नितीन गहिवरल्या आवाजात म्हणाला, "काका, हे तुमचे एक लाख रुपये मुद्दल आहेत आणि प्रति महिना या हिशोबाने ३३ महिन्यांचे ३३ हजार रुपये व्याज आहे. सांभाळा हे. 🙏
आणि मनापासून धन्यवाद देतो, कारण तुम्ही माझ्यासारख्या एका अनोळखीवर विश्वास ठेवला.
राहण्यासाठी खोली दिली, आणि त्या वेळेला माझी मदत केली जेव्हा घरच्यांनी मला घराबाहेर काढलं होतं.
तुम्ही हेही विचारलं नाही की बायको आणि लहान मूल घेऊन मी कुठे जाईन. 👨👩👦
जेव्हा पैसे देऊन नितीन जायला लागला तेव्हा काका म्हटले,
"थांब ! हे पैसे मी दिले नव्हते. मला तुझ्यावर एक टक्काही विश्वास नव्हता. हे पैसे त्या माणसाने दिले होते, ज्याला तू रोज शिव्या घालतोस, ज्याने तुझ्या नाकर्तेपणामुळे तुला घराबाहेर काढलं होतं. आणि ती खोलीही मी फुकटात दिली नव्हती. आतापर्यंत तुझ्या वडिलांनी त्याचं ६६ हजार रुपये भाडं भरलंय.
हे पैसे उचल आणि तुझ्या बापाकडे नेऊन दे. जो रोज तुझ्या काळजीत नीट झोपूही शकत नाही,
आणि जेव्हा तुझं काम चांगलं चालतं, तेव्हा मंदिरात प्रसाद वाटतो." 😢
हे ऐकताच नितीनच्या पायाखालची जमीनच सरकली.
अचानक द्वेष प्रेमात बदलला. ❤️
मला मार्गावर आणण्यासाठी हे सगळं बाबा करत होते, हे जाणून त्याच्या डोळ्यांत पाणी आलं.
भावनाविवश होऊन तो धावतच घराकडे गेला. 🏃♂️
बाबा अंगणात खाट टाकून हुक्का ओढत बसले होते.
नितीन त्यांच्या जवळ जाऊन उभा राहिला. त्यांचा चेहरा बारकाईने पाहू लागला.
बाबांनी नजर चोरत विचारलं, "काय रे?"
तो घाबरून म्हणाला, "पैसे द्यायला आलोय बाबा." 💰
बाबांनी नजर रोखून रागाने पाहिलं आणि म्हणाले,
"बापाला पैसे देशील? एवढी लायकी आहे का तुझी?"
तो घाईघाईने म्हणाला, "ते तुमचेच पैसे आहेत बाबा."
बाबांनी कोरड्या आवाजात उत्तर दिलं, "ते तुझ्यासाठीच होते. स्वतःकडेच ठेव."
थोडा वेळ शांतता पसरली… फक्त हुक्क्याचे आवाज येत होते.
काही वेळानंतर बाबा म्हणाले, "आता अजून काय पाहिजे?"
नितीन घाबरत त्यांच्या पायाशी बसला आणि डोळे पाणावून म्हणाला,
"माफ करा बाबा…" 😔
बाबांनी दणदणीत आवाजात म्हटलं,
"जा, माफ केलं तुला."
त्यांचा आदेश ऐकून तो उठला आणि .
जायला निघाला, तितक्यात त्यांनी हाक मारली,
"इकडे ये."
नितीन परत त्यांच्या जवळ गेला,
तेव्हा त्यांनी आपले दोन्ही हात पसरले. 🤗
नितीन साठी तो क्षण कुबेराच्या खजिन्यापेक्षा कमी नव्हता.
तो झटक्यात त्यांच्या गळ्यात पडला आणि रडू कोसळलं. 😭
बाबा त्याची पाठ थोपटत म्हणाले,
"काळजावर दगड ठेवून तुला घराबाहेर काढलं होतं.
बाप आहे मी, तुला योग्य मार्गावर आणणं गरजेचं होतं.
आता तू स्वतःच्या पायांवर उभा आहेस. मला फार आनंद झालाय.
परत घरी ये रे मुला." ❤️🏠
नितीनला जाणवलं त्याचे खांदे ओले झाले होते.
नक्कीच बाबांच्या डोळ्यांतून आश्रू वाहिले होते. 💧👨👦
💔 "बापाचं मन समजायला खरंच एवढं कठीण असतं का?"
#पित्याचं_प्रेम ❤️💖
ज्योति निम्बालकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा