बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५

2417. जिद्दीचे दुसरे नाव..मैथिली 🦅

 मैथिली...ही मैथिली आज बिहार विधानसभेत भाजपची सगळ्यात लहान वयाची आमदार आहे!! हार्दिक अभिनंदन!💐💐
तीन सख्खी भावंडे..
👩🏻 थोरली मैथिली ठाकूर-अप्रतीम गायिका, हार्मोनियमवर प्रभुत्व..
👦🏻तिच्यापेक्षा लहान रिशव ठाकूर-उत्कृष्ठ तबला वादक..
👦🏻धाकटा अयाची ठाकूर-सुरेख तबला,ढोलकी,
गायक..
आजकल ही तीन सख्खी भावंडे यूट्युब,इन्स्टाग्राम,फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांना अक्षरश: वेड लावत आहेत..
मोठमोठ्या म्युझिक कंपन्यांनी त्यांच्यासोबत पाच पाच वर्षाचे करार केले आहेत..
पण ह्या सगळ्याची सुरवात खूप कठीण परिस्थितीत झाली होती..
हिचे माता पिता जेव्हा इतर बिहारी मजुरांसारखे मोलमजुरीसाठी दिल्लीला आले होते,तेव्हा कसेबसे काम मिळायचे.. रहायला खूपच छोटी खोली..त्यातच तिच्या मात्यापित्यांना ही तीन अपत्ये पण झाली..जबाबदारी वाढतच चालली.पैसा साहजिकच पुरतच नव्हता..
पण तिचे वडील बिहारहून येताना एक गोष्ट इतरांपेक्षा वेगळी घेऊन आले होते..
ते म्हणजे त्यांच्या वडिलांकडूनच शिकुन घेतलेले शास्त्रीय शिक्षण..
दिवसभर मिळेल ते काम करायचे अन सायंकाळी दोन तास संगीताचा क्लास घ्यायचे..तेवढाच अजून थोडाफार हातभार..अर्थात त्यालाही फारसा प्रतिसाद मिळत नव्हताच..
असेच एकदा पावसाळ्यात छोट्याश्या घरातल्या खोलीत सर्वांसाठी मिळून एकच शिवलेल्या वाकळीत डोळ्यात अश्रू आणून पत्नीला सांगत होते..कि "भगवान ना जाने कब हमे इन मुश्किलों से निकालेगा..!"
त्यावर सात वर्षांची छोटी  
तनू अचानकच म्हणाली,
"पापा मैं निकालूंगी हम सबको इस मुसीबत से बाहर..!"
तिच्या आईवडिलांनी थोडेसे चमकूनच तिच्याकडे पहात विचारले, 'वो कैसे बेटा?'
त्यावर तनू म्हणाली,"जो आप दूसरे लोगों को सिखाते हो,वो मुझे भी सिखाइये ना..!"
एवढ्या छोट्याश्या मुलीचे विचार ऐकून तिच्या वडिलांचे अंत:करण भरून आले आणि मनोमन त्यांनी तिला शिकवायचे ठरविले..
दुसर्याच दिवसापासून न चिडता,न रडता ही छोटी मुलगी पहाटे साडेचार वाजता उठून वडिलांकडून संगीताचे धडे घ्यायला लागली...
साडेचार ते साडे सहा तिला शिकवून वडील नंतर दिवसभर मोलमजुरी करायला जायचे..अन ही घरात अन शाळेत तेच आठवत रहायची..अन रात्री वडिलांना परत उजळणी घ्यायला लावायची..
वडिलांना वाटले कि लहान पोर लवकरच कंटाळून जाईल अन कंटाळा करेल शिकायचा..पण झाले उलटेच.. दिवसेंदिवस तिची शिकण्याची उत्कंठा ही वाढंतच गेली..
घरात गरीबी असल्याने सुरवातीचे काही दिवस आपल्या धाकट्या दोन्ही भावंडांना ती आंघोळ,जेवू घालण्यापासून शाळेचे धडे देणे (कारण गरीबीमुळे हीच एकटी शाळेत जायची अन तिथे शिकलेले आपल्या छोट्या भावंडांना शिकवायची)आणि संगीताची गोडी लावणे हे सर्व करत होती..पुढे दोन्ही भावंडांना शाळेत दाखल केले..
 घरात आई बाबा कोणीच नाही..दोघेही मोलमजूरीला बाहेर जायचे..पण या पोरीची धडाडी विलक्षण होती..
हळूहळू ती रोज पहाटे आपल्या दोनही छोट्या भावंडांना घेऊन वडिलांसमोर बसायला लागली..भावंडे पण आई वडिलांपेक्षा हिचेच जास्त ऐकायची..कारण एका दृष्टीने मोठी बहीण हीच त्यांची आई झालेली होती..
हळूहळू ही दहावीत पोहोचली..अन चक्क ९२% गुण मिळवून पास झाली..कुठलाही क्लास नाही,काही नाही..शिवाय संगीताचा सराव..शिवाय दोन लहान भावंडांनापण सोबत पुढे पुढे नेत होती..तिन्ही भावंडे दरवर्षी ९०% हून अधिक गुण मिळवतच राहिली..
अन तिला तिच्या वडिलांनी एक एंड्रॉईड फोन घेऊन दिला..अन मग मात्र तिने दोन्ही धाकट्या भावंडांना घेऊन हवेत पंख पसरले..थेट गरूडभरारीच घेतली..🦅🦅🦅
ती मोबाईलवरच धडाधड तिघा भावंडांच्या गाण्यांचे व्हिडिओज रेकॉर्ड करून यूट्यूबवर अपलोड करु लागली..अन लाखो लोक बघू लागले..सर्वदूर चर्चा पसरली..
आता वेगवेगळ्या चॅनल्सची लोकं हिच्या घरी इंटरव्ह्यू घेण्यासाठी  येऊ लागले..त्यांच्या स्टुडियोत बोलावू लागले..
वेगवेगळ्या समारंभांची आमंत्रणेही मिळू लागली..
आणि एकदा  तिच्या मूळ गावी बिहारमध्ये तिला बोलावून मंत्र्यांच्या हस्ते सन्मानितही केले गेले..
अन मिथिलांचल या शहराने तर तिला नवीन नावच बहाल केले..
मिथिलांचलची मैथिली..
तीन वेगवेगळ्या म्युझिक कंपन्यांसोबतचे टाय अप,वेगवेगळ्या ठिकाणांहून सततचे दीड  हजारांहून जास्त  प्रोग्रॅम्स, अक्षरशः तीसहून जास्त वेळ परदेशातून बोलाविणे यामुळे मैथिलीची आर्थिक परिस्थिती प्रचंड सुधारली..
अन शेवटी एका छोट्याश्या अंधारी झोपड्यातून मैथिली दिल्लीच्या स्वतःच्या आलिशान कोठीत शिफ्ट झाली..
दोन कोटींच्या कोठीत प्रवेश करताना मैथिलीचे बाबा तिला जवळ घेऊन चक्क ढसाढसा रडले..
कारण जिथे त्यांना वॉचमनची देखील नोकरी कुणी आजवर दिली नव्हती,अशा पॉश एरियातल्या आलिशान बंगल्याचे ते आज मालक होते..
आज मैथिली अठरा वर्षांची आहे..बरोबर अकरा वर्षांपूर्वी तिने दृढ निश्चय पूर्वक बोललेले बोलणे आजही तिचे आईबाबा विसरू शकलेले नाहीत..
पापा,मैं बदलूंगी हमारी किस्मत..मैं निकालूंगी सबको इससे बाहर..
 दृढनिश्चय,कठोर मेहनत आणि स्वतः च प्रशिक्षित केलेले दोन छोटे भाऊ यांच्या जोरावर आणि केवळ एक हार्मोनियम,एक तबला अन एक झुणझुणे,कधीही तेही नाही,फक्त टाळ्या..एवढ्याच जिवावर मैथिली आज जगभरातल्या रसिकांच्या मनावर जादू करते आहे..
एका इंटरव्ह्यूमध्ये तिला विचारले कि, "अब आपके मम्मीपापा भी आपके बंगलेपेही रहते होंगे ना?"
यावर उसळून मैथिली म्हणाली,"मम्मीपापा मेरे बंगले पे नही रहते..मैं उनके पास रहती हूं..ये तो सबकुछ उन्हीका दिया तो है..!" इंटरव्ह्यू घेणारा खजीलच झाला..
अशा अतिशय गुणी मैथिलीला अन तिच्या गुणी भावंडांना त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी आपल्या गृपतर्फे लाख लाख शुभेच्छा..🙏🏼🌸🌷🌺💐🌸🌷🌺💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...