सोमवार, २६ डिसेंबर, २०२२

101. कदाचित हे वाचून कुणीतरी धीर करुन मनातील बोलेल

     आज ऑफिसमधून लवकरच घरी निघालो होतो. आज लोकलमध्ये एवढी गर्दी नव्हती. त्यामुळे आरामात बसायला जागा मिळाली म्हणून मस्तपैकी बसून घेतलं आणि असाच इतके-तिकडे आपलं बघत होतो. तेवढ्यात समोर लक्ष गेलं. माझ्या समोरच एक मुलगी शांतपणे डोळे मिटून बसली होती. का कुणास ठाऊक? तिचा चेहरा जरा ओळखीचा वाटला. जरा डोक्याला जोर देऊन विचार करु लागलो. कोण ही? कुठे पाहिलंय हिला? तोपर्यंत लगेच लक्षात आले. हानिलुनिलांबरी !! हो तीच ती आणि आठवला तो दिवस ज्या दिवशी तिला पहिल्यांदा पाहिलं होतं. पांढऱ्या ड्रेसमध्ये काय सुंदर दिसत होती तीतशी आजही तितकीच सुंदर दिसतेय. तीन वर्षे एकाच वर्गात होतो पण तिला फक्त पाहण्याशिवाय काही केलं नाही. पण तिनेही कधी मला त्या नजरेने पाहिलंच नाही. मग का पहायची????? …… याचं उत्तर शोधता शोधता तीन वर्षे निघून गेली. कधी कळालंच नाही. मलाही तिला माझ्या मनातलं प्रेम सांगण कधी जमलच नाही. कॉलेजच्या निरोप समारंभामध्ये तिला शेवटचं पाहिलं होतं. नंतर कॉलेज संपलं, जॉबला लागलो. त्यानंतर आज इतक्या वर्षांनी पाहतोय तिला. लग्न झालेले आहे हे सांगायला तिच्या गळ्यातील मंगळसूत्र पुरेसं होतं.
         पण आता ती ओळखत असेल का मला? की सरलेल्या दिवसांसारखी मलाही विसरुन गेली असेल? असाही प्रश्न मनात येऊन गेला. पण आजही तिच्याशी बोलायची हिंमत होत नव्हती. असे विचार मनात चालू होते की अचानक तिने डोळे उघडले आणि आश्चर्याने ओरडत म्हणाली, अरे नितीन तू?... किती दिवसांनी भेटतोय आपण? कसा आहेस? काय करतोस काय आजकाल? कायम अबोल वाटणारी मुलगी आज एका दमात एवढे प्रश्न विचारतेय हे पाहून मला खूप आश्चर्य वाटलं. हळू हळू मी जरा मोकळेपणाने बोलू लागलो. खूप गप्पा मारल्या. ती म्हणाली, काय रे तू नितीन ! कॉलेजच्या दिवसात जसा होतास अजूनही तसाच आहेस बघघाबरट !!! आणि हसली. पण तिच्या नजरेत मी कसा का असेना पण कोणीतरी होतो हेच मला खूप समाधान देऊन गेलं. मुंबईमध्ये काही दिवसांसाठी आली होती ती. मग तिच्याकडून कळलं की नवऱ्यासोबत कॅनडाला जाणार आहे. ऐकून बरं वाटलं. मनात विचार आला आपण काय देऊ शकणार होतो हिला? हेच मुंबईतलं धकाधकीचं जीवन.  आता ती खरच किती सुखी आहे.
  मग पुढे तिचा स्टॉप आला आणि निरोप देऊन ती निघाली. दोन पाऊले चालून पुढे गेली आणि अचानक तिनं मागे वळून पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी होतं. म्हणाली, खूप प्रेम करायचास ना माझ्यावरमला पण तू खूप आवडायचास. तीन वर्षे रोज वाटायचं की किमान आज तरी तू मला विचारशील म्हणून? पण तू कायम घाबरत राहिलास. मग तिने डोळे पुसले आणि लोकमधून उतरुन निघून गेली. पण आम्हां दोघांचे डोळे पाणावलेले होते. मनात आले त्याच वेळी थोडा धीर केला असता तर आज.
     खूप वेळा असं होत ना की तिला बोलायचं धाडस होत नाही. कदाचित हे वाचून तरी कुणी धाडस करुन मनातील बोलेल.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...