शुक्रवार, ९ डिसेंबर, २०२२

77. मैत्री असावी तर अशी

        समीर नाव होतं त्याचं. लग्नानंतर आयुष्यात आलेला पहिला मुलगा. वयाने लहान पण मनाने आणि बुध्दीने खूप मोठा होता. त्याच्याशी बोलताना परकेपणा कधीच वाटला नाही. नेहमी तो माझ्या जवळचा वाटायचा. कधी कधी तर असं वाटायचं की विवेक ऐवजी हाच जर माझ्या आयुष्यात आला असता तरपण म्हणतात ना, नियतीने सर्वांच्या गाठी बांधलेल्या असतात.  तसंच काही झालं असावं. त्याचा फोटो मागूनही त्यानं कधी पाठवला नाही. तो नेहमी म्हणायचा की माणसाची प्रतिमा त्याच्या बोलण्यातून प्रकट होते. असं समज की तू आंधळी आहेस आणि तुला एक शिल्पकृती बनवायची आहे. मी खूप प्रयत्न केला त्याची प्रतिकृती बनवण्याचा पण मनासारखी जमली नाही. एका एकदम सामान्य मुलाची मूर्ती माझ्याहातून घडली. असं वाटलं, त्याच्या चेहऱ्यातून मुख्यत: त्याच्या डोळ्यातून सारे भाव प्रकट होतात. जणू काही त्याचे डोळेच माझ्याशी मुक संवाद साधत आहेत. एकदा त्याने फोन केला आणि माझ्या आवडीचे रंग विचारले. मी तपकिरी आणि क्रिम रंग सांगितले. त्याने त्या दिवशी तपकिरी रंगाचा शर्ट आणि क्रिम रंगाची पँट घेतली. मग माझ्या मनातल्या आकृतीलाही तेच वस्त्र चढविले. खूप गोड दिसत होता तो, कधी मोटारसायकलवरुन मला फिरवताना, कधी पावसाच्या सारींपासून एकाच छत्रीतून स्वत:चा बचाव करताना दिसायचा. त्याच्याबरोबर फिरताना असं वाटायचं की हा प्रवास कधीच संपू नये आणि लवकरात लवकर तो सत्यात उतरावा.
     1 आक्टोबरला माझ्या वाढदिवसाला चॅटिंग लिंकवरुन साजरा केलेला तो वाढदिवस मी कधीच विसरु शकत नाही. ज्या अपेक्षा मी विवेकडून ठेवल्या होत्या त्याने त्या सर्व पूर्ण केल्या होत्या. माझ्याकडून कशाचीही अपेक्षा करता…! कसं जमत रे तुला हे. माझा नवरासुध्दा काही काही शारीरीक सुखाची अपेक्षा करतो पण तू मात्र देत गेलास अमाप सुख ज्यात मी पूर्णपणे न्हाऊन गेले. फेसबुकमधील तुझं नांवमनापासून ! तुझे प्रोफाईल खूप आवडलं आणि तुला मैत्रीसाठी विचारलं. वाटलं होतं सर्व मुलांप्रमाणे तूही बोलशील काय करतेस? नाव काय? रहायला कुठे? बॉयफ्रेंड आहे का? फोन नंबर दे. पण तू यातला एकही प्रश्न विचारला नाहीस. तुझा पहिलाच प्रश्न मनाला किती स्पर्श लावून गेला कधी कोणावर प्रेम केलं आहेस का? या प्रश्नाने माझ्या आयुष्यातल्या पुस्तकाची सर्व पाने उलघडली गेली. पण खूप विचारांनी ठरवलं की इतक्या लवकर सांगायचं नाही. स्वत:ची व्ययक्तिक प्रोफाईल कोणाबरोबर अशी शेअर करायची नाही. मी तुला काहीच सांगितलं नाही. घरी आई, वडील आणि भाऊ यांच्याबरोबर राहते. स्वत:ची वेगळी खोली आहे. कॉम्प्युटर इंजिनीअरींग करते. सर्व खोटं सांगितलं. तासनतास तुझ्याशी चॅटिंग करायचे पण तुला खरं काही सांगितलं नाही. तीन दिवसांच्या बोलण्यानं तू मला पूर्णपणे जिंकलास. अशा स्वभावाचा मुलगा मी आजपर्यंत कधीच बघितला नव्हता. तुझ्याशी चॅटिंग करताना रोहन, राज यांच्याशी बोलायचे पण त्यांचं बोलणं आणि तुझं बोलणं यांत कितीतरी फरक होता. जगापेक्षा कितीतरी वेगळा होतास. तुला फसवण मला जमलंच नाही रे. काय अशी जादू केलीस कोण जाणे पण चौथ्या दिवशी ठरवलं तुला सर्वकाही खरं सांगायचं. तसा संदेश तुला पाठविला. माझं लग्न होऊन तीन वर्षे झालीत. मी माझ्या नवऱ्याबरोबर दिल्लीला राहते. हे सर्व ऐकून तू माझ्याशी मैत्री ठेवणार नाहीस. नको ठेवूस. बायएवढाच संदेश होता तो. पण तूही तिचकाच शांत रिप्लाय दिलास. लग्न एक बंधन आहे, त्यात तू अडकली आहेस. पण तुझं मन अजूनही प्रेमासाठी आतुरलेलं आहे शारीरीक नाही तर मानसिक. मी ठरवलं होतं की तुला काही रिप्लाय द्यायचा नाही. या आधी मी बऱ्याच जणांना असं सांगितलं होतं पण कोणी मला रिप्लाय केला नाही. खोटारडी म्हणून माझा अपमान केला. पण कोणी माझ्या मनात उतरुन बघितलं नाही की, मी का असं वागते? पण तू मात्र बरोबर ओळखलंस. मनकवडा आहेस की काय रे? पूर्ण जिंकलस रे मला तू पूर्ण जिंकलस. ठरवलं की तुला सर्व सांगायचं. कॉलेमध्ये असताना विवेकशी प्रेम झालं. जातीच्या कारणामुळे पळून जाऊन कोर्टात लग्न केलं. विवेक ओबेरॉयच्या साथिया फिल्म सारखं शेवटी घरी कळाल्यावर आम्ही गाझियाबादला फ्लॅट घेऊन रहायला लागलो. सुरवातीचे दिवस खूप सुखात गेले. विवेकने फक्त चंद्र तारे तोडून ते माझ्यावर उधळायचे बाकी ठेवले होते. इतके सुख त्यानं मला दिले. पण काही दिवसातच ग्रहणाचे काळे ढग आकाशात दिसू लागले ते माझ्या सासुबाईच्या रुपाने. तिला मी सून म्हणून मान्य नव्हते. पण विवेकसमोर त्या काही बोलायच्या नाहीत. पण तो ऑफिसला गेल्यावर बारा तास मला टोमणे सहन करायला लागायचे. तो थकून यायचा म्हणून मी त्याला काही सांगता सहन करत होते. पण एकदा सहन करण्याची क्षमता संपली आणि त्याला सर्वकाही सांगितले. आश्चर्य म्हणजे तेंव्हा त्यानं त्याच्या आईची बाजू घेतली. तेंव्हा मी दोन महिन्याची पोटूशी होते. भांडणामध्ये त्यानं मला ढकललं आणि मी जेवणातील रुमच्या कट्टयावर जाऊन पोटाशी पडले. हा माझा पहिला मिसकरेज. सासूबाई सर्व बघत होत्या पण काही बोलल्या नाहीत. त्यानंतर एक वर्षाने असे झाले आणि तेंव्हा मी पोटावर पडले आणि हा माझा दुसरा मिसकरेज. मला काही कळायचं नाही की काय करावं. आई-वडीलांकडे जायला तोंड नव्हतं. सर्कशीतल्या वाघासारखी माझी अवस्था झाली होती. नंतर मी काही बोलायचे नाही. सासूबाई लखनौला निघून गेल्या आणि सर्व त्रास कमी झाला. ज्या मुलासाठी मी स्वत:च्या आई-वडीलांचा विचार करता घरातून पळून आले त्याने माझा जराही विचार करु नये? दिवसभर घरात बसून कंटाळा यायचा. मग टाईमपास म्हणून ऑरकूटवर खोटे अकाऊंट उघडले आणि सहज म्हणून मुलांबरोबर टाईमपास करायला मजा यायची. सर्वांना छळताना, मी चॅट करताना त्यांची उत्सुकता अगदी शिगेला पोहाचायची, खूप खेळायचे त्यांच्या मनाशी आणि मग कंटाळा आला की त्याला सांगायचं की माझं लग्न झाल आहे. तो मुलगा आपोआप बोलणं बंद करायचा. पण तू तसं काही केलं नाहीस. बाकीच्यांना कळालं की माझं लग्न झालं आहे तर कधी मला विचारायचे नाही की तो कसा आहे? काय करतो? पण तू मला त्याच्याविषयी सर्व विचारलंस. मलाही तुझ्यापासून काही लपवता आलं नाही. जी गोष्ट मी माझ्या मित्र-मैत्रिणींना, आई-वडीलांना सांगितली नाही, ती सर्व तुला सांगितली. तुझ्याशी बोलताना वेळ कसा निघून जायचा हे कळायचंसुध्दा नाही. त्या दिवशी तू पहिल्यांदा कॉल केलास, पहिल्यांदा मी तुझा आवाज ऐकत होते. तुझ्या बोलण्याकडं माझं लक्ष नव्हतं. तुझी गोड वाणी, बोलण्यातला चांगलेपणा, नम्रता यातच मी गुंग झाले. गमतीने तुला विचारलं की तू गायक आहेस का? माझ्या सात पिढ्यांपासून एकही गायक आमच्या घरात जन्मला नाही हे तुझं उत्तर. मग चॅटिंग करताना तुझा आवाज ऐकत आहे असं वाटायचं.
     तीन महिने झाले आपल्या मैत्रीला. मी तुझे सर्व उपदेश पाळण्याचा प्रयत्न करत होते. दर मंगळवारी तू माझ्यासाठी प्रार्थना करायचास, स्वत:साठी का नाही मागितलंस रे? का आम्हांला भरभरुन दिलं? तू नेहमी म्हणायचास की देव सर्वकाही ठीक करेल. तो माझी प्रार्थना जरुर पूर्ण करेल. विवेक आणि मी काही दिवसांसाठी दिल्लीला गेलो तेंव्हा तुझ्याशी नीट बोलता आलं नाही. कधी जावं तुझ्याशी बोलते असं वाटत होतं. पाच दिवसांनी गाझियाबादला आलो. मी सतत विवेकची ऑफिसमध्ये जाण्याची वाट बघत होते. त्याने जसा घराच्या बाहेर पाय ठेवला तसंच विजेच्या वेगाने येऊन मी कॉम्प्युटर चालू केला आणि आश्चर्याचा धक्का बसला. तुझा एकही संदेश नव्हता. तुला कॉल करण्याचा प्रयत्न केला पण तोही लागत नव्हता. मी खूप वेळ विचार केला. मग म्हटलं की इथे नसल्याने तू संदेश पाठविला असशील. तुला संदेश पाठवले, भरपूर पाठवले पण काही उत्तर मिळालं नाही. एवढा राग येतो तुला माहित नव्हतं. कारण गेल्या तीन महिन्यात एकदाही रागवला नाहीस आणि आज मात्र एकदम नातंच तोडून टाकल्यासारखं वागत होतासदोन दिवस मी वाट बघितली. कॉम्प्युटर समोर बसून तुझ्या ऑनलाईन येण्याची वाट बघत होते. पण तू ऑनलाईन आला नाहीस. तुझा एकही रिप्लाय आला नाही. मग मात्र मी बावरले. काय घडलं काहीच कळत नव्हतं. अचानक आठवण झाली की -मेल चे अकाऊंट उघडून बघाव. त्यात तुझा मेल बघितला आणि अधाशासारखी वाचायला सुरवात केली. माझ्या आयुष्यातले सर्व चांगले क्षण मी तुझ्यासोबत घालवले. हे क्षण मी माझ्या मनाच्या कप्प्यात बंदितस्त करुन ठेवले आहेत. ते फक्त माझे आहेत, त्याच्यावर कुणाचाच हक्क नाही. आता मी काही तुला सांगणार आहे त्यावर कदाचित तुझा विश्वास बसणार नाही. पण दुर्दैवाने हे सर्व खरं आहे. मी इंजिनीअरींगचा विद्यार्थी आहे, मुंबईला राहतो हे सर्व खरं आहे. पण मी कुठलाही पार्ट टाईम जॉब करत नाही. तू जसं मला सांगितलंस की तू अविवाहीत आहेस तसंच मी तुझ्याशी खोटं बोललो यासाठी मला माफ करा. मला खरोखरच याबद्दल खूप वाईट वाटते. माझे आई वडील आयात-निर्णातीचा व्यवसाय करतात. आई कारडिऑलॉजिस्ट आहे. एका वर्षापासून मला रक्ताचा कर्करोग आहे आणि तुला माहितच असेल की यावर काही इलाज नाही. माझंही तेच झालं आहे. फेसबुकवरच्या कुठल्याही मित्राला अथवा मैत्रिणीला हे माहित नाही. तुझ्याप्रमाणे माझंही हे एक बनावट अकाऊंट आहे आणि यातले सर्व मित्र अनोळखी आहेत. पण तुझ्याशी मैत्रिपलीकडचं नातं निर्माण झालं. त्यामुळं तुझ्यापासून मी काही लपवू शकत नाही. जेंव्हा मी सांगायचो की मी जॉब ला जातोय तेंव्हा मी आई-बरोबर दवाखान्यात जायचो. तिने व्यवसाय बंद केला आणि पूर्ण वेळ मला देत होती माझ्या देखभालीसाठी. ज्या दिवशी मला कॅन्सर असल्याचं कळालं त्या दिवशी दोघांवरही आभाळ कोसळलं. आमच्या हसत्या खेळत्या घराला कोणाचीतरी नजर लागल्यासारखं झालं. खूप इलाज केले पण काही झालं नाही. मंत्र-तंत्र, उपास-तपास, नवस सर्व काही झालं पण काही उपयोग झाला नाही. माझ्या खूप जवळच्या मित्रांनाच हे माहित आहे. मला कॉलेजमध्ये जायला बंदी केली म्हणून मी सुध्दा घरीच फेसबुकवर नवीन मित्र बनवत त्यांच्याशी गप्पा मारणे यात वेळ घालवायला लागलो. तू ज्या दिवशी मला -मेल केलास की मला तुझ्याबरोबर सेक्स करायचा आहे तेंव्हाच मला कळालं की काहीतरी अडचण नक्कीच आहे आणि तूच मला खरं काही ते सांगशील आणि तसंच घडलं. त्या दिवसापासून बाप्पाजवळ दरारोज प्रार्थना करायचो की सर्व काही ठीक होऊ दे. तुझ्या मिसकरेजबद्दल वाचून अंगावर काटाच आला. डॉक्टरने तुला सांगितलं होतं की परत तू कॉन्सिव्ह नाही करु शकणार पण माझा देवावर पूर्ण विश्वास होता. दर मंगळवारी बाप्पाकडे तुझी प्रार्थना करायचो. तू दिल्लीला जात आहेस. पण मला मात्र करमणार नाही आणि आजकाल मलापण मात्र त्रास खूप होतोय. आई जास्त वेळ कॉम्प्युटरसमोर बसू देत नाही म्हणून तुला सर्वकाही सांगतोय. काही दिवसांनी कदाचित मी या जगात नसेन. पण देवाजवळ ऐवढी प्रार्थना करतो की तू कोठेही रहा, सुखी रहा. विवेकच तुझ्यावरचं प्रेम कधीच कमी होऊ नये आणि तुझं त्याच्यावरतीसुध्दा. जर तुम्ही दोघे मनाने एकत्र आला तर मला जास्त आनंद होईल आणि मला माहित आहे की  हे लवकरच होईल आणि तुझ्या गरोदरपणाचा एक -मेल माझ्या इनबॉक्स मध्ये पडला असेल. काय माहित की मी असेन की नसेन? एक प्रार्थना जरुर करेन माझ्यासाठी की या जगातून गेलो तरी पुर्नजन्म घेऊन तुझं आणि विवेकचं बाळ म्हणून या जगात परत पाऊल ठेवेन. सर्वकाही ठीक होईल. देवावर विश्वास ठेव आणि काळजी घे स्वत:ची, विवेकची आणि होणा-या बाळाची. -मेल वाचून अगदी धक्का बसला. मन अगदी सुन्न झाले. पण तुमसे मिलके, ऐसा लगा तुमसे मिलके अरमा हुए पुरे दिल के ही कॉलरट्युन वाजतच राहीली. रोज तुला संदेश किंवा इतर पर्याय शोधते पण उत्तर  कधीच येत नाही. आज तीन महिन्यांनी तुला मेल करते आहे. खरंच तुझ्या प्रार्थनेत खूप शक्ती आहे. ज्या ठिकाणी डॉक्टरांनी आश सोडली होती तिथे तुझ्या प्रार्थनेमुळे चमत्कार घडला. आज तुला सांगावसं वाटत की मी पोटूशी आहे. जेंव्हा विवेकला कळले तेंव्हा त्याने उचलून मला गिरकी घेतली पण मला तू हवा होतास त्या ठिकाणी. काय माहित का पण तू सांगितल्याप्रमाणे मी त्याच्याशी चांगले आणि तोही खूप चांगला वागतोय माझ्याशी. खूप काळजी घेतोय माझी.  तू स्वत:साठी का नाही प्रार्थना केलीसका नाही? माझ्या पोटात वाढणार बाळ तुझ्या रुपात नाही यावं कारण तू तुझे आयुष्य भरपूर जगावेस असे मला वाटते हीच प्रार्थना देवाजवळ करते.  माझं आयुष्य तुला लाभू दे. मनापासून फक्त तुलाच

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...