दहावी पर्यंत मुलांच्या शाळेत शिकलो.
अकरावी-बारावी पण छोट्या कॉलेजला असल्यामुळे
तिथे फार
मुली नव्हत्या.
त्यामुळे मुलींमध्ये गेल्यावर त्यांच्याबरोबर कसे
बोलायचे?
कसे
वागायचे?
ह्याचा फारसा अनुभव नव्हता.
बारावी नंतर मोठ्या कॉलेजला गेलो आणि
पहिल्या वर्षीच ती
दिसली.
तिकडे एका
घोळक्यात थांबली होती.
तिचं अतिशय सुंदर,
निरामय आणि
मनमोकळं हास्य पाहून मनाला खूप
छान
वाटलं.
जाऊन तिच्याशी बोलावसं वाटलं.
पण
आम्ही इतके धीट
कुठे?
मनातील इच्छा मनातच दाबली आणि
सगळे मुकाट्यानं लेक्चरला जाऊन बसलो.
तिच्याशी बोलण्याचा योग आला तो पहिल्या वर्षाच्या वार्षिक परीक्षेदिवशी. एक वर्ष तिला लांबून बघण्यातच समाधान मानलं. खूप धाडसानं मी बोलायला पुढे सरसावलो आणि माझ्या तोंडातून एकदाचे शब्द फुटले, “हाय… कसे गेले पेपर? मला इलेक्ट्रॉनिकचे दोन्ही पेपर अवघड गेले.” “गेले गठ्ठयातून, आता निकाल लागला की कळेलंच कसे गेले होते ते? बाकी… सुट्टीत काय करणार?” ती बोलली. “काही ठरवलं नाही.” “ओके, बाय मला जायचं आहे.” “बाय…” मनात इच्छा नसून मला बाय करावे लागले आणि स्कूटीवरुन ती निघून गेली. दोघांकडेही मोबाईल नव्हता. त्यामुळे सुट्टीमध्ये काहीच संपर्क झाला नाही. संपूर्ण सुट्टी निघून गेली आणि परत एकदा कॉलेजचा दिवस उजाडला. आज ती दिसणार म्हणून मी मनातल्या मनात खूश होतो.
ती कुठे दिसतेय का बघायला मी गेटवरच थांबलो. ती आली, गाडी पार्किंगमध्ये
नेताना तिनं मला
बघितलं आणि
मस्त स्माईल दिली. “ती आपल्याकडे बघून हसली.” मी ह्या नशेत असतानाच ती गाडी लावून माझ्याजवळ
येऊन थांबली.
“काय म्हणताय साहेब? इथे का थांबलाय” ह्या वेळेस तिने सुरवात केली. मला एकावर एक सुखद धक्के बसत होते. “काही नाही. सहज… कोणी ओळखीचं दिसतंय का ते बघत होतो… चल जायचं वर्गात?”
“हो, चल. उशीर झाला आहे, लेक्चर सुरु झालं असेल.”
आणि
अशा
प्रकारे संभाषणाला सुरवात झाली.
ती
बोलायला सुध्दा खूप
मस्त होती.
तिचे बोलणे तासन्तास ऐकावे असे
वाटायचे.
जसजसे दिवस पुढे जाऊ
लागले तसतशी आमची मैत्री निर्माण झाली.
इतर
मुलींबरोबर पण
मी
अगदी बिनधास्त बोलू लागलो.
मला
बुध्दीबळात आवड.
स्पर्धा असल्याने लेक्चर बुडवून मी
त्या पत्रयाच्या आर्ट सर्कलच्या खोलीत जाऊन सराव करायला लागलो.
साधारण आठवडा गेला असेल,
तिनं मला
विचारलं,
“चल, मी पण येते बुध्दी लावायला.”
“अरे वा ! चल की.”
मी
पण
आनंदाने उत्तर दिले आणि
मग
त्या दिवसापासून कोणत्याच लेक्चरला न
बसता थेट
आर्ट सर्कलच्या खोलीत जाऊन त्या लोकांची नाटक बघत
बुध्दीबळाचा सराव करायचा,
अशी
आमच्या दोघांची दिनचर्या झाली.
तिला बुध्दीबळामधलं खरंच काही येत
नव्हतं तरी
ती
यायची.
कदाचित फक्त माझ्या सहवासात राहायचे म्हणून ती
येत
असावी असं
मला
वाटू लागलं.
मग
ती
खास
माझ्यासाठी डबा
करुन आणू
लागली.
आमच्यामधील नातं हे
मैत्रीपुरतं उरले नाही ह्याची एव्हाना दोघांना जाणीव झाली होती.
माझ्यासाठी एखादी वस्तू आवडणे परिचित होते,
पण
एखादी व्यक्ती आवडणे हा
अनुभव नवीन आणि
फार
वेगळाच होता.
मी
तिला विचारायचं ठरवलं.
त्या दिवशी ती आली. थोड्याफार
गप्पा झाल्या.
“काय रे? आज इतका गप्प गप्प का का? काही होतय का तुला?”
“नाही गं, असंच… मला काहीतरी बोलायचं होत तुझ्याशी.”
“अरे, मग बोल की…”
“असू दे गं, परत कधीतरी बोलेन.”
माझ्या मनात काय
चालू आहे
हे
तिनं बरोबर ओळखलं होतं.
तिला पण
हेच
हवंच होतं की.
“चल, आपण स्कूटीवरुन
फिरायला जावूयात.”
ती
बोलली.
मी
मुकाट्यानं मागे बसलो.
तिने गाडी पाषाणाच्या त्या मस्त एरियात नेली.
“हा, तू काहीतरी बोलणार होतास…”
तिनं दिलेला सिग्नल मी
न
ओळखायला इतका वेडा नव्हतो.
मी
मन
घट्ट केलं,
मोठा श्वास घेतला आणि
म्हणालो,
“मला तू खूप आवडतेस !”
“क क क्क काय?”…
तिच्याकडून हे
उत्तर आलं.
“मला जे बोलायचं होतं ते मी बोललो, आकाशवाणी
एकदाच होते.
चल,
आता
मला
परत
सोड
कॉलेजवळ…”
मी
प्रचंड हिंमत दाखवून घाई
घाई
मध्ये बोललो.
तिने गाडी बाजूला घेतली आणि
डोळ्यात डोळे घालून ती
म्हटली,
“तिकडे रस्त्याकडे
काय
बघतोस?...
माझ्याकडे बघ”
मी
हळूहळू नजर
तिच्या डोळ्याकडे नेली.
“हा, आता परत बोल… मगाशी काय बोललास ते.”
ती
म्हणाली.
“मला तू खूप आवडतेस, तुझी खूप आठवण येते. तुझ्याशी
बोललो नाही ना
तर
करमत नाही बघ.
फार
विचित्र वाटतं.”
तिच्या नजरेला टाळून मी
एवढं बोललो आणि
तिच्या उत्तराची वाट
बघू
लागलो.
आपण
फार
मोठा घोटाळा केलाय असं
मला
वाटू लागलं. “ए वेड्या… हे बघ… वरती बघ
माझ्याकडे”
मग
मी
नजर
हळूहळू तिच्या डोळ्यांकडे नेली.
“मला पण तू खूप आवडतोस. मला पण तुझी खूप खूप आठवण येते रे !”
हे
बोलताना हळूच तिची नजर
दुसरीकडे बाजूला गेली.
तिचे हे शब्द कानावर पडताच माझा आनंद गगनात मावेनासा
झाला.
तिला कडकडून मिठी मारायची माझी इच्छा झाली.
पण
वेळ
आणि
जागा चुकीची असल्यामुळं ते
राहून गेलं.
गाडी परत
फिरली,
कॉलेजच्या गेटजवळ पोहचेपर्यंत ती
सहा-सात मिनिटे मनातल्या
मनात हसत
होती.
स्वत:वरच मी प्रचंड खूप खूश झालो होतो. ह्या गोष्टीला
प्रपोज टाकणे हे
म्हणतात हेही मला
माहीत नव्हतं.
तिनं मला
कॉलेजच्या दारात सोडलं.
आता
मात्र आम्ही दोघही एकमेकांच्या नजरेत अगदी बिनधास्त बघत
होतो.
तोंडातून एकही शब्द न
काढता आमच्यात प्रचंड संवाद चालू होता.
मग
कॉलेज दोनला संपले की
घरी
न
जाता तिथेच पाच
पर्यंत गप्पा मारत बसायचे.
पाचला गणितच्या क्लासला दोघांनी एकत्र तिच्या स्कूटीवरुन जायचे.
एव्हाना मी
सायकल आणायची बंद
केली होती.
घरी
पोहचलीस की
घरच्या फोनवरुन मिस
कॉल
दे
असं
सांगणं,
बाहेर खाणं-पिणं, खास करुन विद्यापीठातल्या
त्या क्लोज कँटीगला जाऊन गप्पा मारणं अशा
काही गोष्टी नियमित चालू झाल्या.
एक दिवस मी सहज विचारलं, “काय गं, मी पहिलाच ना?” तिला बहुतेक हा प्रश्न अनपेक्षित होता. ती गोंधळली. बराच वेळ तिच्या तोंडातून शब्द बाहेर येईना. आणि मग अगदी गंमत म्हणून सहज विचारलेल्या माझ्या प्रश्नाबद्दल मलाच चिंता वाटू लागली. बराच वेळ शांतता होती. परत एकदा मीच पाऊल उचलले. “अगं बोल ना, काय
झालं?
कोणी असेल तर
सांग,
प्लीज लपवू नकोस…”
“मला माफ कर वेड्या. मी तुझ्यापासून
हे
लपवून ठेवलं.
मला
एकजण आवडायचा या
आधी.
पण
प्लीज आता
तसं
काही नाहीये.
आणि
ह्या गोष्टीला आता
बरेच दिवस झाले.
मी
ते
विसरलीये.”
भयाण शांतता पसरली आणि
ती
बराच वेळ
टिकून होती.
“वेड्या, प्लीज काहीतरी बोल रे ! मला तू खूप आवडतोस रे… खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर.”
मला
काय
बोलावे ते
कळेना.
मी
थोडी अधिक विचारपूस केली आणि
माझ्या प्रत्येक प्रश्नाला तिनं उत्तर दिलं जणूकाही मी
तिला हे
प्रश्न विचारीन हे
तिला माहितच असावे.
प्रत्येक उत्तर माझ्या कानातून जात
असताना मला
प्रचंड त्रास होत
होता.
“तो आठ महिने बाहेर आणि चार महिने पुण्यात असतो. भरपूर पगार…”
आणि
असं
बरंच काही त्याच्याबद्दल ऐकायला मिळालं.
माझ्या अंगावर वीज
पडावी तशी
माझी अवस्था झाली.
मी
अगदी सहज
गंमत म्हणून विचारलेल्या प्रश्नाला इतकं वेगळं वळण
मिळेल असा
मी
विचारही केला नव्हता.
मी
माझी सॅक
घेतली आणि
मी
एकही शब्द न
बोलता तडकाफडकी तेथून निघून गेलो.
दोन-तीन दिवस गेले. मी काहीच संपर्क केला नाही. तिचाही फोन आला नाही. मी माझ्या मित्राशी याबद्दल बोललो. तो आमच्या दोघांचा चांगला मित्र होता. “हे बघ वेड्या, तुला ती खरच मनापासून आवडते?” तो मला धीर देता बोलला. “हो रे, हे काय विचारणं झालं का?”
“तिच्यावर
पूर्ण विश्वास आहे?”
“हो रे, पण……”
“पण वगैरे काही नाही. आधी तिला जाऊन भेट. कसलाही विचार मनात आणू नकोस. तिच्यावर
खूप
मनापासून प्रेम कर.
ती
तुझीच आहे
वेड्या,
तुझीच आहे.” तिला मी कॉलेमध्ये गाठलं. एखादा नवीन माणूस ज्या पध्दतीने बोलेल त्या पध्दतीनं मी तिला म्हणालो, “हाय, काय
चाललय.”
“काही नाही.”
तिनं पण
असंच उत्तर दिलं.
कॉलेज संपल्यावर आम्ही अगदी नेहमीप्रमाणे बसलो होतो पण
आज
आमच्यामध्ये फार
गप्पा होत
नव्हत्या.
“आज फार कंटाळा येतोय नाही.”
मी
उगाचच काहीतरी बोलायचं म्हणून बोललो.
खरं
तर
तिच्यासोबत संपूर्ण आयुष्य काढायला मी
तयार होतो.
“हो ना, आज खूप कंटाळवाणी
वाटतंय,
क्लासला पण
वेळ
आहे.
चल
आपण
कुठेतरी बाहेर जाऊया.”
“कुठं जायचं? मला काही माहित नाही या एरियामधलं. प्लीज विद्यापीठ
नको,
तिथं जाऊन जाऊन मला
कंटाळा आलाय.”
मी
पण
माझं मत
मांडलं.
“वेड्या, माझ्या घरी येतोस?... इथे जवळच आहे.”
चल
जाऊ,
बस
मागे.
माझ्या उत्तराची वाट
न
बघताच तिनं गाडी सुरु केली.
मी
चुपचाप मागे बसलो आणि
गाडी निघाली.
तिच्या भावाशी आणि
आईशी आपण
काय
बोलणार याची मी
तयारी सुरु केली.
आम्ही घरी पोहचलो. घरी कोणीच नव्हतं. मी एक सुस्कारा
सोडला.
तिनं मस्त चहा
व
मॅगी करुन आणले.
आम्ही पहिल्यासारखं बोलत नव्हतो आणि
ह्याची जाणीव दोघांनाही होती.
मॅगी खाता खाता एकमेकांना नजर
भिडली.
मॅगीची प्लेट मी
अलगद बाजूला ठेवली आणि
तिच्याजवळ जाऊन तिला कडकडून मिठी मारली.
तिला पण
खूप
आनंद झाला.
झालं गेलं सगळं विसरायला झालं आणि
आमची गाडी पुन्हा एकदा सुरळीत चालू झाल्याची आम्हाला जाणीव झाली.
कधी-कधी तिच्या घरी जाणं, मग तिनं मस्तपैकी
चहा
आणि
मॅगी बनवणे,
तिच्या खूशीत पडून मस्त गप्पा मारणे,
भविष्याची स्वप्न रंगवणे अशा
गोष्टींनी मन
अगदी प्रसन्न होत
होते.
प्रेम खरच
इतकं सुंदर असते याची जाणीव झाली.
काही महिने निघून गेले.
सर्व काही सुरळीत चालू होतं.
त्या दिवशी त्यांच्या
घरी
असताना अचानक फोन
वाजला.
तिने उचलला आणि
ती
खूप
शांत झाली.
फक्त,
“ठीक आहे, येते लगेच.”
असं
ती
फोनवर बोलली.
तिनं पटापट आवरायला घेतलं आणि
ती
म्हणाली,
“चल वेड्या, मला जायला लागेल.”
फोनवरील व्यक्ती कोण
होती हे
मला
कळू
शकले नाही.
“अग काय झालं? असं अचानक कुठे निघालीस? कोणाचा फोन होता?”
“तुला सांगायला
पाहिजे का
कोणाचा फोन
होता ते?”
तिनं उलट
प्रश्न केला.
“हो… मला सांगायला
पाहिजे.”
मला
ते
न
जाणून कधी
चैन
पडली असती?
“तो पुण्यात आलाय. त्यानं मला घरी बोलवलय. काहीतरी काम आहे म्हणे.”
माझ्यासाठी हा
प्रचंड धक्का होता.
तरीपण मी
स्वत:ला सावरत मन खंबीर केलं. माझ्या भावना चेहऱ्यावर
न
आणण्याचा आटोकाट प्रयत्न मी
केला.
“ठीक आहे, जा…”
तिला नाही म्हणून मला
उगाचच वाईटपणा घ्यायचा नव्हता.
का
कुणास ठाऊक,
पण
आमच्या नात्याचे अस्तित्व आता
फार
काळ
टिकणार नाही,
असं
मला
उगाचच वाटायला लागलं.
त्या दिवसापासून
ती
माझ्याशी आधीसारखी बोललीच नाही.
तिच्या डोळ्यात सतत
काहीतरी लपवत असल्याची भावना मला
दिसायची.
माझं मन
ह्या प्रकारानं फार
चिरडून निघत होते.
त्या दिवशी ती
फार
वेगळी दिसत होती.
रडून-रडून डोळे सुजले होते. ती बहुतेक मनाचा पूर्ण निश्चय करुन आली असावी. क्लास संपल्यावर
तिनं मला
थांबवलं.
गप्पा मारत मारत आम्ही पुन्हा हॉस्पीटलच्या पुलावर जाऊन उभा
राहिलो.
“वेड्या, मला तुला काहीतरी सांगायचं
आहे
रे.”
“हम्म्म्म्म्म्म्म,
मला
कल्पना आलये.
बोलून टाक.”
मी
अतिशय घट्ट मनानं तिला बोललो.
तिला असे
दाखवण्याचा प्रयत्न करु
लागलो की
ती
मला
काहीपण बोलली तरी
मी
अतिशय कठोरपणे ते
पचवू घेईन.
“मी त्याच्याशिवाय
नाही रे
जगू
शकत…
ॲम
सॉरी…
प्लीज मला
माफ
करा…
प्लीज.”
माझी स्वत:वरच खूप चिडचिड झाली. काही न बोलता मी उलटा फिरलो, माझ्या हताश हरलेल्या
मनाला मी
सावरत घरी
पोहचलो.
वरच्या खोलीचे दार
लावून ओक्साबोक्सी रडत
बसलो.
तिनं जे
काही केलं हे
तिला नीट
कळत
नव्हतं असं
म्हणून मी
मनातल्या मनात तिला माफ
करुन टाकलं,
पाकिटामधून तिचा फोटो काढला.
कसलाही विचार न
करता मी
त्या फोटोचे असंख्य तुकडे केले.
आमच्या प्रेमाची गाडी रुळावरुन माझ्यासमोर घसरली आणि
मी
मात्र बघतच राहिलो.
असेच दिवस जात राहिले. परत तिच्याशी
बोलण्याचा फारसा प्रयत्न केला नाही.
तिला मनात खोल
कुठतरी गाडून टाकलं.
अजूनपण अधून-मधून मॅसेज आणि क्वचित कधीतरी फोन पण होतो. हे बरोबर नाहीये हे माहित असूनही मॅसेज जातोच. नंतर अनेक मुली भेटल्या. पण मनापासून
कोणीही आवडलं नाही.
मी
पण
शोधायचा प्रयत्न केला नाही.
कधी
कधी
स्वत:च्या परिस्थितीवरच
हसू
येते.
एक वेळ अशी
होती की माझ्याकडे
गाडी नव्हती, पैसे नव्हते
पण ती होती
आणि आता माझ्याकडे
गाडी आहे, पैसे
आहेत पण प्रेम
करायला ती नाहीये.
काही लोक म्हणतात,
“पहिलं
प्रेम तेच खरं
प्रेम,
बाकी सगळी मजबूरी”
सध्या तरी
हेच
बरोबर वाटतयं.
तिच्याशी बोलण्याचा योग आला तो पहिल्या वर्षाच्या वार्षिक परीक्षेदिवशी. एक वर्ष तिला लांबून बघण्यातच समाधान मानलं. खूप धाडसानं मी बोलायला पुढे सरसावलो आणि माझ्या तोंडातून एकदाचे शब्द फुटले, “हाय… कसे गेले पेपर? मला इलेक्ट्रॉनिकचे दोन्ही पेपर अवघड गेले.” “गेले गठ्ठयातून, आता निकाल लागला की कळेलंच कसे गेले होते ते? बाकी… सुट्टीत काय करणार?” ती बोलली. “काही ठरवलं नाही.” “ओके, बाय मला जायचं आहे.” “बाय…” मनात इच्छा नसून मला बाय करावे लागले आणि स्कूटीवरुन ती निघून गेली. दोघांकडेही मोबाईल नव्हता. त्यामुळे सुट्टीमध्ये काहीच संपर्क झाला नाही. संपूर्ण सुट्टी निघून गेली आणि परत एकदा कॉलेजचा दिवस उजाडला. आज ती दिसणार म्हणून मी मनातल्या मनात खूश होतो.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा