सोमवार, १२ डिसेंबर, २०२२

83. प्रेम हे असंच असतं

             जेंव्हा मी पंधरा आणि तू अकरा वर्षाची होतीस तेंव्हा मी म्हणालो, माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू विचारलेस, ते काय असतं? …… आठवतयं??????...... मी  पंचवीसाव्या वर्षी तुला म्हणालो, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू म्हणालीस, मला एकटं तर नाही ना सोडणार?...... आणि अलगद माझ्या मिठीत विरघळलीस…!!!  पस्तीसाव्या वर्षी जेंव्हा मी रात्री उशीरा घरी आलो तू आणि मी सोबतच रात्रीचे जेवण केले. मी तुला जवळ ओढून म्हणालो, आय लव यू. तेंव्हा तू म्हणालीस, मला ते माहित आहे. पण सकाळी लवकर मुलांचा पेपर आहे. उशीर नको व्हायला आता जास्त. झोपूयात लवकर…… माझ्या पन्नासाव्या वाढदिवशी सगळे पार्टीत गुंग असताना मी हळूच म्हणालो, माझे तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. तू हसत-हसत म्हणालीस, माहीत आहे, अगदी वीस वर्षे अगोदर माहीत आहे. आणि पुन्हा तुझ्या विश्वात रंगून गेलीस. तेंव्हा मी साठ वर्षांचा झालो होतो. आपल्या मुलांच्या लग्नात तू घातलेली पैठणी पाहून मी म्हणालो, छान दिसतेस. आणि अलगद तुला जवळ करुन म्हणालो, तू मला खूप आवडतेस आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू मला बाजूला सारत म्हणालीस, ते ठीक आहे हो. पण मुलांच्या लग्नाची तयारी सगळी व्यवस्थित झाली आहे ना? मी आता पंच्याहत्तर वर्षांचा झालो. आराम खुर्चीवर बसून आपला जुना फोटोंचा अलबम बघत होतो. तू स्वेटर वीणत होतीस नातवांसाठी. मी म्हणालो, माझं तुझ्यावर अजूनही तितकंच प्रेम आहे ! आणि तू म्हणालीस, माझं तुझ्यावर तितकंच प्रेम आहे जितकं तुला होकार देताना होतं. माझ्या हातातील तो आठवणींचा साठा असलेला अल्बम पूर्ण भिजून गेला. डोळ्यांतून पडणारे थेंब अनावर होत होते. कारण आज इतक्या वर्षांनी तू स्वत: म्हणाली होतीस, तू सुध्दा माझ्यावर प्रेम करतेस म्हणून……!
      फक्त प्रेम पुरेसे नसते. कारण तुमच्यार प्रेम करणाऱ्या व्यक्तीला काहीच नको असतं. त्याला ओढ असते ती फक्त ते शब्द ऐकायची जे सांगतात, होमाझं पण तितकंच प्रेम आहे तुझ्यावर जितकं तुझं माझ्यावर आहे. म्हणून जेंव्हा पण संधी मिळेल सांगायला चुकवू नका. तुम्ही सुध्दा प्रेम करतात ते. आपण कोणी प्रियकर अथवा प्रियसी असणे म्हणजेच प्रेम नसते. रोज आय लव्ह यू म्हणणे म्हणजेच प्रेम नसते. तर आपल्या आयुष्यात कोणीतरी अशी व्यक्ती असणे ज्याच्यावर/जिच्यावर आपला इतका विश्वास असणे की तुम्ही त्यांना कितीही दूर केलेत त्यांचे मन कितीही दुखावलेत तरी देखील तुमची साथ ते सोडणार नाहीत. ते केवळ तुमचेच होते, तुमचेच आहेत आणि तुमचचे राहतील. हाच एक विश्वास ज्या व्यक्तीबद्दल वाटतो तेच आहेत तुमचे खरे सोबती. हेच खरे प्रेम आहे.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...