कॉलेज केंव्हाच सुरु झालयं.
सर्व क्लास पूर्णपणे भरलेत.
तिसऱ्या पिरेडची बेल
वाजली.
लाट
मॅडमचा पिरेड संपला होता.
मॅडम अजून जायच्या होत्या.
पौर्णिमा गडबडीने क्लासमध्ये आली.
पावसाने चिंब भिजली होती ती.
मॅडमना काही सांगायची गरज
नव्हती.
पावसामुळे उशीर झाला असेल म्हणून त्यांनी तिला बसायला सांगितले आणि
त्या निघून गेल्या.
प्रदीप पौर्णिमेला सारखं विचारत होता.
एवढं भिजत यायची काय
गरज
होती?
एक
दिवस आली
नसतीस तर
चाललं असतं ना?
ती
म्हणाली,
“हो… पण तुला एक दिवस मला न बघणं चालल असतं पण मला चाललं नसतं.”
प्रदीप अलगद खाली बसून हसला.
किती प्रेम आहे
तुझं माझ्यावर म्हणून तिच्या हातावर हात
ठेवला.
तिचं अंग
खूपच तापलं होतं.
त्याला एकदम चटका बसला.
अगं
तुला तर
खूप
ताप
आलाय आणि
तरीही तू
इथं
आलीस.
तुला तर
ना
मी
आता…पुढे काही बोलायच्या आत
कांबळे सर
तिथं आले.
प्रदीप लगेच आपल्या जागेवर गेला आणि
सर्वजण गुड
मॉर्निंग म्हणत उभे
राहिले.
खाली बसा
फक्त पौर्णिमा सोडून.
पौर्णिमाला उभे
राहायला सांगितल्यावर सर्वच आश्चर्यचकित झाले.
प्रदीप जरा
जास्तच आश्चर्यचकित झाला.
कांबळे सर
म्हणाले,
“बाळ, तुला इतका उशीर का झाला? (सर थोडे कडक शिस्तीचे
होते.
त्यांनी तिला उशीरा येताना पाहिलं होतं.)
पौर्णिमा म्हणाली,
“सर, पाऊस आला होता.”
“पाऊस आला होता तर यायचं नव्हतं कॉलेजला. हात पुढे कर.”
तिने हात
पुढे केला.
सर
तिला छडी
मारणार इतक्यात प्रदीप ओरडला,
“थांबा सर. ती वेळेवर आली आहे. पाहिजे तर विचारा सर्वांना… ”
“हो का? मी प्रत्यक्ष
पाहिलं नसतं यावर विश्वासही ठेवला असता कदाचित.”
असं
म्हणून ते
पुन्हा छडी
मारणार तेवढ्यात तो
पुन्हा मधे
बोलला.
आता
ते
चिडले आणि
पहिल्यांदा त्यालाच छडीने हाणले.
प्रदीपने पौर्णिमेला पुरेपूर वाचवण्याचा प्रयत्न केला.
पण
तिसऱ्या वेळी सर
तिला मारताना तिने डोळे मिटले आणि
धाड
करुन खिडकीचे दार
वाऱ्याने उघडले गेले.
तिने डोळे उघडले तेंव्हा तिथे कोणीही नव्हतं.
सर्व बेंचेस मोकळे होते.
बाहेर धो
धो
पाऊस पडत
होता.
तिच्या आईने लगबगीने छत्री घेऊन वर्गात प्रवेश केला.
मित्रांनो या
कथेला इथे
थोडा वेळ
थांबवूया.
आता
तुम्ही म्हणाल तिथे कोणीच नाहीये,
सर्व गेले कुठे?
सांगतो,
पण
हे
सांगण्यासाठी मला
तुम्हाला थोडेसे भूतकाळामध्ये न्यावं लागेल.
चला
तर
मग…
एक
वर्षापूर्वी पाठीमागे…
आजपासून बारावीच्या परीक्षा चालू झाल्या आहेत. प्रदीप आणि पौर्णिमा हे वेगवेगळ्या कॉलेजचे पण त्यांचा परीक्षेचा नंबर एकाच कॉलेजमध्ये एकाच क्लासमध्ये पडला आहे. त्यामुळे ओळख वाढविण्यासाठी प्रदीप सुरवात करतो. हाय… माझं नाव प्रदीप. ती म्हणते, “माझं नाव पौर्णिमा.” तो म्हणतो, “रागवणार नसशील तर एक सांगू का?” ती, “हो सांग ना.” तो म्हणतो, “तू खूप सुंदर आहेस. तुझ्या कपाळावर एक चंद्रकोर असती ना तर त्या चंद्रकोरीलाही तुझ्यामुळे शोभा आली असती.” ती लाजून थँक्स म्हणाली. त्याचा हा आत्मविश्वास आणि वक्तेपणा तिला खूप आवडला. अशी त्यांची मैत्री झाली. दोन तीन पेपर व्यवस्थित गेले. पण एका पेपरच्या वेळी तिच्या पायात कोणीतरी कॉपी टाकली जे तिला कळाले नाही. त्यावेळी निरीक्षकाच्या नजरेत ही कॉपी पडल्यावर त्यांनी पौर्णिमेला जबाबदार धरलं. ती खूपच विनंती करुन त्यांना सांगत होती की, ही माझी कॉपी नाही. पण त्यांनी ऐकलं नाही. शेवटी प्रदीपने तो आरोप आपल्यावर घेतला आणि तो म्हणाला, “सर ही कॉपी माझी आहे.” त्यामुळे त्या सरांनी पौर्णिमेला सोडून प्रदीपच्या पेपरवर लाल शेरा मारला. पौर्णिमेला माहित होतं की हा खोटं बोलतोय. कारण इतका स्मार्ट मुलगा कॉपी कसा करेल? पेपर संपल्यावर ते भेटले तेंव्हा तिनं स्पष्ट विचारलं, “तू कॉपी केली नसताना ती तुझी कॉपी आहे असं का म्हणालास?” “तुला वाचविण्यासाठी.” “पण का? तू कोण आणि मी कोण? आपलं नातंच काय? दोन दिवसाच्या मैत्रीखातर असं कोणी करत का?” “बरोबर आहे. पण दोन दिवसाच्या प्रेमाखातर असं कोणीतरी कोणीही करु शकतं. नाही??????” “म्हणजे, तुझं माझ्यावर प्रेम……” “हो… तुला बघता क्षणीच झालं होतं. ते पण प्रपोज असं करावं लागेल याची जरादेखील कल्पना नव्हती मला. बोल करशील माझ्याशी लग्न?” तिला त्यावेळी एक वेगळी पध्दत, स्पष्टपणे बोलणं आवडलं आणि तिनं पटकन हो म्हटलं. काही दिवसांनी एकाच कॉलेजमध्ये त्यांचे ॲडमिशन झालं. त्यांच प्रेम फुलत गेलं.
पण एक दिवस कॉलेज भरलेलं असताना धो-धो पडणाऱ्या
पावसाने कॉलेजच्या बिल्डींगचा एक
भाग
कोसळला.
त्यामध्ये चाळीस विद्यार्थी-विद्यार्थीनींचा
मृत्यू झाला आणि
शंभरच्या वर
जखमी झाले.
प्रदीपचं नाव
मृतांमध्ये होतं तर
पौर्णिमेचं जखमींमध्ये होतं.
होत्याचं नव्हतं झालं.
उकळत्या दुधामध्ये विरजण पडावं तसं
त्यांच्या प्रेमामध्ये दुर्दैवाने उडी
घेतली होती.
पौर्णिमेचा जीव
तर
वाचला पण
तिच्या मनावर या
घटनेचा जबर
मानसिक आघात झाला.
तिच्या पालकांनी यावर उपचारासाठी प्रयत्न केले.
पण
तिने योग्य प्रतिसाद दिला नाही.
तेंव्हापासून आजपर्यंत जवळजवळ रोज
ती
कॉलेमध्ये येत
असते.
आज
तर
तिने कहरच केला.
शंभर डिग्रीचा ताप आला असताना देखील ती कॉलेमध्ये पावसात भिजत आली होती. त्या खिडकीची दारे सुटलेल्या वाऱ्याने धडकत होती. तिचे केस उडत होते. तिची आई छत्री घेऊन तिथे आली आणि पौर्णिमेला भिजलेल्या डोळ्यांनी म्हणाली, “किती वेळा तुला इथे आणायला यायचं बाळ. रोज
तू
न
सांगता इथे
येतेस.
काय
झालयं ते
तरी
सांग.
आजपर्यंत तुला किती वेळा समजावलं.
पण
आज
फणफणत्या अंगानेसुध्दा तू
इथे
आलीस.”
असं
म्हणत त्या पौर्णिमेला घेऊन गेल्या.
त्यांना माहित होतं की
हिला मानसिक आजार झालाय.
पौर्णिमेला याची कल्पना दिली गेली असताना देखील तिने उपचारास नकार दिला.
हा
माझा मानसिक आजारच का
असेना पण
तो
मला
रोज
भेटतो हेच
माझ्यासाठी खूप
आहे.
उपचारानंतर तो
मला
कधीही दिसणार नाही.
म्हणून आजपर्यंत ती
उपचार न
घेता तशीच राहिली…
फक्त त्याच्यासाठी.
पौर्णिमेने
प्रदीपवर केलेल्या नितांत प्रेमासाठी त्याच्या एका
भेटीसाठी तिला झालेल्या मानसिक आजारालाच तिनं आयुष्य बनवलं.
म्हणूनच पौर्णिमेच्या आयुष्यात कायमची अमावस्या झाली.
आजपासून बारावीच्या परीक्षा चालू झाल्या आहेत. प्रदीप आणि पौर्णिमा हे वेगवेगळ्या कॉलेजचे पण त्यांचा परीक्षेचा नंबर एकाच कॉलेजमध्ये एकाच क्लासमध्ये पडला आहे. त्यामुळे ओळख वाढविण्यासाठी प्रदीप सुरवात करतो. हाय… माझं नाव प्रदीप. ती म्हणते, “माझं नाव पौर्णिमा.” तो म्हणतो, “रागवणार नसशील तर एक सांगू का?” ती, “हो सांग ना.” तो म्हणतो, “तू खूप सुंदर आहेस. तुझ्या कपाळावर एक चंद्रकोर असती ना तर त्या चंद्रकोरीलाही तुझ्यामुळे शोभा आली असती.” ती लाजून थँक्स म्हणाली. त्याचा हा आत्मविश्वास आणि वक्तेपणा तिला खूप आवडला. अशी त्यांची मैत्री झाली. दोन तीन पेपर व्यवस्थित गेले. पण एका पेपरच्या वेळी तिच्या पायात कोणीतरी कॉपी टाकली जे तिला कळाले नाही. त्यावेळी निरीक्षकाच्या नजरेत ही कॉपी पडल्यावर त्यांनी पौर्णिमेला जबाबदार धरलं. ती खूपच विनंती करुन त्यांना सांगत होती की, ही माझी कॉपी नाही. पण त्यांनी ऐकलं नाही. शेवटी प्रदीपने तो आरोप आपल्यावर घेतला आणि तो म्हणाला, “सर ही कॉपी माझी आहे.” त्यामुळे त्या सरांनी पौर्णिमेला सोडून प्रदीपच्या पेपरवर लाल शेरा मारला. पौर्णिमेला माहित होतं की हा खोटं बोलतोय. कारण इतका स्मार्ट मुलगा कॉपी कसा करेल? पेपर संपल्यावर ते भेटले तेंव्हा तिनं स्पष्ट विचारलं, “तू कॉपी केली नसताना ती तुझी कॉपी आहे असं का म्हणालास?” “तुला वाचविण्यासाठी.” “पण का? तू कोण आणि मी कोण? आपलं नातंच काय? दोन दिवसाच्या मैत्रीखातर असं कोणी करत का?” “बरोबर आहे. पण दोन दिवसाच्या प्रेमाखातर असं कोणीतरी कोणीही करु शकतं. नाही??????” “म्हणजे, तुझं माझ्यावर प्रेम……” “हो… तुला बघता क्षणीच झालं होतं. ते पण प्रपोज असं करावं लागेल याची जरादेखील कल्पना नव्हती मला. बोल करशील माझ्याशी लग्न?” तिला त्यावेळी एक वेगळी पध्दत, स्पष्टपणे बोलणं आवडलं आणि तिनं पटकन हो म्हटलं. काही दिवसांनी एकाच कॉलेजमध्ये त्यांचे ॲडमिशन झालं. त्यांच प्रेम फुलत गेलं.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा