हे लग्न झालेल्यांनी,
न
झालेल्यांनी आणि लग्न होणार असलेल्यांनी नक्कीच वाचा. विचार करा.
एका रात्री मी घरी आलो ते मनाशी काही ठरवूनच. जेवताना मी तिचा हातात हात घेतला आणि म्हणालो, “
मला
तुझ्याशी काही बोलायचं आहे.”
तिच्या डोळ्यात वेदना उमटली.
तरीही ती
शांतपणे जेवत होती.
सगळे शब्द जुळवून मी
तिला सांगितलं,”मला घटस्फोट हवाय.”
तिनं शांतपणे विचारलं,
“का?”
तिचा प्रश्न मी
टाळला.
ती
भडकली.
समोरचं ताट
तिनं फिरकावून दिलं.
लग्न मोडायला काय
कारण आहे
हे
तिला जाणून घ्यायचं होतं.
पण
माझं मन
दुसऱ्या स्त्रीवर आलयं हे
मी
तिला स्पष्टपणे सांगू शकत
नव्हतो.
माझा बँक
बॅलन्स,
कार,
घर
सगळं मी
तिला देऊ
केले.
पण
मी
समोर केलेल्या घटस्फोटाच्या कागदाचे तिने तुकडे केले.
दुसऱ्या दिवशी तिने माझ्यासमोर
घटस्फोटाविषयीच्या अटीचा कागद समोर केला.
तिला माझ्याकडून काहीही नको
होते.
फक्त एका
महिन्याची नोटीस हवी
होती आणि
या
एका
महिन्यात दोघांनीही नॉर्मल रहावं अशी
तिची इच्छा होती.
तिची कारणे साधी होती.
महिन्याभरात आमच्या मुलाची परीक्षा होती आणि
त्याच्यावर काहीही परिणाम व्हायला नको
होता.
तिची आणखी एक
अट
होती.
लग्नाच्या दिवशी मी
तिला कसं
बेडरुमपर्यंत उचलून नेलं होतं त्याप्रमाणे रोज
महिनाभर तिला न्यायचं होतं तशी
तिची अटच
होती.
मला
वाटलं तिला वेड
लागलय,
पण
महिना व्यवस्थित जावा यासाठी मी
तिची अट
मान्य केली.
घटस्फोटाच्या
विचारामुळे अनेक दिवस माझ्या पत्नीसोबतचा संपर्कच झालेला नव्हता.
त्यामुळे पहिल्या दिवशी बेडरुमपर्यंत नेताना आम्ही फार
अवघडून गेलो.
मी
तिचा हात
धरुन बेडरुमपर्यंत नेताना माझ्या मुलाने बघितलं आणि
त्याला फार
आनंद झाला.
दुसऱ्या दिवशी ती
माझ्या छातीला टेकून होती.
आपण
आपल्या बायकोकडे बरेच दिवस बघितलेच नाही हे
मला
जाणवलं आणि
तिचा सहवास मला
अचानक हवाहवासा वाटू लागला.
आपण
हिच्या बाबतीत असा
अचानक निर्णय का
घेतोय,
असा
प्रश्न पडला.
त्यानंतर प्रत्येक दिवस तिला उचलून किंवा सोबत बेडरुमपर्यंत नेताना आमच्यातली एक
हवीहवीशी जवळीक वाढत असल्याचं मला
जाणवलं.
रोजच्याप्रमाणे तिला उचलताना मला
अचानक जाणवलं की
तिचं वजन
कमी
झालयं.
हृदयातल्या वेदनांचा हा
परिणाम होता.
मी
आस्थेने तिच्या कपाळाला स्पर्श केला.
दिवसेंदिवस तिचं कमी
होणारं वजन
माझी काळजी वाढवत होतं.
पण
तिच्या अटीच पालन करताना मला
आंतरिक समाधान मिळत होतं.
आमच्यात काय
घडतय याची कल्पना नसतानाही आमचा मुलगा खूप
खूश
होता.
आमच्यात दुरावा निर्माण झाला होता कारण आमच्यातली जवळीकच संपली होती जी
परत
आयुष्यात येत
होती.
महिन्याच्या
शेवटच्या दिवशी मी
मनाशी निर्णय घेतला.
माझ्या प्रियसीच्या घरी
आलो
आणि
मी
माझ्या पत्नीला घटस्फोट देऊ
शकत
नसल्याचं स्पष्ट सांगितलं.
ती
चिडली,
संतापली.
पण
मला
आता
काहीही ऐकायचं नव्हतं.
माझ्या प्रिय पत्नीचा हात
मला
आता
मरेपर्यंत सोडायचा नव्हता.
मी
वेगाने कार
चालवत घरी
आलो.
माझ्या चेहऱ्यावर हसू
होतं.
हातात फुलांचा गुच्छ होता.
मी
बेडरुममध्ये पोहचलो तर……
माझी प्रिय पत्नी बेडवर निष्प्राण पडलेली होती.
मुलाला जवळ
घेऊन मी
अनावर रडत
सुटलो.
माझ्या प्रेमापायी तिने जीव
दिला होता.
ती
असताना मी
जे
करायला हवं
होतं ते
केलं नाही.
जे
प्रेम,
जी
जवळीक तिला हवी
होती ती
मी
तिला दिली नाही.
आता
माझे अश्रू तिला परत
आणू
शकत
नव्हते.
पती-पत्नीच्या
नात्यात कार, बंगला, प्रेयसी, जितके महत्वाचे आहे तितकेच महत्वाचे आहे ते प्रेम, जवळीक आणि विश्वास.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा