1. गरुड एकटे आणि उंच उंचीवर उडतात. ते चिमण्या, कावळे आणि इतर लहान पक्ष्यांसोबत उडत नाहीत.
याचा अर्थ; संकुचित वृत्तीच्या लोकांपासून दूर राहा, जे तुम्हाला खाली आणतात. गरुड हा गरुडांच्या सोबतच उडतो. त्यामुळे चांगली संगत ठेवा.
2. गरुडांना अचूक दृष्टी असते. 5 किमी दूर असलेल्या एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची त्यांची क्षमता असते. कितीही अडथळे आले तरी, गरुड जो पर्यंत शिकार पकडत नाही तोपर्यंत त्याचे लक्ष भक्ष्यावरून हलवत नाही. याचा अर्थ; दूरदृष्टी ठेवा आणि कितीही अडथळे आले तरी लक्ष केंद्रित करा आणि तुम्ही यशस्वी व्हाल.
3. गरुड मृत वस्तू खात नाहीत. ते फक्त ताजे शिकार खातात. याचा अर्थ; तुमच्या भूतकाळातील यशावर विसंबून राहू नका, जिंकण्यासाठी नवीन सीमा शोधत राहा. तुमचा भूतकाळ जिथे आहे तिथे सोडून द्या.
4. गरुडांना वादळ आवडते. ढग जमतात तेव्हा गरुड उत्तेजित होतो, गरुड वादळ वाऱ्याचा वापर करून उंच उडतो. एकदा वादळाचा वारा सापडला की, गरुड वादळाचा वापर करून ढगांवरून वर येतो. यामुळे गरुडाला पंख फिरवण्याची आणि आराम करण्याची संधी मिळते. या दरम्यान, इतर सर्व पक्षी झाडाच्या फांद्या आणि पानांमध्ये लपतात. याचा अर्थ; तुमच्या आव्हानांचा सामना करा .आव्हाने तुम्हाला तुमच्यापेक्षा अधिक मजबूत बनवतील. जीवनातील वादळांचा उपयोग आपण अधिक उंचीवर जाण्यासाठी करू शकतो. कर्तृत्ववान माणसे अधिक उंचीवर जाण्यास घाबरत नाहीत. यश मिळवणारे आव्हानांना घाबरत नाहीत, उलट ते आव्हानांना सामोरे जातात.
5. उडण्याची गरुडाची तयारी. पिल्लांना उडण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी गरुड घरट्यातील पिसे आणि मऊ गवत काढून टाकतात .त्यामुळे पिलांना घरट्यात राहणे असह्य होते आणि पिल्ले उडण्याचा प्रयत्न करतात व शेवटी उडतात.
बोध : जिथे प्रगती नाही असा तुमचा कम्फर्ट झोन सोडा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा