आज पहाट जरा
मस्तच भासत होती.
त्यालाही जराशी धुंदी चढलेली होती.
बाहेर पाऊस रिमझिम पडत
होता.
वाराही कुंद जाहला होता.
तो
आज
खूप
खूश
होता.
अगदी मनातून भारला होता.
कारणही तसंच होतं.
आज
त्याच्या आणि
तिच्या लग्नाला एक
वर्ष झालं होतं.
ती
तर
त्याहूनही खूश
होती.
अगदी मनाच्या हिंदोळ्यावर झोके घेत
होती.
लग्नाला एक
वर्ष झालंच तर
होतं पण
ती
त्याला आज
एक
गुड
न्यूज देणार होती.
सकाळी नाष्टा चालला होता.तिने आज मोगरा माळला होता आणि सुगंधही मंद दरवळत होता. तिने आज त्याचे आवडते बटाटे पोहे केले होते. तोही प्रत्येक
घासावर डोळे मिटकावून तिला दाद
देत
होता.
त्याच्या आईलाही हे
कळलं होतं.
ती
पण
मुद्दाम लगेच खाकरुन त्यांचा नजरभंग करत
होती.
आणि
तो
अगदीच प्रेमाने तिच्या हातावर मध्येच एखादी थाप
मारत होता.
संध्याकाळी आईकडून त्याने खास
परवानगी घेतली होती.
आईने अगदी हसून ती
दिली होती.
संध्याकाळच्या शो
ची
दोन
तिकिटे काढली.
मग
घरी
तिघांचा डिनर असा
मस्त बेत
ठरला होता.
दोघेही भलतेच खूश
होते.
आई-देखील त्यात सामील झाली होती… दृष्ट लागू नये असा त्याचा संसार होता. संसाराचं
काय,
त्याला कधी-कधी प्रेमाचे
दृष्ट लागते.
त्याने पैसे वाचवून हफत्याने तिच्यासाठी स्कूटी बुक
केली होती.
तिला ऑफिसला जायला गर्दीत त्रास होता.
तीही काही कमी
नव्हती.
पाच
महिने पैसे वाचवून एक
हिऱ्याची अंगठी घेतली होती.
जणू
संध्याकाळी ती
घेऊन एका
हिऱ्यावर दुसऱ्या हिऱ्याचा कळस
चढवणार होती.
ऑफिसमधून संध्याकाळी एकमेकांना फोन
केले.
तिने त्याला त्यांच्या सोनाराच्या दुकानासमोर भेटायला बोलवले.
त्याला कळून चुकलं होतं की
काहीतरी महागडी वस्तू मिळणार.
तो
ही
नवीन कोरी करकरीत स्कूटी घेऊन तिला भेटायला निघाला होता.
तो
तिथे पोहचला.
त्याने स्कूटी लावून तेथे पार्क केली.
म्हटलं “सरप्राईज” देईन. पण ती त्याच्या
आधीच तेथे पोहोचली होती.
आणि
हिऱ्याची सुरेख अंगठी आपल्या हाती लपवलेली होती.
तो
क्षण आला.
दोघांची नजरानजर झाली.
त्याने तिला दुरुनच हात
केला.
तिनेही त्याला हालवून प्रतिसाद दिला.
दोघे एक-एक पाऊल पुढे सरकू लागले. ती तर दोन-दोन पावले उडी मारुन चालत होती. तो आपल्या नेहमीच्या
हास्यात तिच्यावरची नजर
ढळू देत नव्हता. दोघांच्याही मनात एक पूर्ण वर्ष तरळत होतं. आयुष्यभराची साथ हेच फक्त दिसत होतं. ती पुढे आली. दोघांमध्ये फक्त वीस-एक पाऊलेच राहिली. ती वीस पावले पण आज कोसभर वाटत होती.
पण अचानक तो मटकन खाली बसला. काय होतय हेच त्याला कळत नव्हतं. त्याच्या कानाचे पडदे फाटले होते? नाही नाही धरणीकंपच झाला होता की आभाळ फाटलं, वीज पडली. त्याला काही उमजत नव्हते. नाही नाही हा तर बॉम्बस्फोट होता. क्षणाभरात तो भानावर आला. सगळीकडे फक्त धूर, कल्लोळ, आगीचे लोट आणि अस्ताव्यस्त भंग झालेली माणसे. त्याला तिची “ती” कुठेच दिसत नव्हती. त्याची भिरलेली नरज फक्त तिलाच शोधत होती. आणि त्याला ती दिसली. तीच होती का? साडी फाटलेली, अंग रक्ताने माखलेलं. तिचं पूर्ण सौंदर्य रक्ताने माखलेलं होतं. अंग-अंग छिन्न-विछिन्न झालेलं होतं. तो धावला, जीवाच्या आकांताने धावला. त्यानं तिचं डोकं मांडीवर घेतलं. तिला जोरजोरात हाक मारली. अजून थोडी आशा दिसत होती. तिने डोळे उघडले. त्याचे अश्रू तिच्या गालावर पडत होते. तेच अश्रू तिचा अबोल चेहरा दाखवत रक्त बाजूला सारत होते. तो काही बोलणार इतक्यात तिनं मुठ उघडली आणि ती हिऱ्याची अंगठी जणू काही खुलून हसली. त्याला काही बोलावं काहीच सुचत नव्हतं. तिच्या मुठीत ती चमकदार अंगठी लकाकत होती. जणू घे मला बाहूपाशात खुणावत होती. तो रडत होता. थांब थांब म्हणत होता. पण तिच्या डोळ्यातून अश्रू येत नव्हते. तिच्या चेहऱ्यावर होतं ते फक्त हलकसं स्मित. कदाचित मरणापर्यंत साथ का हीच? तिने ती अंगठी हळूच त्याच्या हातावर ठेवली. त्याने तिचा हात घट्ट धरला होता. हळूच तिची मूठ बंद झाली. “काळजी घे” एवढेच म्हणून तिचे नाजूक ओठ बंद झाले पण तिच्या चेहऱ्यावरचं ते जीवघेण “स्माईल” आजही तसंच होतं...तसंच होतं...

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा