त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते.
त्याचे जरा
जास्तच.
तिच्यासाठी काय
करु
आणि
काय
नको
असे
त्याला झालेले.
पण
त्याचा खिसा कायम फाटलेला.
गरीब होता बिचारा.
पण
भलताच रोमँटिक.
तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे.
तिला काहीतरी भेटवस्तू द्यावी असे
त्याला मनापासून वाटत होते.
पण
द्यायचे काय?
खिशात तर
एक
पैसा नाही.
शेवटी न
राहवून त्याने तिला रंगीत फुलांचा गुच्छ भेट
म्हणून दिला.
ती
खूश
होती.
तशीही तिची त्याच्याकडून फार
मोठी अपेक्षा नव्हती.
तो
जे
देत
होता त्यात ती
समाधानीच होती.
तसाही तो
सामान्यच होता.
जेमतेम नोकरी.
भविष्यात काही करुन दाखवेल असे
पण
काही त्याच्यात दिसत नव्हते.
पण
एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले ते
दोन
जीव
सुखात होते.
पण एक दिवस अचानक सगळे काही बदलले. ती म्हणाली, “तुझ्याबरोबर आयुष्य जगायचे म्हणजे नेहमी असे रडत-खडत. मन मारतच जगावे लागेल. काय सुखात ठेवणार तू मला? काय आहे तुझ्याकडे? तर काहीच नाही. मी परदेशी चालले आहे. पुन्हा कधीच येणार नाही. तू मला विसर. आजपासून आपले मार्ग निराळे. माझा तुझा संबंध इथेच संपला.”
ती कायमची निघून गेली. हो मोडून पडला. संपलेच जणू काही. सर्व काही संपले त्याच्यासाठी. दिवस सरले आणि याच्या मनातली दु:खाची लाट ओसरुन संतापाच्या लाह्या तडतडायला लागल्या. त्याने ठरवले, तिने पैशासाठी आपल्याला सोडले ना? मग आता पैसा कमवूनच दाखवायचा. इतका की आपल्यापुढे सारे जग तिला थिट दिसले पाहिजे.
पुढे या जिद्दीने
पेटून उठला तो.
झोकून दिले स्वत:ला, कष्ट केले. राब-राब राबला. मित्रांनी
मदत
केली.
चांगले लोक
भेटले.
त्याचे दिवस पालटले.
तो
खूप
श्रीमंत झाला.
स्वत:ची कंपनी उभारली. पैसा, नोकर चाकर, गाड्या, मान-सन्मान सगळे कमवले. विरहाच्या
आगीतून,
प्रेमभंगाच्या अपमानास्पद दु:खातून तो बाहेर पडला. उभा राहिला. जगण्यासाठी
धडपडला आणि
यशस्वीही झाला.
पण
तरीही त्याच्या मनात चुटपुट कायमच होती.
ती
सोडून गेल्याची,
तिने नाकारल्याची.
आपल्या गरीबीचा अपमान केल्याची.
तिच्यावरची प्रेमाची जागा आता
तिरस्काराने घेतली होती.
एक दिवस तो त्याच्या
आलिशान गाडीतून जात
होता.
बाहेर मुसळधार पाऊस पडत
होता.
गाडीच्या काचेतून बाहेर पाहतो तर
म्हातारे जोडपे एका
छत्रीखाली कुडकुडत उभे
होते.
भिजलेल्या त्या दोघांना पाऊल उचलणे अवघड झाले होते.
त्याने गाडी थांबवली आणि
नीट
पाहिले.
हे
तिचेच आई-वडील. त्याने त्यांच्याजवळ
गाडी थांबवली.
त्यांना गाडीत बसण्याचा आग्रह करावा असे
त्याला वाटत होते.
त्याचा मनातील सूडाची आग
जागी झाली होती.
त्यांनी आपली श्रीमंती पहावी,
त्यांनी आपली गाडी पहावी.
आपली प्रगती पाहून त्यांच्या लेकीने जे
काही केले त्याचा पश्चाताप व्हावा…
असे
त्याला मनोमन वाटत होते.
तिला धडा
शिकविण्याचा,
अपमानाच्या घावांची परत
फेड
करण्याच्या एका
वळणावर आपण
आलो
आहोत.
ते
दोघे मात्र स्मशानभूमीकडे थकल्या खांद्याने चालतच राहतात.
हा
गाडीतून उतरुन त्यांच्या मागे जातो. पाहतो आणि कोसळतो. तिचाच फोटो - तसाच चेहरा आणि कबरीजवळ ठेवलेली त्याने कागदांची फुलं… हा सुन्न झाला. धावत गेला कबरीकडे तिच्या आईवडीलांना विचारलं काय झाले ते सांगा.
ते म्हणाले, “ती परदेशी कधीच गेली नव्हती. तिला कर्करोग झाला होता. तो झाल्याच जेंव्हा तिला कळलं तेंव्हा थोडे दिवस होते. आपल्या अकाली जाण्याचं दु:ख तुझ्या वाट्याला येऊ म्हणून प्रेम भंगाचा चटका देऊन ती गेली. तू संतापून उभा राहशील… जगशील… यावर तिचा विश्वास होता. म्हणून तिनं तुला सोडून जाण्याचं नाटक केलं. ती गेली आणि तू जगलास. ”
पण एक दिवस अचानक सगळे काही बदलले. ती म्हणाली, “तुझ्याबरोबर आयुष्य जगायचे म्हणजे नेहमी असे रडत-खडत. मन मारतच जगावे लागेल. काय सुखात ठेवणार तू मला? काय आहे तुझ्याकडे? तर काहीच नाही. मी परदेशी चालले आहे. पुन्हा कधीच येणार नाही. तू मला विसर. आजपासून आपले मार्ग निराळे. माझा तुझा संबंध इथेच संपला.”
ती कायमची निघून गेली. हो मोडून पडला. संपलेच जणू काही. सर्व काही संपले त्याच्यासाठी. दिवस सरले आणि याच्या मनातली दु:खाची लाट ओसरुन संतापाच्या लाह्या तडतडायला लागल्या. त्याने ठरवले, तिने पैशासाठी आपल्याला सोडले ना? मग आता पैसा कमवूनच दाखवायचा. इतका की आपल्यापुढे सारे जग तिला थिट दिसले पाहिजे.
ते म्हणाले, “ती परदेशी कधीच गेली नव्हती. तिला कर्करोग झाला होता. तो झाल्याच जेंव्हा तिला कळलं तेंव्हा थोडे दिवस होते. आपल्या अकाली जाण्याचं दु:ख तुझ्या वाट्याला येऊ म्हणून प्रेम भंगाचा चटका देऊन ती गेली. तू संतापून उभा राहशील… जगशील… यावर तिचा विश्वास होता. म्हणून तिनं तुला सोडून जाण्याचं नाटक केलं. ती गेली आणि तू जगलास. ”
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा