पहिला मित्र म्हणतो,
“एक प्रश्न विचारु?”
दुसरा मित्र म्हणतो, “हा… विचार ना…”
पहिला मित्र म्हणतो, “समजं, जर तुला असं कळालं की तुझ्याकडे जगण्यासाठी आता एकच क्षण उरलाय आणि या क्षणी तू कोणत्याही एकाच आवडत्या व्यक्तीला भेटू शकतोस, तर तू कोणाला भेटशील?” दुसरा मित्र म्हणतो, “अअअअअअअ…… असे असेल तर त्या क्षणी मी कोणालाच भेटणार नाही.” पहिला मित्र म्हणतो, “असे का? सांगशील?” दुसरा मित्र म्हणतो, “सांगतो ना… हे बघ जर मी तुला म्हटले की त्या क्षणात माझ्या आई-वडीलांना भेटेन तर तू म्हणशील की फक्त एकालाच भेटायचे आहे. एक तर आई नाहीतर बाबा. एकाच नाव सांग. मग मी म्हणेन की आईला भेटेन, खूप प्रेम आहे तिचे माझ्यावर…” मग तू म्हणशील, “म्हणजे तुला असे म्हणायचे आहे का की तुझ्या बाबांचे तुझ्यावर प्रेम नाही. अरे ते दाखवत नाहीत पण आई एवढीच त्यांना पण तुझी तितकीच काळजी आहे.” मग मी पुन्हा कोड्यात पडेन आणि म्हणेन की, ठीक आहे. मग मी त्या क्षणी बाबांना भेटेन. मग तुझा पुढचा प्रश्न असेल की, “आई-वडीलांचे नांव घेतलेस पण तुझ्या प्रियसीचे नाव नाही घेतलेस ती पण इतके प्रेम करते तुझ्यावर. तिला भेटावेसे वाटणार नाही का?” मग मी पुन्हा कोड्यात पडेन.
पण खरे सांगायचे
तर
नात्यांमध्ये असा
क्रम नाही लावता येत.
हे
नाते आधी
आणि
ते
नाते नंतर.
मला
जरासा क्षण मिळाला तर
मी
कोणालाच भेटणार नाही.
त्या क्षणात मी
माझे डोळे बंद
करुन घेईन आणि
माझ्या आवडत्या सगळ्या व्यक्तींना मनातल्या मनात आठवेन. माझी आई, बाबा, ती आणि माझे मित्र-मैत्रिणी… आणि सगळेच. कारण तो यम
माझ्या त्या शेवटच्या
क्षणावर ताबा मिळवू
शकतो पण माझ्या
मनावर नाही.”
पहिला मित्र म्हणतो, “समजं, जर तुला असं कळालं की तुझ्याकडे जगण्यासाठी आता एकच क्षण उरलाय आणि या क्षणी तू कोणत्याही एकाच आवडत्या व्यक्तीला भेटू शकतोस, तर तू कोणाला भेटशील?” दुसरा मित्र म्हणतो, “अअअअअअअ…… असे असेल तर त्या क्षणी मी कोणालाच भेटणार नाही.” पहिला मित्र म्हणतो, “असे का? सांगशील?” दुसरा मित्र म्हणतो, “सांगतो ना… हे बघ जर मी तुला म्हटले की त्या क्षणात माझ्या आई-वडीलांना भेटेन तर तू म्हणशील की फक्त एकालाच भेटायचे आहे. एक तर आई नाहीतर बाबा. एकाच नाव सांग. मग मी म्हणेन की आईला भेटेन, खूप प्रेम आहे तिचे माझ्यावर…” मग तू म्हणशील, “म्हणजे तुला असे म्हणायचे आहे का की तुझ्या बाबांचे तुझ्यावर प्रेम नाही. अरे ते दाखवत नाहीत पण आई एवढीच त्यांना पण तुझी तितकीच काळजी आहे.” मग मी पुन्हा कोड्यात पडेन आणि म्हणेन की, ठीक आहे. मग मी त्या क्षणी बाबांना भेटेन. मग तुझा पुढचा प्रश्न असेल की, “आई-वडीलांचे नांव घेतलेस पण तुझ्या प्रियसीचे नाव नाही घेतलेस ती पण इतके प्रेम करते तुझ्यावर. तिला भेटावेसे वाटणार नाही का?” मग मी पुन्हा कोड्यात पडेन.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा