सोमवार, ५ डिसेंबर, २०२२

70. उद्या आपल्यावर या दोघांसारखी वेळ येऊ शकते

         तिचा अचानक फोन आला. ती खूप खूश वाटत होती. अरे राजेश, कुठे आहेस रे?... अरे, मम्मी पापा दोघेही बाहेर गेले आहेत. एकटीच आहे घरी. खूप आठवण येते रे. तिचे हे शब्द ऐकून राजेशपण खूश झाला. पाचच मिनिटात येतो घरी तिकडं ती थोडं नटून तयार होते. राजेश प्रियाच्या घराकडे येतो पण अचानक त्याच्या डोक्यात विचारांचे काहूल माजते. त्यानं तिच्यासाठी राधाकृष्णाची सुंदर मूर्ती आणलेली असते. भेट म्हणूनतो त्या मूर्तीकडे बघतो. त्याचे हात थरथरत असतात. त्याला जाणीव होते की आज काहीतरी अबद्र घडणार असं. तरीपण तो दुर्लक्ष करतो आणि तिच्या घरापाशी येतो. ती असते दाराशी त्याचीच वाट बघत. तो तिच्याकडे वेड्यासारखा बघत असतो. त्याची नजर तिच्यावर खिळलेली असते. ती देखील लाजेने गुलाबी होऊन जाते. राजेश अन् प्रियाचं एकमेकांवर खूप प्रेम असतं. अगदी चार वर्षे एकमेकांवर जीवापार प्रेम करत असतात. तो मुंबईला इंजिनीअरींगचं शिक्षण घेत असतो तर ती पुण्यामध्ये मेडीकलचं. पण सुट्टीमध्ये दोघेही गावी येतात. रोज फोनवर बोलणं  देखील असतं. दोघांचीही स्वप्न एकमेकांशिवाय अपूर्ण असतात. खरं प्रेम म्हणजे काय हे राजेश आणि प्रियाकडं बघीतल्यावरच कळालं असतं.
      दोघांच्या मस्त गप्पा सुरु झाल्या. राजेशने आणलेली राधाकृष्णाची मूर्ती तिला दिली. तिनेदेखील ती अगदी आनंदाने स्वीकारली. त्यानंतर त्यानं तिचा हात पकडला. क्षणभर तीसुध्दा बावरली. पण नंतर तिनं लाजून स्मित हास्य केले. दोघेही एकमेकांच्या डोळ्यामध्ये हरवून गेले. काही वेळाने तिनेचं त्याचा हात सारला अन् फ्रिजमधून डेरी मिल्क घेऊन आली. दोघांनी एकमेकांना भरवली. किती छान वातावरण होतं. दोघही खूप खूश होते. त्यांना वाटत होत हे चित्र कायमचं असंच रहावंफक्त ते दोघे अन् एकांत…!!!
     अचानक तिनं विचारलं, पुढं काय? तो हसून म्हणाला, पुढं काय म्हणजे काय? एक राजकुमार एका राजकुमारीला घेऊन जाणार. ती म्हणाली, अरे मस्करी नाही रे. मी खरंच विचारतेय. पुढे काय? अरे माझ्या घरातून परवानगी आहे, तुझ्या घरचं काय? किती दिवस असं मला तंगवत ठेवणार आहेस? तो म्हणाला, अगं, मी तरी काय करु? माझ्या घरच्यांना काय विचारु? माझं वय काय? अजून शिक्षण पूर्ण नाही. जॉब नाही अन् डायरेक्ट लग्नाचा विषय काढू? तुला तरी योग्य वाटतं का? ती म्हणाली, अरे राजेश, तसं नाही रे. मी मुलगी आहे रे. जर पुढे आपलं जमलं नाही तर तुला जास्त प्रॉब्लेम नाही होणार पण माझं काय? समजून घेण्याचा प्रयत्न कर रे दोघंही शांत बसून असतात. शेवटी राजेश धीर करुन म्हणतो, हे बघ. आपली जात वेगवेगळी आहे. त्यात खूप फरक आहे. हे बघ, मी जातीमध्ये जास्त भेदभाव करत नाही पण माझे घरचे खूप मानतात. मी आत्ताच तुला काही सांगू शकत नाही. आणि पळून जाऊन लग्न करायचं नाही असं तुझं म्हणण आहे. तूच सांग आता काय करायचं मी तरी ! त्यात आपले व्यवसाय वेगळे वेगळे ! सगळं आडवळणीच आहे. दोन-तीन वर्षे थांब……! ती म्हणाली, हे बघ राजेश, मग मला या रिलेशनमध्ये नाही राहता यायचं. कारण नंतर तुला सोडणं मला नाही जमणार. त्यापेक्षा आत्ताच…… थांबलेलं बरं. तुझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत अन् तू घरातून परवानगी मिळवण्यापर्यंत आपण दोघे उत्कृष्ट मित्र असल्यासारखं राहूया. नंतर सगळं ठीक होईल. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर पण……!
     दोन मिनिटं तो काहीच बोलला नाही. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो काहीच नाही बोलला. तिथून उठला आणि निघू लागला. त्यानं तिचा हात पकडला अन् म्हणाला, ठीक आहे. पण वचन दे तू नेहमी खूश राहशील. ती म्हणाली, अन् तू पण वचन दे. दोन वर्षानंतर तू मला न्यायला येशील आणि मी तुझी वाट पाहीन. त्यानंतर बराच वेळ ते तसेच उभे होते. एकमेकांकडे बघत पाणावलेल्या डोळ्यांनी. पुढे त्या दोघांचं काही झालं मला माहित नाही. … पण
1. प्रेमामध्ये जात महत्वाची असते का?
2. लग्न हे जातीशी निगडीत असतं की माणसांशी?
3. लग्न जर आपल्याला करायचं असतं मग आपले पालक मुलगी का शोधतात?
4. आपल्या समाजात प्रेमविवाहाला विरोध का?
5. मनाविरुध्द लग्न करुन सुखी संसार होऊ शकतो का?
6. प्रेम की आई-वडील असा प्रश्न उभा राहिल्यास काय निर्णय घ्यावा?
7. संस्कृती जपायची म्हणजे म्हणजे भावनांना मारुन आणि सुख वायच का
ह्या पोष्टला लाईक करण्यापेक्षा आपले मत नोंदवावे. कारण उद्या आपल्यावर या दोघांसारखी वेळ येऊ शकते.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...