अंकीता आणि
शुभम ग्रंथालयामध्ये बसलेत.
अंकीताला वाचनाची आवड
आहे
तर
शुभमला मोबाईल चॅटिंगची.
वाचताना तिचं थोडं लक्ष शुभमवर जातं.
तो
मोबाईलमध्ये डोळे घालून बसलाय.
अंकीता त्याला सहजच म्हणते,
“आय लव यू.”
हे
ऐकताच शुभमने समोर बघत
फोन
कडेला ठेवून दिला आणि
म्हणाला,
“हो. मला माहित आहे. पण तू मला सारखी-सारखी याची जाणीव का करुन देतेस?”
ती
म्हणते,
“याची दोन कारणे आहेत. एक तर तुला माझ्या प्रेमाची
जाणीव झाली पाहिजे आणि
दुसरं म्हणजे तू
अशावेळी तुझा फोन
बाजूला ठेवून माझ्याशी बोलू लागतोस जे
मला
हवं
असतं.
आणखी एक
कारण आहे
ते
म्हणजे या
तीन
शब्दात जादू आहे.
जेंव्हा भविष्यात कधीतरी आपण
वेगळे व्हायची वेळ
आली
तर
हेच
शब्द आपणाला एकत्र आणतील.”
शुभम तिच्या हातातलं पुस्तक हिसकावून घेतो.
तो
म्हणतो,
“मला केवढे टोमणे मारशील या मोबाईलच्या
मुद्यावरुन पण
तू
तेवढं ते
रोमिओ-ज्युलिएटचं
पुस्तक किती वेळा वाचशील?”
अंकीता म्हणते,
“हे पुस्तक माझ्यासाठी
खूप
खास
आहे.
आणि
तुलाही भविष्यात या
पुस्तकाची गरज
पडेल कधीतरी.”
शुभम म्हणतो,
“छे…छे… कधीच नाही पडणार गरज. पण आय लव यू टू.”
अंकीता म्हणते,
“हो… मला माहित आहे.”
मित्रांनो या भेटीनंतर तर तुम्हाला कळलंच असेल की त्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते. पण गोष्टीमध्ये काहीतरी वेगळे वळण गरजेचे आहे. तोच मग इथे सुरु होतोय. चला तर मग अनुभवुया.
काही दिवसानंतर
रोज
कॉलेजला वेळेवर येणारी अंकीता आज
कॉलेजला आलीच नाही.
गेली दोन
तास
शुभम तिची वाट
पाहतोय.
तिचा फोन
पण
स्वीच ऑफ
लागतोय.
तो
तिच्या घरी
जातो पण
घराला कुलूप असते.
त्याला काही सुचत नाही.
आजपर्यंत कुठेही पहिल्यांदा मला
सांगून जाणारी अंकीता आज
मला
न
सांगताच कुठे निघून गेली?
या
चिंतेने शुभम व्याकूळ झाला.
त्याला काही सूचत नसते.
त्याला ही
गोष्टच पटतच नसते की
अंकीताने त्याच्यासाठी काही मॅसेज सोडला नाही.
थोडा वेळ
विचार केल्यावर त्याला एक
गोष्ट आठवते.
तो
बाईक सुरु करतो आणि
ग्रंथालयात जातो.
तिथे चौकशी केल्यानंतर असे
समजते की,
अंकीता सकाळी लवकर येथून निघून गेली आहे.
त्याला ती
वाचत असलेल्या रोमिओ-ज्युलिएट
पुस्तकाची आठवण होते.
तो
ते
पुस्तक उघडतो.
पुस्तकात त्याची शोधाशोध सुरु होते.
पण
त्यात काहीच त्याला सापडत नाही.
तेवढ्यात त्याला अंकीताचे ते
वाक्य आठवते जेंव्हा तिनं म्हटलं होतं की,
जेंव्हा भविष्यात वेगळे होण्याची वेळ
येईल तेंव्हा आय लव यू हे शब्द आपणाला एकत्र आणतील. त्याला काहीतरी सुचतं. तो पुन्हा तेच पुस्तक उघडतो. आणि बरोबर तो 143 चे पान
उघडतो.
ते
पान
चिकटवलेलं असतं.
ते
पान
तो
एका
बाजूने फाडतो.
त्यात एक
चिठी असते.
त्यात लिहलेलं असतं,
“मला माहिती होतं शुभम तू इथवर पोहचशील. कारण हे माझ्या प्रेमाचं
नशीब होतं.
आता
तुझ्या प्रेमाचं नशीब काय
आहे
ते
पहायचे आहे.
जेंव्हा तुझ्या हातात हे
पत्र पडेल तेंव्हा कदाचित मी
कलकत्याला पोहचली असेन.
माझी
11.30 ची
रेल्वे आहे.
काल
पप्पांचं पत्र आलं
होतं,
त्यांनी माझ्यासाठी मुलगा पाहिलाय.
आज
तातडीनं यायला सांगितलय.
मला
माझं नशीब आजमावयाचं आहे.
तू
माझ्या नशीबात आहेस की
तो
मुलगा माझ्या नशीबात आहे.
तुझी अंकीता.”
11.30 वाजायला पंधरा मिनिटे कमी
होती.
रेल्वेस्टेशनचे अंतर अर्ध्या तासाचं होत.
शुभम आपल्या बाईकवर बसून भन्नाट वेगाने रेल्वेस्टेशनकडे निघाला.
अर्ध्या तासाचं अंतर त्याने फक्त सतरा मिनिटात पूर्ण केलं.
त्याने बाईक तिथेच सोडली आणि
धावत धावत रेल्वेस्थानकावर अंकीताला शोधू लागला.
चौकशीअंती कळालं की
कलकत्याची रेल्वे दोनच मिनिटापूर्वी निघालीय.
तो
खूपच निराश झाला. त्याचं दु:ख
डोळ्यात अश्रू रुपानं बाहेर आलं.
त्याचं नशीब त्याला दगा
देऊन गेलं होतं.
तो
त्याच नैराश्य अवस्थेत तिथल्या एका
बेंचवर बसून राहिला.
तेवढ्यात एक
अलगद हात
त्याच्या खांद्यावर पडला.
त्याने मागे वळून पाहिले तर
ती
एक
अंकीताची मैत्रीण होती.
ती
म्हणाली,
“अंकीता तुझ्यासाठी
काहीतरी देऊन गेली.
तो
म्हणाला,
“काय?”
ती
म्हणते,
“ते तू अंकीतालाच
विचार.”
ती
बाजू झाली.
तिच्या मागे अंकीताच उभी
होती.
अंकीताला पाहताच त्याचे हुंदके अनावर झाले आणि
तो
अंकीताला मिठी मारुन रडायला लागला.
अंकीताने योग्न निर्णय घेतला होता शुभमला सोडून न
जाण्याचा.
कारण तिनं बुध्दीने नाही तर
मनानं निर्णयघ घेतला होता.
म्हणूनच तर
रेल्वे निघून गेली पण
अंकीता नाही.
आजवर घडलेल्या 90 टक्के प्रेमकथांचा
अंत
यापेक्षा पूर्णपणे विरुध्द होतो.
मुली शेवटच्या क्षणी वडीलांच ऐकूण किंवा त्यांचा विचार करुन बुध्दीने निर्णय घेतात आणि मनातल्या भावनांना दाबून टाकतात. कधी-कधी याचा खूप मोठा परिणाम मुलांच्या
आयुष्यावर होतो.
मी
कोणाबद्दल तक्रार करत
नाही.
मला
फक्त एवढंच सांगायचे आहे
की,
“हृदयाच्या
बाबतती नेहमी हृदयाचे ऐका, डोक्याचे नको.” पण हे सर्व करत असताना आई वडिलांच्या, मित्रांच्या, नातेवाईकांच्या व इतर कोणाच्याही भावना दुखावल्या जातील असे काही करू नका.
मित्रांनो या भेटीनंतर तर तुम्हाला कळलंच असेल की त्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते. पण गोष्टीमध्ये काहीतरी वेगळे वळण गरजेचे आहे. तोच मग इथे सुरु होतोय. चला तर मग अनुभवुया.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा