एक मुलगा आणि एक मुलगी एकमेकांवर खूप प्रेम करत होते. व्हॅलेंटाईन डे दिवशी दोघेपण एका पार्टीला गेले. त्या दिवशी त्यांनी खूप डान्स केला, एन्जॉय केला. पार्टी संपल्यानंतर जेंव्हा घरी जायची वेळ आली तेंव्हा मुलग्याने मुलगीला मागणी घातली. मुलगीपण खूप प्रेम करत होती म्हणून तीने “होय”
असे
सांगितले.
सगळ्या मित्रांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या.
अशा
प्रकारे त्यांची बऱ्याच वर्षाची मैत्री प्रेमामध्ये बदलली होती.
परंतु वेळेला त्या दोघांचे सुख
कदाचित मान्य नव्हते.
जेंव्हा दोघे बाईकवरुन घरी
येत
होते तेंव्हा मुलगा शंभरच्या स्पीडने गाडी चालवत होता.
त्याच्या गाडीचा वेग
पाहून ती
मुलगी घाबरली आणि
गाडीचा वेग
कमी
करायला सांगितला.
पण
मुलग्याने वेग
कमी
नाही केला.
रात्रीच्यावेळी त्याची बाईक जास्तच वेगाने पुढे जात
होती. मुलगी म्हणते, “मी म्हणते, बाईकचा वेग कमी कर एवढ्या वेगाने का चालवत आहेस?” मुलगा म्हणतो, “नाही… नाही… मला आनंद वाटत आहे.”
मुलगी म्हणते,
“तुला आनंद वाटायला लागलाय पण माझा जीव जायायला लागलाय.”
मुलगा म्हणतो,
“तर मग पुन्हा म्हण की तू माझ्यावर
प्रेम करतेस?”
मुलगी म्हणते,
“आता तर म्हणाले, सगळ्यांच्या
समोर.”
मुलगा म्हणतो,
“पुन्हा म्हण. मला तुझ्या तोंडातून
आय
लव
यू
शब्द ऐकायला खूप
आवडते.
म्हण ना?”
मुलगी म्हणते,
“आय लव यू आता तर वेग कमी कर.”
मुलगा म्हणतो,
“मला मिठी दे.”
मुलगीने त्याला जोरात मिठी मारली.
मुलगा म्हणाला की,
“तू माझे हेल्मेट घालू शकतेस मला रात्रीच्या
वेळी त्याच्या काचांमधून काहीच दिसत नाही?”
मुलगीने त्याचे हेलमेट काढून घातले.
दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये
वेगाने पळवत असलेल्या गाडीच्या अपघातामुळे एका
मुलग्याचा मृत्यू झाला.
मागे बसलेली मुलगी हेल्मेटमुळे वाचली.
खरे हे आहे की गाडीचे ब्रेक फेल झाले होते आणि मुलग्याला माहित होते की आता बाईक थांबू शकत नाही. त्याने वेग कमी करण्याचा प्रयत्न केला पण समोरुन येणाऱ्या दुसऱ्या वाहनांमुळे त्याचा आपल्या गाडीवरील ताबा सुटला होता. म्हणून त्याने आपल्या प्रेमाचा जीव वाचविला व आपला जीव दिला. ह्यालाच खरे प्रेम म्हणतात. प्रेमामध्ये फक्त बोलणे, शपथा घेणे पुरेसे असून शकत नाही. वेळ आलीच तर जीव स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आपल्या साथीदाराचा जीव वाचवणे म्हणजेच खरे प्रेम आहे.
मुलगीने त्याचे हेलमेट काढून घातले.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा