त्याला तीच सगळं जागेवर कराव लागत...अगदी एक एक घास खाऊ घालावा लागतो...टॉयलेट मध्ये नेऊन त्यात तिला स्वच्छ करून बाहेर आणणं सगळं सगळं... माझ्या जुन्या ऑफिसमधला मित्र... परवा कॉल आला त्याचा आम्ही सगळे एक ५-६ जण एकत्र कॉल वर बोलत होतो.. मुलांच्या शाळेच्या किती जास्त फी आहेत यावर विषय निघाला... आता सगळ्यांची मुलं अशी छोटी बालवाडी मोठी बालवाडी मधली... तो एकदम जोरात बोलला...फालतूपणा आहे यार हा इतकी कधी फी असते का? म्हणजे असा चिडूनच एकदम.. त्याच्या आवाजातला तो आतून आलेला सूर सगळ्यांनाच विचित्र जाणवला.. इतक्या वेळ जोरजोरात चाललेलं हसणं एकदम शांत झालं..
काय झालंय ? त्याला एकाने विचारलं..अरे चांगलं IT मध्ये काम करतोय न.. पगार पण एकदम छान आहे तुला मग इतका का रडवेला होतोय...आपलच मूल न ? मग आता आहे ती फी आहे.. काय करणार त्याला.. आपण नॉर्मल बोलतोय..तू इतका का असा चिडून आणि घटक्यात रडशील या आवाजत बोलतोय..कमवतोय की मित्रा चांगलं..
या कमवतोय की या वाक्यावर असा भडकला तो... घरी बायको बेडला खिळून पडलीये...अचानक तिला पॅरालिसिस चा अटॅक आलाय...गेले २ वर्ष झाले सगळं जागेवर आहे तीच.. तिच्या ट्रीटमेंट साठी पैसा पुरत नाहीये.. त्यासाठी वेगळं लोन काढलंय .. मुलगा आता ५ वर्षाचा झाला ...शाळेत घालायचं वय आलंय पण इतकी फी की कस सगळं भागवू ते कळत नाहीये.. त्याला असं घरात पण बसवून ठेऊ शकत नाही.. अरे रोज बाकी मुलांना शाळेत जाताना बघून जीव पिळवटतो माझा...बाप म्हणून थू माझ्यावर असं वाटत आहे मला.. साधं मन कुठे मोकळं करता नाही...बायको ला हे सगळं चुकून जरी कळलं तर ती या सगळ्याचा दोष स्वतःवर घेईल आणि तिची होत असलेली सुधारणा या टेन्शन मुळे बंद पडेल.. काय करू सांग... कसला चांगला पगार..कमावणारा १ आणि गरजा भागवायच्या आहेत असंख्य...काय कुठे कसा पुरु मी...
एका श्वासात तो इतकं काही बोलला... सगळे एकदम गप्प झाले...
किती सोप्प असत ना कोणावर पण काही कमेंट पास करणं...चांगला कमावतोय...तुला काय खर्च... एकुलता एक आहेस म्हणणं... कोणाच्या किरकिरेपणावर हसणं .. तो ना रडक्याच आहे...तिला ना नेहमी पैशांचं पडलेलं असत..चिंगूस कुठला... अर कधीतरी घरी बोलावं...असं काय खजिना आहे घरात की कधी बोलवत नाही.... या एक ना अनेक किती तरी गोष्टी आपण एकमेकांना नकळत बोलत असतो..टोमणे मारत असतो..
असं काही कानावर आलं की वाटत..की कोण कशातून जातंय आपल्याला खरंच माहित नसते....वरून वरून हसणारा आत किती जळत असतो......चिंगूसपणा करणारा आत काय गरजा भागवत असतो याची काहीच कल्पना नसते आपल्याला... मग आपण त्यांच्यावर कमेंट पास करणारे कोण आहोत ?
म्हणून कोणाला काही बोलताना थोडं थांबावं... जर कोणी अचानक समोर आलं तर त्याला निदान अश्या तरी गोष्टी विचारू नये ज्या खूप वैयक्तिक आहेत..अरे काय उत्तर देऊ या भीतीने माणसं माणसात येणं बंद करतात..
जर कोणाला आनंद देऊ शकत नाही तर निदान दुःख तरी नको न ..शब्द शांत ही करतात आणि तितकीच शांती भंग ही करू शकतात..मग आपण यात कोणत्या पारड्यात बसायचं..हे ठरवणं महत्वाचं..
@गायत्री पोफळे
राधा राधा !!! 🥰🥰🥰
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा