बुधवार, ९ ऑगस्ट, २०२३

470. एक चुकीचे कर्म..

       एक चुकीचे कर्म तुमच्या ९९ चांगल्या कर्मावर पाणी फिरवते. कथा आहे महाभारतातील ! कर्ण चारित्र्यवान, दानशूर होताच तितकाच तो प्रजेसाठी सतत जागृत होता. त्याच्या दारी आलेल्याला कधीही त्याने रिकाम्या हाताने पाठवलं नव्हतं. प्रसंगी अगदी स्वतःची कवच कुंडले सुद्धा रूप बदलून आलेल्या इंद्राला देऊन टाकली होती ! इतकं सगळं असताना शेवटच्या महायुद्धात कृष्णाने अर्जुना करवी कर्णाला पाठीमागून बाण मारायला लावून मारले. हे अनेकांना न उलगडलेले कोडे ! तेच कोडे रुक्मिणीला सुद्धा पडलेले ! युद्ध संपल्यावर कृष्ण जेव्हा घरी आला तेव्हा तिने त्याला विचारले  "कर्ण सर्व बाबतीत निर्दोष होता तरी तुम्ही त्याला का मारले..?" त्यावर कृष्णाने सांगितलं की,  "नक्कीच कर्ण दानशूर होता, चारित्र्य संपन्न होता. याचकाला कधीही त्याने विन्मुख पाठवले नाही. अशी अनेक चांगली कामे (कर्म) त्याने केले. मात्र जेव्हा अभिमन्यूने लहान वयातही कौरवांचा चक्रव्यूह भेदून आत प्रवेश केला होता तेव्हा खरेतर त्याने सर्वाना जणू पराभूत केलेच होते त्यामुळे तिथून बाहेर पडणे इतकेच बाकी होते. मात्र बाहेर पडण्याचा मार्ग त्याला सापडत नव्हता अन त्याचा फायदा घेऊन कौरवांनी त्याला मारले. त्यावेळी मरताना अभिमन्यूने त्याच्या जवळच उभ्या असलेल्या कर्णाला पाणी मागितले. कर्णाच्या पाठीमागेच जवळ एक खड्डा होता ज्यात स्वच्छ पाणी होते. मात्र तिथले पाणी आणून अभिमन्यूला दिले तर दुर्योधनाला वाईट वाटेल, त्याला ते आवडणार नाही असं समजून कर्णाने पाणी दिले नाही. आणि मग तहानेने व्याकुळ झालेल्या अभिमन्यूने तडफडत प्राण सोडला.
        त्यामुळे कर्णाने आयुष्यभर केलेल्या  सर्व चांगल्या कर्मावर पाणी फिरले. त्यामुळे "कर्म परत येतेच" याप्रमाणे नंतरच्या महायुद्धात कर्णाच्या रथाचे चाक त्याच खड्यात अडकले जिथे पाणी साठले होते (जे कर्णाने अभिमन्यू ला पाजले नाही) त्यामुळे त्या खड्यातच रथाचे चाक अडकणे हे कर्म परत येणे आहे. त्यामुळे त्याने चांगल्या केलेल्या कर्माचा एका वाईट कर्माने नाश झाला. त्यामुळे त्याला मारावे लागले. कर्ण हा 99% महान व 1% लहान की 1% महान की 99% लहान याला काहीच अर्थ नाही. जोपर्यंत दुसर्‍याच्या जिवाची पर्वा नसते, जीव वाचविण्याचा प्रयत्न नसतो, जीवदान हातात असून देत नाही तोपर्यंत व्यक्तीं पापीच. अशा पापी व्यक्तीच्या भल्यासाठी मग तो राजा असो नसो दुसऱ्याकडे शिफारस करणे  हे धर्मात नाही असे श्रीकृष्ण म्हणतात. 
तात्पर्य:  सातत्याने, कर्म रिटर्न्स हे नक्की आहे.  चांगले काम करत रहा. वाईट कधीच कुणाचे करू नका. मग तुमच्या चांगल्या कर्माचे फळ  चांगलेच तुम्हाला मिळणार. नाहीतर तुमचे जहाज खूप चांगले आहे. मजबूत पण आहे. सुंदर देखील आहे. मात्र त्यात तळाशी एक बारीक छिद्र असेल तर ते जहाज नक्कीच आज न उद्या बुडणार. एक वाईट काम सगळ्या चांगल्या कामावर बोळा फिरवते. हातात धर्म, मुर्ती ठेवण्यास, वाढविण्यास देणे यापेक्षा हाताला काम, नोकरी देणे हे राज्यकर्त्याचे , प्रमुख प्रधानजी चे काम. कलीयुगात अर्थात सध्याच्या युगात धर्मनिष्ठा महान की पोट निष्ठा? कोणत्याही व्यक्तीला विचारले तर उत्तर येते "पोट निष्ठा ". चाणक्य पुढे म्हणतात, राजा अथवा प्रमुख विवाहीतच पाहीजे. ज्याला कुटुंब चालविण्याचा अनुभव तो राज्य चांगल्या प्रकारे चालवतो. विवाहीत नसलेला राजा हा विचारहीन, क्षीण, मलीन दृष्टीचा. मग कसे राज्य चालविणार? अशा राजाचे, राज प्रमुखाची शिफारस अथवा गोडवा मित्राकडे, समाजाकडे करणार्‍या व्यक्तीं धर्म व मानवी जीव बुडवतात. अशा राजाचा व व्यक्तींच्या जीवनाची अखेर कुष्ठरोग झालेल्या, खितपत पडलेल्या अवस्थेत होते.  हे कायम लक्षात घ्या.

संकलन  -संदीप संत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...