सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३

478. एकाच या जन्मी जणु परत फिरुनी नवी जन्मेन मी....

      आयुष्य म्हटलं कि कष्ट आले, त्रास आला, मनस्ताप आला, भोग आले आणि जीव जाई पर्यंत काम आलं., मग ते घरचं असो नाहीतर दारचं, बायकांना तर म्हातारपणा पर्यंत कष्ट करावे लागतात. 75 वर्षाच्या म्हातारीने पण, भाजी तरी चिरुन द्यावी, अशी घरातल्यांची अपेक्षा असते. हि सत्य परिस्थिती आहे.
आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत हे रहाणारच, त्यामुळे हि जी चार भांडीकुंडी आपण आज निटनिटकी करतो, ती मरेपर्यंत करावी लागणार, ज्या किराणाचा हिशोब आपण आज करतो तोच आपल्या सत्तरीतही, करावा लागणार, "आई म्हातारी झाल्यावर, माझी मुलं खुप शिकल्यावर त्याच्या कडे खुप पैसे येतील, मग माझे कष्ट कमी होतील" हि खोटी स्वप्न आहेत.
😌.मुलं, मुली कितीही श्रीमंत झाले तरी "आई बाकी सगळ्या कामाला बाई लाव पण जेवण तु बनव, असं म्हटलं कि झालं, पुन्हा सगळं चक्र चालु आणि त्या चक्रव्युहात आपण सगळ्या अभिमन्यी.
पण, पण जर हे असंच रहाणार असेल. जर परिस्थिती बदलु शकत नसेल तर मग काय रडत बसायचं का ??, तर नाही. परिस्थिती बदलणार नसेल तर आपण बदलायला हवं.
मी हे स्विकारलय. खुप अंतरंगातुन आणि आनंदाने... माझा रोजचा दिवस म्हणजे नवी सुरुवात असते, खुप उर्जा आणि उर्मी नी भरलेली.
सकाळी सात वाजता जरी कुणी मला भेटलं, तरी मी तेवढ्याच उर्जेनी बोलु शकते आणि रात्री दहा वाजता ही, आदल्या दिवशी कितीही कष्ट झालेले असु देत, दुसरा दिवस हा नवाच असतो.
काहीच नाही लागत हो, हे सगळं करायल., रोज नवा जन्म मिळाल्या सारखं उठा, छान आपल्या छोट्याश्या टेरेस वर डोकावुन थंड हवा घ्या. आपणच प्रेमाने लावलेल्या झाडावरून हात फिरवा.🪴🌳
आपल्या लेकीला झोपेतच जवळ घ्या, इतकं भारी वाटतं ना, अहाहा, सकाळी उठल की ब्रश करायच्या आधीच रेडिओ लागतो. माझा अभंग ऐकत ऐकत मस्त डोळे बंद करून ब्रश केला, ग्लास भरुन पाणी पिलं आणि मस्त, आल्याचा चहा पित,  खिडकी बाहेरच्या निर्जन रस्त्याकडे बघितलं ना, कि भारी वाटतंं👌👍.
रोज मस्त तयार व्हा. आलटुन पालटुन स्वतःवर वेगवेगळे प्रयोग करत रहा, कधी हे कानातले, कधी ते गळ्यातले. कधी ड्रेस. कधी साडी, कधी केस मोकळे, कधी बांधलेले, कधी हि टिकली तर कधी ती... सगळं ट्राय करत रहा. नवं नवं नवं नवं, रोज नवं, रोज आपण स्वतःला नविन दिसलो पाहिजे
स्वतःला बदललं कि आजुबाजुला आपोआपच सकारात्मक उर्जा पसरत जाईल, तुमच्याही नकळत आणि तुम्हीच तुम्हाला हव्या हव्याश्या वाटु लागाल.
मी तर याच्याही पार पुढची पायरी गाठलेली आहे. माझ्या बद्दल नकारात्मक कुणी बोलायला लागलं कि माझे कान आपोआप बंद होतात. काय माहित काय झालंय त्या कानांना....😃
आता मी कितीही गर्दीत असले तरी मी माझी एकटी असते. मनातल्या मनात मस्त टुणटुण उड्या मारत असते.
जे जसं आहे. ते तसं स्विकारते आणि पुढे चालत रहाते. कुणी आलाच समोर कि.."आलास का बाबा बरं झालं  म्हणायचं. पुढे चालायचं, अजगरा सारखी, सगळी परिस्थिती गिळंकृत करायची..
माहीत आहे मला सोपं नाहीये, पण मी तर स्विकारले आहे. आणि एकदम खुश आहे. आणि म्हणुनच रोज म्हणते...
" एकाच या जन्मी जणु...
फिरुनी नवी जन्मेन मी...
हरवेन मी हरपेन मी..
तरीही मला लाभेन मी....."

सुधीर मोघें

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...