बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५

2415. मर्द को भी दर्द होता है

काल बोरिवली स्टेशनला एका पुरुषाचा रडण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला…
लोक थांबले, बघितलं, कमेंट्स केल्या, sympathy reactions दिल्या…
पण उद्या 19 नोव्हेंबर International Men’s Day आहे याची सुद्धा कल्पना कोणाला नसणार.
आणि का असावी ? पुरुषांसाठी ना कार्यक्रम, ना गाजावाजा, ना शुभेच्छा पोस्ट्स.
८ मार्च असता तर पूर्ण सोशल मीडिया गुलजार झाला असता - मग पुरुषासाठी एक दिवस का नसावा?
वर्षातील ३६५ दिवस कुटुंब, नाती, काम, जबाबदाऱ्या, समाज यांच्यासाठी खर्च करणाऱ्या माणसाला
स्वतःसाठी फक्त एक दिवस मिळण्याचा हक्कही नाही?
पुरुषांचं मानसिक आरोग्य हा सनसनाटी विषय नाही - ती शांत महामारी आहे. 
पुरुष बाहेरून हसतात, आतून तुटतात; शरीराने मजबूत दिसतात, पण मनाने गळून पडतात.
Pain दिसत नाही म्हणून Pain नसतं असं नाही.
भारताचं चित्र अतिकटू आहे-
पुरुषांमध्ये depression जास्त, anxiety जास्त, ताण जास्त…
पण मदत मागण्याचं प्रमाण सर्वात कमी.
कोणाला माहित असतं का की भारतामध्ये दर १ तासाला १ पुरुष आत्महत्या करतो ते.
वर्षभरात १.२० लाख पुरुषांनी आयुष्य संपवलं — महिलांच्या तुलनेत २.५ पट जास्त.
बेरोजगारी मध्ये, कामगिरीच्या प्रेशरमध्ये, कौटुंबिक कलहांमध्ये, घरगुती हिंसाचारामध्ये, sexual performance anxiety मध्ये आणि असंख्य अबोल अन्याय शोषणामध्ये, emotional isolation मध्ये अनेक पुरुष शांत राहतात वा तसे दिसतात… पण आतून मन हरलेले आणि हरवलेले असते.
आणि म्हणूनच International Men’s Day महत्वाचा आहे. हा दिवस पुरुषांना सामाजिक सिंहासनावर बसवण्यासाठी नाही…
तर पुरुषांना माणूस म्हणून ‘मान्यता’ देण्यासाठी आहे.
कारण सकारात्मक पुरुष म्हणजे फक्त filmstar किंवा sportsman नाही -
रोज शेवटची लोकल पकडून घरी येणारा पिता,
घरासाठी स्वतःची स्वप्नं बाजूला ठेवणारा पती,
आई–बाबांच्या साठी career बदलणारा मुलगा -
हेही रोल मॉडेल्स आहेत.
कुटुंब, समाज आणि नात्यांसाठी पुरुषांनी जे शांत योगदान दिलंय,
ते अस्फुट नाही - फक्त न बोललेलं आहे.
International Men’s Day हा पुरुषांच्या positive योगदानाचा उत्सव आहे -
कुटुंब चालवण्याच्या संयमाचा,
नाती टिकवण्याच्या समजुतदारपणाचा, मुलांसाठी केलेल्या त्यागाचा आणि आयुष्याला आधार देणाऱ्या शांत सहकार्याचा.
कौतुकासाठी पाठीवर थाप, गोड शब्द  मिळत नाही म्हणून contribution कमी होत नाही.
पण हा दिवस celebration इतकाच नाही तर तो पुरुषांच्या मन, शरीर, भावना, आत्मा आणि आत्मविश्वासाचा आरसा आहे.
पुरुष देखील रडू शकतो, त्यांचा मेंदू देखील overthink करतो, त्यांच्या झोपाही जातात,
त्यांच्या अंतरंगातही रिकामेपणा असते…
फक्त ते दाखवत नाहीत — कारण दाखवण्याची परवानगीच दिली नाही.
 या दिवसाचा उद्देश पुरुषांच्या mental, emotional, physical आणि spiritual wellbeing ला आवाज देणं आहे. तो त्या अदृश्य discrimination वर प्रकाश टाकतो -
जिथे पुरुषांना मदत मागण्याचा अधिकार नसतो, भावना व्यक्त करण्याची जागा नसते, रडलं तर shame मिळते,
शांत राहिलं तर blame मिळतो.
म्हणूनच हा दिवस एक वेगळ्या दृष्टीकोनातून gender balance शिकवतो.
 स्त्रियांना सन्मान आदर हवा - हे खरं.
पण पुरुषांनाही भावनिक oxygen हवा - हेही तितकंच खरं.
दोन्ही बाजूंचा आदर झाला की नाती जिंकतात - battle नाही, balance जिंकतो.
यंदाच्या International Men’s Day ची थीम -
“Celebrating Men and Boys.”
ही थीम पुरुषांचं गौरवगीत नाही…
ती पुरुषांच्या मानवी अस्तित्वाचा उत्सव आहे.
Celebrating म्हणजे त्यांना trophy देणं नाही - तर त्यांच्या presence, sacrifices, efforts, love, loyalty आणि संघर्षाला शब्द देणं, मान्यता देणं, आणि अभिवादन करणं. ज्या मुलांना भावनिक शब्दसंग्रह शिकवला, तर पुढे पुरुष होऊन depression मध्ये बुडत नाहीत. ज्या पुरुषांना बोलण्यासाठी जागा दिली, ते घर मोडत नाहीत — घर वाचवतात. पुरुष safe असले की society stable होते.
 मर्द को भी दर्द होता है…
आणि त्या वेदनेला आवाज देणं कमजोरी नाही , ती healing ची सुरुवात आहे.
तर मग सांगाः
उद्या International Men’s Day साजरा करणार आहात ना ?
साजरा करा… फुगे, केक आणि पार्टीने नाही तर साजरा करा त्या एका शांत पुरुषाला आवाज देऊन, त्या मुलाला मिठी देऊन जो रडायला घाबरतो, त्या पित्याला “थकला असशील रे” असं म्हणत.
या दिवसाचा अंतिम हेतू एकच -
एक सुरक्षित, समजूतदार जग तयार करणं, जिथे मुलं आणि पुरुष फक्त strong नाही तर…safe, peaceful आणि accepted असतील.
Wish all the men and boys around you…
क्यूंकी मर्द को भी दर्द होता है.

डॉ. सुरेश पाटील
मनोविकार तज्ज्ञ व लैंगिकता सल्लागार
वसई – नालासोपारा – विरार
📞 99872 30222

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...