सोमवार, १२ डिसेंबर, २०२२

82. थोडसं मुलांविषयी

     सर्व पालकांना विनंती की, आपल्या मुलांना शाळेत/कोचिंगमध्ये विद्यार्थी म्हणूनच पाठवा. नाहीतर, भविष्यात मुलं असे काही बिघडतील की नंतर ते तुम्हाला सुद्धा विचारणार नाहीत. खालील काही मुद्दे ज्यावर पालकांनी आवर्जून विचार करावा.
1) त्याच्या केसांची ठेवण व्यवस्थित असावी. साधी ठेवन असावी. उगीचच वेगवेगळे कट मारू नका. 
2) पायातील बूट जास्त किमतीचे नसावेत, साधे असावेत.
3) शालेय गणवेश व्यतिरिक्त इतर ड्रेस वर जास्त खर्च करू नका.
4) वह्या/पुस्तके/पेन्सील/शालेय साहित्य इत्यादी गरजेची तेवढीच घ्या.
5) दादांचा मुलगा, भाऊचा मुलगा या उपाध्या घरीच ठेवून, फक्त विद्यार्थी म्हणूनच मुलाला शाळेत पाठवून द्या.
6) मोबाईल/लॅपटॉप/इंटरनेट पासून मुलांना दुर ठेवा. त्यांना एकांतात ह्या गोष्टी हाताळू देऊ नका.
7) मुलांचे चुकीचे लाड आणि हट्ट पुरवू नका.
8) मुलांचे मित्र तपासा, त्याच्या  सर्व मित्रांची माहिती करून घ्या.
9) मुलगा/मुलगी शाळेत जाण्यासाठी घरुन निघतात, खरंच ते शाळेत/ट्युशन मध्ये जातात का, याची वरचेवर शिक्षकांना फोन करून शहानिशा करा.
10) व्यसनाधीनतेचं वाढते प्रमाण लक्षात घेता आपल्या पाल्याविषयी त्याबाबतीत सतर्क रहा.
 11) तुमची क्षमता असली तरी आपल्याकडे काहीतरी कमी आहे उणीव आहे हे त्याच्या लक्षात येऊ द्या.  समाजात वावरताना त्याच्या समोर उगाचच मोठेपणाचा आवकरू नका.
12) पैशाचे महत्त्व त्याला कळू द्या.
13) शाळेत पाठवताना त्याच्याकडे एकही रूपया देऊ नका.
14) आपल्या मुलांना शिक्षीत बनवण्यापेक्षा सुशिक्षित बनवण्यासाठी शिक्षकांना सहकार्य करा.
15) 24 तासांपैकी कमीत कमी एक तास मुलांसोबत बसून अभ्यास घ्या.
16) आपली मुलं विकृत विचारसरणीच्या सहवासात जात असतील तर त्यांना वेळीच त्या सहवासातून बाजूला घ्या. जास्तीत जास्त तुमच्या सहवासात ठेवा. आज तुम्ही मुलांना वेळ द्या तरच ते उद्या तुम्हाला वेळ देतील. 
17) महीन्यातून कमीत कमी दोन वेळा शिक्षकांना भेटायला नक्की जा.
18) तुमच्या सहकार्याशिवाय शिक्षक मुलांमध्ये बदल घडवूच शकत नाहीत.
19) मुलांना एकदा शाळेत पाठवले की आपली जबाबदारी संपली असे समजू नका.
20) आपल्या मुलांचा शिक्षक योग्य संस्कार आणि शिक्षण देतो की नाही ते तपासून पाहत जा आणि नसेल तर ते शिक्षकांच्या लक्षात आणून द्या.
21) शिक्षकांचा मान सन्मान करायला आपल्या पाल्यांला  सांगा आणि ते कृतीतून दाखवून द्या
22) मुलांच्या शिक्षका विषयी तक्रारी ऐकुन शिक्षकांशी विनाकारण वाद घालू नका.
23) घरचे व रस्त्याने जाता येता मुलांचे होणारे वाद त्याचा ठपका शिक्षकावर ठेवू नका.
२4) तुमची मुलं, ध चा म करून शिक्षकाविषयी घरच्यांना काहीतरी सांगत असतात तुमची खूप चलती आहे पन विनाकारण शिक्षकाला काही बोलू नका, भांडू नका. शिक्षक अजून शिक्षकच आहे.
25) विद्यार्थी व पालकांनी, शिक्षकांशी तुमचे जेवढे होतील तेवढे प्रेमाचे संबंध ठेवता येतील तेवढा अधिकाधिक प्रेम असू द्या. कारण मुलांना शिक्षक किंवा आईच घडू शकते लक्षात ठेवा.
26) पूर्वी विद्यार्थ्यांना योग्य शिक्षा होती म्हणून ती पिढी सुधारली आता थोडे जरी काही झाले तरी पालक शिक्षकांशी वाद घालतात, आमची खूप ओळखी आहे, आमची चलती आहे, असा शिक्षकाला दम देतात. तसे करू नका शिक्षकांना शिक्षकाचा योग्य तो मान द्या.
27) तुमची मुलं सुधारतील हा शिक्षकाचा प्रामाणिक उद्देश असतो. कृपया गैरसमज करून घेऊ नका. नाहीतर भविष्यात पस्तावा येईल पण वेळ हाती नसेल.
27) मुलांना फक्त जन्म देऊन, त्यांना चांगल्या शाळेत टाकून आणि त्यांना सर्व सोयी सुविधा पुरवून आपण एकदम चांगले पालक आहोत हे गैरसमज करून घेऊ नका, पालक होणे ही गोष्ट सोपी नाही, उत्कृष्ट पालक कसे होता येईल हे सातत्याने शिकत रहा.
28) मुलांना मारणे रागावणे हेच त्यांना सुधारण्याचे तोडगे आहेत या मानसिकतेतून बाहेर या, त्यांच्या बाल मानसिक स्तरावर जाऊन त्यांना समजावून सांगण्याच्या पद्धती शिकता येतात त्या शिकून घ्या.
            तुम्ही वरील नियम पाळले तर तुमची मुले घडणार आणि नाही पाळले तर मुलं निश्चितच बिघडणार

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...