बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५

2422. वृद्धत्व म्हणजे एक

 वृद्धत्व म्हणजे एक असा दरवाजा…
जिथून प्रत्येक माणसाला एकटंच जावं लागतं… 🚪
आणि आत मात्र फक्त सन्नाटा बसलेला असतो. 😔

लोक म्हणतात, “मृत्यू अचानक येतो…”
नाही… मृत्यू हळूहळू येतो.
पहिले नात्यांपासून दूर करतो,
नंतर आवाजांपासून,
आणि मग आठवणींपासून… 🕰️

आणि एक दिवस माणूस स्वतःच्या घरातच अनोळखी होऊन बसतो. 🏠💔
सर्वात भयंकर क्षण तो नसतो जेव्हा हृदय धडधडणं थांबतं,
खरा भयंकर तो क्षण असतो.

जेव्हा खोली भरलेली असते,
पण ऐकू येतं फक्त घड्याळाचं टिक-टिक करणं… ⏱️😞
बाहेरचे लोक म्हणतात...
“आजोबा आराम करत असतील…”
पण आतून मन ओरडत असतं...
“कोणाला माझी गरज आहे का?” 😢❤️

वृद्धापकाळात शरीर तुटत नाही,
आशा तुटते…
आणि ज्याची आशाच तुटली,
तो माणूस श्वास घेत असला तरी,
अर्धा मेलेलाच असतो… 💔😔

आज तुमच्या घरातले जे ज्येष्ठ आहेत,
तेच उद्या तुमच्या भविष्याचा आरसा पण आहेत. 👵👴✨
त्यांना दुर्लक्षित करू नका…

नाहीतर उद्या तुमचाही आवाज
कोणी ऐकणार नाही. 💭💔
एकटेपणा मृत्यू देत नाही,
एकटेपणात आधी आत्मा मारतो,
शरीर तर नंतरच कोसळतं… 😔🖤

आता सांगा.
तुमच्या मते वृद्धापकाळात सर्वात घातक वेदना कोणती...
शरीराची वेदना की नात्यांचं तुटणं ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...