त्या दोघांचे एकमेकांवर खूप
प्रेम होते.
पण
एका
छोट्याशा शुल्लक कारणामुळे एके
दिवशी दोघांमध्ये भांडण झाले.
खरं
तर
ते
दोघे दररोज एकमेकांना मॅसेज पाठवून बोलत बसायचे.
असा
एकही दिवस नव्हता की
ते
दोघे एकमेकांबरोबर मॅसेजमधून कधी
बोलले नाहीत.
रात्री दहा
नंतर ह्यांचे बोलणे सुरु झाले की
कधी
अकरा,
कधी
बारा तर
कधी
एक
सुध्दा वाजायचा.
पण
सध्या भांडण झाल्यामुळे त्यांनी त्या दिवशी एकमेकांना मॅसेज पाठवला नाही.
दुसरा दिवस उजाडला. त्या दिवशी रात्री अचानक मॅसेज आला. मला खूप बरे वाटले. मी विचार केला कालचे भांडण तो विसरला असेल. पण माझ्या विचारांचा चक्काचूर झाला. कारण तो बे्रक-अपचा मॅसेज होता. ते वाचल्यावर मी जास्त मनावर दडपण न घेता लगेच रिप्लाय केला, “चालेल.” त्याला माझा रिप्लाय बघून हेच वाटलं असणार की मला काहीच फरक पडत नाही त्याच्या जाण्याने. पण त्याला काय माहित माझी काय अवस्था झालेली? मनातून मी खूप खचलेली होते. एवढ्या वेळात त्याचाही रिप्लाय आला नाही म्हणून मी झोपायच्या तयारीत होते. तेवढ्यात पुन्हा एक मॅसेज माझ्या इनबॉक्स मध्ये आला. लिहले होते, “प्रेम हे एका धनुष्यबाणासारखे आहे. तो बाण सरळ समोरील व्यक्तीच्या हृदयाचा वेध घेतो. हा बाण हृदयात घुसताना काहीच वाटत नाही. पण काढताना मात्र अतोनात यातना देऊन जातो.” त्याच्या मॅसेज वाचून कळाले की, त्याला खूप दु:ख झाले आहे. पण त्याला झालेल्या यातना मलाही झाल्याच होत्या. म्हणून मी लगेच रिप्लाय केला, “ प्रत्येकाच्या जीवनात प्रेमाचा बाण एकदाच धनुष्यातून सुटतो. माझ्याकडूनसुध्दा सुटला पण तो निष्फळ ठरला. एकदा सुटलेला बाण कधी पुन्हा येतो का?” त्यानंतर त्याचा कधी रिप्लाय नाही आला आणि मी सुध्दा तसा प्रयत्न कधी नाही केला.
तात्पर्य : प्रेमाच्या त्या बाणाला नेहमी हृदयात जपून ठेवा. कारण काढण्याचा प्रयत्न केलात तर मिळतात फक्त यातना आणि कृपया आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्यांना रागाऊ नका, भांडू नका. त्याऐवजी एकमेकांना समजून घ्या.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा