ती मला
म्हणाली की,
आज
फारच एकटे वाटते म्हणून तुला फोन
केला.
पलीकडून तिचा आवाज आणि
मग
मीच
थोडी स्तब्ध झाले.
काय
बोलावे काही समजलेच नाही.
ती
मात्र खूप
काही बोलायचे आहे
म्हणून आतुर वाटली भानावर आल्यासारखी,
अगं
बोलना…!
मला
भेटशील का असे ती म्हणाली. मला तिच्याबद्दल
पूर्ण सहानभूती होती.
पण
मी
माझ्या संसारातील रोजच्या व्यावाधानामध्ये पार
बुडून गेले होते.
हो
नक्कीच असे
मी
तिला सांगितले.
पण
मला
खरंतर अजिबात वेळ
नव्हता.
लेकीला शाळेत सोडायचे होते.
नवऱ्याने बँकेत जाऊन एफ.डी. क्लीअर करायला सांगितले
होते.
घरातील कामे…
माझ्या डोळ्यासमोर सर्व कामे भरभर नाचू लागली.
पण
तिला मी
नाही म्हणू शकले नाही.
मी
म्हणाले,
हो
येते ना
! पण आज नाही जमणार? उद्या येईन. पण येशील ना? असा
तिचा आगतिक प्रश्न.
हो
उद्या संध्याकाळी भेटूया असे
मी
म्हटले.
त्यावर ती
म्हणाली,
पण
माझ्या घरी
नको,
आई
असेल आणि
तुला पाहून उगीचच वैतागेल.
मी
म्हटले,
आपण
आपल्या नेहमीच्या मंदीरात भेटू या.
हो
चालेल असे
म्हटल्यावर तिने फोन
ठेवला.
मला उद्याची कामे आज करणे भागच होते. भरभर कामाला लागणे आवश्यक होते. पण मी मात्र थंड होते. उद्या ती भेटणार आहे. माझ्याशी तिला काय बोलायचे आहे? तिला मी अधूनमधून फोन करत असे. मध्ये तिला एकदा भेटले होते पण तिची ती विचित्र अवस्था आणि तिला होणारे भास मी तेंव्हाच घाबरले होते. पण तरीही तिला धीर देण्यासाठी मी तिच्याशी खूप बोलले. तिला खूप सावरण्याचा प्रयत्न केला होता. पण..? त्यानंतर भेट नाहीच. खरंतर तीच मला फोन करायची पण मी जुजबी काहीतरी बोलत रहायची. ती मात्र उत्साहाने तिचे नवे उपक्रम सांगत असायची. मी तिचे तोंडभरुन कौतुक करायची. तिला प्रोत्साहीत करायचे पण तिला प्रत्यक्षात मात्र कधी भेटले नाही. फक्त एकदाच. तिच्या लग्नात…!
किती खूश होती ती आणि तिचे सारे आप्त. मी सुध्दा. त्या भयान स्वप्नांतून
भासांतून ती
आता
वर्तमानात जगणार होती.
तिच्या डोळ्यात आता
संसाराची भावे स्वप्न होती.
मी
तर
अगदी वेळात वेळ
काढून तिच्या भावी संसाराला शुभेच्छा द्यायला तिच्या लग्नाला गेले.
तिचे सौंदर्य अधिकच खुलले होते.
कॉलेजमध्ये तिच्या आगे-मागे मुलांचे फिरणे आठवले. पण तिने कुणालाच भिक घातली नाही. त्या मनस्वीचे
म्हणणे होते,
“जो फक्त माझ्या सौंदर्यावर
भाळतो त्याला मनाचे सौंदर्य काय
कळणार?
माझ्या सौंदर्यावर भाळून माझ्यावर जो
प्रेम करतो तो
फक्त माझ्या शरीरावर प्रेम करतो.
”
आणि
तथाकथित तिचा प्रियकर मी
पाहीला आणि
मी
तिच्यावर चिडले.
हीच
तुझी निवड…
काळे कभिन्न,
तिच्यापेक्षा वयाने कितीतरी मोठा.
त्याचे कर्तृत्व काय
तर
समाजसेवा.
मी
तिला प्रॅक्टीकली विचार करायला सांगितले.
समाजसेवा ह्या सर्व गोष्टी ऐकायला,
वाचायला छान
पण
तुझा तो
पिंड नाही की
तू
संसार म्हणून या
गोष्टी स्वीकारशील.
पण
ती
त्याच्या प्रेमात अखंड बुडालेली.
म्हणाली,
त्याने माझे सौंदर्य पाहिले नाही.
मी
प्रथम त्याला भेटले तेंव्हा कुणीही माझ्याकडे परत
वळून पाहतेच.
पण
त्याने माझ्याकडे एकदाही पाहिलं नाही.
हाच
तो
जो
माझ्या सौंदर्यावर भाळला नाही.
मी
जर
बाह्य सौंदर्याला महत्व देत
नाही तर
त्याचे दिसणे मला
महत्वाचे नाही.
आणि
जो
मनुष्य दुसऱ्यांच्या सुख-दु:खाचा विचार करतो तो मनाने किती प्रेमळ असेल?
पण ही प्रेमाची
धुंदी लवकर उतरली.
त्याचा खरा
चेहरा खूप
निर्दयी आणि
स्वार्थी होता.
खरं
तर
त्यानं तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी धारण केलेला भयानक खोटा मुखवटा होता.
पण
जेंव्हा तिला हे
कळले तेंव्हा ती
पूर्ण उध्दवस्त झाली.
मी
त्याला ओळखू शकले नाही.
मी
मलाच फसवले.
तिने स्वत:ला कोंडून घेतले. ती वर्षभर स्वत:मध्येच गुरफूटून
गेली आणि
आत
तुटत गेली.
आणि
मग
त्या भयाण भासांमध्ये जगणे सुरु झाले.
या
सर्व पर्वात ती
एकटी पडली.
घरातून,
बाहेरुन तिच्याकडे वळणारी प्रत्येक दृष्टी तिच्यावर हसते आहे
असे
वाटत होते.
हो
तिला स्कीजोफेनिया झाला…!
काही वर्ष तिच्यावर
उपचार झाले आणि
ती
पूर्णपणे बरी
झाली.
आणि
तिचे लग्नही झाले.
ती
सुखात संसार करु
लागली.
असे
खरं
तर
झाले असते तर…?
पण
तिचे लग्न झाले आणि
परत
तिला त्या भासांनी घेरले.
ती
परतली होती तिथेच…
एकटी
!...
संध्याकाळी
मुलीला स्केटींग क्लासला सोडले आणि
मी
मंदीरात पोहचले.
ती
कुठेच दिसली नाही.
मी
मंदीराच्या बाहेरच्या चौथऱ्यावर बसून विचार करीत होते एवढ्यात ती
आलीच.
ती
आली
आणि
मी
पाहतच राहिले.
चेहऱ्यावर वयाच्या खुणा दिसू लागल्या होत्या.
शरीर सुटले होते.
खरंतर ती
माझ्यापेक्षा एका
वर्षाने लहान होती पण
आता
तिच्याकडे पाहून ती
प्रौढा वाटत होती.
मी
स्वत:ला सावरले आणि भेटल्याचा
खूप
आनंद चेहऱ्यावर आणून तोंडभरुन हसले.
तिचेही निस्तेज डोळे चमकले.
कशी आहेस?... माझ्या प्रश्नावर
हसून विचारले…
कशी
दिसते?...
मी
किंचित हसून म्हटले,
छान
दिसतेस.
माझ्या बोलण्यावर तीच
जोरात ओरडली छान
दिसते?
मी
क्षणभर घाबरले.
ती
म्हणाली,
“महिन्यापूर्वीच
मी
हॉस्पीटलमधून घरी
आले.”
मी
म्हटले,
“मला काहीच माहित नाही. म्हणजे पुन्हा तुला तसले भास?...”
तिच्या डोळ्यात मला
तिच
ती
फोनवरील अंगतिकता प्रत्यक्ष दिसत होती.
“हो गं… सांग ना मी काय करु?”
माझ्याकडेही या
प्रश्नाचे उत्तर नव्हते.
वीस वर्षापूर्वी
प्रेमभंगातून तिला आलेल्या दबावामुळे या
मनस्वी मुलीला स्क्रीजोन्फेनियाने घेरले. तिचे भास तरी कसे? त्या भासाबाबत ती
बोलूही शकत
नाही.
असे
भास
तिच्या संपूर्ण अस्तित्वाचा घास
घेतात.
मला
यातून बाहेर पडायचे आहे
नाहीतर ते
भास
माझा बळी
घेतील.
मीच
माझ्या नजरेला नजर
भिडवू शकत
नाही.
ती
हतबल होऊन बोलत होती.
“हे बघ, असे भास होऊ लागले की लगेच तू ती साखही दुसरा विचार मनात आणून तोडून टाक. तू अध्यात्मिक
पुस्तके वाच.
गुरु प्रार्थना कर.
चांगला विचार कर
आणि
हानून पाड
ते
घाणेरडे विषयसक्त विचार.”
मी
तिच्याशी खूप
बोलले.
ती
बरीच शांत झालेली वाटत होती.
संध्याकाळ खूप
झाली होती.
तिला माझ्याशी अजूनही खूप
बोलायचे आहे
हे
दिसत होते पण
माझे मन
माझ्या लेकीकडे होते.
चल मी निघते, परत एकदा भेटू असे मी म्हटले. ती म्हणाली, “नक्की भेट !...तू भेटलीस की
परत
जगायला हुरुप येतो नाहीतर.”
तिने एक
मोठा उसास सोडला.
तिला परत
भेटण्याचे कबूल करुन मी
तिथून निघाले.
माझे मन आता तिच्या त्या विचित्र भासांचा विचार करु लागले. आणि क्षणात मी दचकले आणि मी माझ्या लेकीचा विचार मनात आणून ती साखळी तोडून टाकली. समोर माझी लेक हात पसरुन माझ्याकडे
झेपावली.
तिच्याजवळ असे
कुणीतरी भासांतून जगवणारे हवे
होते?..
ती
सर्वार्थी अतृप्त आहे.
मला उद्याची कामे आज करणे भागच होते. भरभर कामाला लागणे आवश्यक होते. पण मी मात्र थंड होते. उद्या ती भेटणार आहे. माझ्याशी तिला काय बोलायचे आहे? तिला मी अधूनमधून फोन करत असे. मध्ये तिला एकदा भेटले होते पण तिची ती विचित्र अवस्था आणि तिला होणारे भास मी तेंव्हाच घाबरले होते. पण तरीही तिला धीर देण्यासाठी मी तिच्याशी खूप बोलले. तिला खूप सावरण्याचा प्रयत्न केला होता. पण..? त्यानंतर भेट नाहीच. खरंतर तीच मला फोन करायची पण मी जुजबी काहीतरी बोलत रहायची. ती मात्र उत्साहाने तिचे नवे उपक्रम सांगत असायची. मी तिचे तोंडभरुन कौतुक करायची. तिला प्रोत्साहीत करायचे पण तिला प्रत्यक्षात मात्र कधी भेटले नाही. फक्त एकदाच. तिच्या लग्नात…!
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा