांगायचं आहे ते काळजीपूर्वक समजावून घ्या.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...