एका डॉक्टरला ऑपरेशनसाठी कॉल
आला.
खूप
घाई
करुन ते
डॉक्टर हॉस्पीटलमध्ये पोहचले.
त्यांनी पटकन सगळ्या नर्सना ऑपरेशनची तयारी करायला सांगितले.
स्वत:चे कपडे बदलले आणि ऑपरेशन थिएटरजवळ
आले.
तिथे त्याने पाहिले की
एका
मुलाचे वडील हॉल
बाहेर रागात चकरा मारत आहेत आणि
डॉक्टरची वाट
पहात आहेत.
डॉक्टरांना पाहताच त्या मुलांच्या वडीलांचा पारा चढला आणि
ते
डॉक्टरांना रागात म्हणाले,
“तुम्ही इथे यायला इतका वेळ का घेतला? तुम्हाला
कळत
नाही का
की
माझ्या मुलाचे प्राण धोक्यात आहेत ते?
तुम्हाला काही जबाबदारीची जाणीव आहे
की
नाही?”
यांवर डॉक्टर स्मित हास्य करत
म्हणाले,
“मला माफ करा. मी हॉस्पीटलमध्ये
नव्हतो.
मी
फोन
आल्यावर जितक्या लवकर येता येईल तितक्या लवकर आलो
आणि
आता
मी
प्रार्थना करतो की
तुम्ही शांत व्हा.
मला
माझं काम
करु
द्या.”
त्यावर त्या मुलाचे वडील म्हणाले,
“जर तुमचा मुलगा ऑपरेशन थिएटरमध्ये
असता तर???
जर
तुमचा स्वत:चा मुलगा आता मृत्यूच्या
जबड्यात असता तर
तुम्ही काय
केलं असतं?”
डॉक्टर पुन्हा एकदा स्मित हास्य देत
म्हणाले,
“मी तेच सांगतो जे पवित्र पुस्तकांमध्ये
लिहलेलं आहे
की
शरीर नश्वर आहे.
शरीर मातीतून तयार झालं आणि
शेवटी मातीतच मिसळणार.
अगदी आम्ही डॉक्टर जरी
असलो तरी
आम्ही काही देव
नाही.
आता
तुम्ही शांत व्हा.
आणि
देवाजवळ प्रार्थना करा.मी माझे पूर्ण प्रयत्न करतो.”
आणि
असे
म्हणत डॉक्टर ऑपरेशन थिएटरकडे गेले.
तसे
वडील त्या डॉक्टरकडे रागातच पहात राहिले.
आणि
काही तासानंतर डॉक्टर आनंदात बाहेर आले.
आणि
त्या मुलाच्या वडीलांना म्हणाले,
“अभिनंदन ऑपरेशन यशस्वी झालं. आम्ही तुमच्या मुलाला वाचवलं.”
त्यावर मुलाच्या वडीलांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
ते
डॉक्टरांना धन्यवाद म्हणाले.
डॉक्टरांनी त्यांना काही प्रतिक्रिया दिली नाही आणि
ते
तसेच तिथून ताडकन निघून गेले.
यामुळे मग
त्या वडीलांना आश्चर्य वाटले.
आणि
ते
शेजारी उभ्या असलेल्या नर्सला रागात म्हणाले,
“किती गर्विष्ठ
आणि
माजोरा आहे
हा
डॉक्टर.”
त्यावर ती
नर्स रडत
म्हणाली,
“त्या डॉक्टरांचा
मुलगा अपघातात काल
वारला.
आज
ते
त्याचा अंतिम संस्कार करत
होते.
जेंव्हा आम्ही त्यांना तुमच्या मुलाच्या ऑपरेशनसाठी फोन
केला तेंव्हा त्यांनी जास्त विचार केला नाही आणि
ते
स्वत:च्या मुलाचा अंतिम संस्कार अर्धवट सोडून घाईने तुमच्या मुलाच्या
ऑपरेशनसाठी आले
आणि
आता
अंतिम संस्कार पूर्ण करण्यासाठी गेले.
अहो,
ज्यांचा स्वत:चा एकुलता एक मुलगा मेला तो काय गर्व आणि माज करणार?”
हे
ऐकून त्याचे वडील सन्न झाले आणि
त्यांना खूप
पश्चाताप झाला.
कधीच कोणाबद्दल काहीही बोलून मोकळे होऊ नये. कारण तुम्हाला माहित नसतं की त्यानं काय भोगलय.
कधीच कोणाबद्दल काहीही बोलून मोकळे होऊ नये. कारण तुम्हाला माहित नसतं की त्यानं काय भोगलय.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा