एक माळ लावू आईच्या नावाने,
जी नऊ महिने पोटात सांभाळी...!
एक माळ लावू पत्नीच्या नावाने,
जी घराचे मांगल्य जपून ठेवी
एक माळ लावू बहिणीच्या नावाने,
जी भावांसाठी सुयश चींती...!
एक माळ लावू मुलीच्या नावाने,
जी दोन्ही घराला सतेज करी..!
एक माळ लावू आजीच्या नावाने,
जी संस्काराचे खोबरे नातवांना देई...!
एक माळ लावू मावशीच्या नावाने,
जी आईपरी आपली काळजी घेई...!
एक माळ लावू आत्याच्या नावाने
जी सदा माहेरचा गोडवा गायी..!
एक माळ लावू काकूंच्या नावाने,
जी सुखादु:खात कामी येई..!
एक माळ लावू मैत्रिणीच्या नावाने,
जीच्याजवळ मन मोकळं होई..!
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा