शनिवार, ३ डिसेंबर, २०२२

69. नातं थोडं आगळं वेगळं

         दुपारची वेळएकदम सरळ रस्तारस्त्यावर कुणी चिटपाखरुसुध्दा नव्हते आणि आकाशातहीसूर्य अगदी डोक्यावर आलेला आणि असं वाटत होत की सूर्यदेव कुणाचातरी राग या धरणीमातीवर काढत आहे. अशवेळी देखील ते दोघ हसत हसत चालले होते. मृणाली आणि विजयदोघेही बारावी सायन्सला होते. एकाच कॉलेजमध्ये ! आणि दोघांचाही घरी जायचा हाच वेळ होता. रोजचाच! अन् अचानक आभाळात काळे ढग दाटले. हवेमध्ये अचानक गारवा दाटला. मघापासून स्तब्ध असणारी झाडे वाऱ्यासोबत नाचू लागली अन् पाखरे घरट्यानपाशी परतू लागलीविजय म्हणाला, मृणाली, चल ना लवकर ! आभाळ भरुन आलयं बघ तुझ्यामुळं मला भिजावं लागणार वाटत.  मृणाली म्हणाली, शी बाबातू पण नाअरसिकच आहेस मुळीमस्त पहिल्या पावसात भिजायचं!... धरणीचा आणि आभाळाच्या पहिल्या प्रेमसंगमाचे अविस्मरणीय दृश्य डोळ्यात साठवायचं. पाखरांचा आणि झाडांचा आनंद बघायचा अन् मग… ! विजय म्हणाला, पुरे पुरे कवयित्रीतू सायन्सला उगीच आलीस. तू आर्ट्सला पाहिजे होतीस. तिथेच कविता करत बसली असतीस आणि हो माझ्यावर ओझ तरी पडलं नसतं ना  मृणाली म्हणाली, हम्म्म्ममाहिती आहे हं मला तू मोठा शास्त्रज्ञ होणार आहेस तेआणि मी ओझ काय?... मग तू मोठा दगड…!  जा मी बोलणारच नाही आता.  त्या दोघांचं भांडण पेटणार एवढ्यात दोन तीन थेंब त्यांच्या अंगावर पडले. त्यांनी आभाळाकडं बघितलं आणि दोघांच्याही चेहऱ्यावर हास् उमटलं आणि त्यानंतर एकामागून एक पावसाच्या सरी बरसू लागल्या. अगदी बेधुंद होऊनतिच्या आनंदाला पाराच उरला नव्हता. ती आनंदाने बेभान होऊन नाचत होती आणि तो तिच्याकडे बघत होतानिरागसपणेअशाच भिजलेल्या अवतारात ती घरी पोहचली. मृणाली आईला म्हणाली, आई, बघ नाबाहेर मस्त पाऊस पडतोय, मस्त गरम गरम कांदा भजी करुन करुन दे ! आई  म्हणाली, एवढा उशरी कसा झाला गं? बसली असशील त्या विजयसोबत हुंदडत. तू काय आता लहान आहेस का ? तुला कळतं की नाही मुलींनी कसं वागलं पाहिजं ते? लोक काय म्हणतात माहित आहे का तुला? मृणाली म्हणाली, अगं पणतो माझा चांगला मित्र आहेआणि होफक्त मित्रच आहे हं… ! आई म्हणाली, ते काही नाही हंतुला तो एकटाच सापडतो. इतक्या मैत्रिणी आहेत. येत जा त्यांच्यासोबत. मृणाली म्हणते, अगं आई पण आई म्हणते, पण बीन काही नाहीआणि हो आजपासून तू त्याच्यापासून जरा लांबच राहत जा. पुरे झाली नाटकं मृणालीच्या डोळ्यात अचानक पूर आला. तिला कळून चुकलं की आज येताना शेजारच्या काकूंनी पाहिलेलं. त्यांनीच चुगली केली असणारकाय मिळालं असं करुन त्यांना देव जाणे. त्यांनीच आमच्या निखळ मैत्रीला प्रेमाच लेबल लावल असणार !

             मृणाली आणि विजय ही केवळ नावं होती. आपल्यापैकी कितीतरी जणांनी याचा स्वअनुभव घेतला असेल. मी खात्री देऊन सांगतो की या लेखाची सुरवात वाचताना. तुमच्यापैकी नव्यान्नव टक्के लोकांना असं वाटलं असणार की विजय आणि मृणाली कपल (प्रेम करणारी जोडी) आहे. बरोबर?... खरंतर आपल्या समाजाची विचारसरणी तशी झाली आहे की एक मुलगा आणि एक मुलगी मित्र-मैत्रीण राहू शकत नाही. समाजाला वाटतं की त्यांचं लफडंच चालू आहे. आज आपल्या सख्या बहिणीला गाडीवरुन मध्ये सोडलं की तरी लोक म्हणणार, तिचा बॉयफ्रेंड तिला आज सोडायला आलेला…! शी…… हीच का ती आपली प्राचीनप्रगल्भसुसंस्कृत भारतीय संस्कृती? आज एखादा मुलगा फोनवर आपल्या आईशी जास्त वेळ बोलला तर मित्र लगेच म्हणणार, हम्म्मकाय म्हणत होत्या वहिनी? आणि डायल केलेल्या नंबरमध्ये आईचं नाव दाखवलं तर म्हणणार, साल्याभारी आयडिया आहे राव. गर्लफ्रेंडचा नंबर आपल्या आईचा नावानं सेव करायचा. असा आपला समाज.

             एका मुलामध्ये आणि एका मुलीमध्ये नेहमी प्रेमच असलं पाहिजं का? यांच्यात मैत्री असू शकत नाही का? खरतरं निसर्गनियमानुसार  मुलगा आणि  मुलगी एकमेकांच्या भावना व्यवस्थित समजून घेऊ शकतात. कारण भिन्न लिंगामध्ये एकमेकांविषयी मत्थर आणि लोभ कधीच नसतो. त्यांचं नातं सहसा निस्वार्थी असतं. मैत्री आणि प्रेम यांच्यात पुसटशी सीमारेषा असते. (ती रेषा म्हणजे शरीरसंबंध जो मैत्रीमध्ये नसतो पण प्रेमामध्ये असतो.) मुलाने आणि मुलीने जर ती सीमारेषा पाळली तर त्यांचं नातं जगातील सर्वोत्तम नातं बनतं. प्रेम खूप सुंदर असतं पण मैत्री त्याहूनही अधिक सुंदर असते. प्रेमामध्ये अपेक्षा असतात तर मैत्री ही निखळ असते. कधी कधी प्रेमाला वासनेचा गंध असतो तर मैत्री वासनेपासून अलिप्त असते. प्रेमामध्ये तडजोड असते तर मैत्रीमध्ये सामंजस्य असते. दोन मुलांमध्ये अथवा दोन मुलींमध्ये होणाऱ्या मैत्रीपेक्षा एक मुलगा आणि एक मुलगी मध्ये असणारी मैत्री अधिक घट्ट आणि विश्वासार्थ असते. पण अशी मैत्री करताना मुलानं आणि मुलीनं समाजाचं भान ठेवणं तितकचं गरजेचं आहे. कारण शेवटी आपल्याला या समाजातच राहायचं आहे आणि संपूर्ण जमिनीला कातडं पांघरण्यापेक्षा स्वत:च्या पायात चप्पल घालणे कधीही योग्य ! बरोबर ना?


लेखक -अनिकेत दिलीप धालवलक.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...