सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३

491. शास्त्र असे सांगते...

        आपण जप करतो त्या जपाचा आपल्या जीवनावर परिणाम काय होतो? आपण थोरा मोठ्यांनि सांगीतलं. म्हणुन जप, मंत्र, स्तोत्र, ग्रंथ पारायण करतो. मंत्र म्हणजे मननात त्रायेति मंत्र: म्हणजे मनाचे रक्षण करणारा मंत्र आहे. भारतीय लोकाना मिळालेल हे फार मोठा वरदान आहे. वेद, ग्रंथ  हे आपल्या ऋषि मुनींनी केवळ अन केवळ आपल्यासाठी हिन्दू जनासाठी कल्याणकारी ठेव योजनाच करुन ठेवली, पण आपल्याला त्याचं कुतूहल नाही.
असो, मंत्र हे काय काम करतात हे आपण बघु. साधकानी स्वच्छ जागा शोधुन तिथं दर्भासन, लोकरीचे, किंवा धाबळी, कोणतेही आसन घेऊन पूर्वाभिमुख बसावे. ज्या देवतेची आराधना करावयाची आहे, त्याची पूजा पंचोपचार करावी व नामस्मरण सुरु करावे. मोबाईलचा टॉवर ज्या प्रमाणे काम करतो, त्याच प्रमाणे वैश्विक ऊर्जा काम करते. मंत्र म्हणत असताना ऊर्जा तयार होते. त्या वैश्विक ऊर्जेपर्यंत आपली ऊर्जा जाते. त्या देवतेची आकृति ब्रम्हांडात तयार होते. ती दैविक ऊर्जा परत साधका पर्यंत येते. सात्विक ऊर्जा आपलं मनोबल वाढवुन कार्यात यश देते. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे भक्त प्रहलाद ह्यानी नामस्मरण सुरु केले, त्याच्याकडुन निघणारी ऊर्जा व देवते कढुन येणारी ऊर्जा ह्याचे परस्पर घर्षण होत होते. असे बरीच वर्षे होऊन एक वेगळी ऊर्जा प्रकाशमय आकृतिच्या रुपात तयार झाली. ती म्हणजेे प्रत्यक्ष परमेश्वरच होय. हाच मंत्राचा परिणाम होय.
त्याच प्रमाणे अलिकडच्या काळात घडलेली घटना म्हणजे, सदगुरू समर्थ रामदास स्वामी हे ज्या ठिकाणी संध्या, स्नानाला जात नदी काठी, त्या ठिकाणी भल मोठे वानर येत असे महाराजांचा राम नामाचा जप चालू असे. पण महाराजानी त्या वानराकडे लक्ष कधीच दिल नाही. पण वानर नेहमी त्यांच्याकडे पाहत असे. हा उपक्रम बरेच वर्ष चालू राहिला. परंतु एके दिवशी त्या वानराने महाराजांना मिठी मारली, तेव्हां महाराजांच्या मुखातुन भिमरुपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती स्तोत्र अंतःस्फुरतीतुन निर्माण झाले. तेव्हां महाराजांचा राम नामाचा जप तेरा कोटी झाला होता, हा मंत्राचा परिणाम. तसाच अनुभव परमपुज्य गोंदवलेकर महारांजाना आला. त्यांचा तेरा कोटी जप पुर्ण झाल्यावर प्रत्यक्ष प्रभु रामचंद्रानी दर्शन दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...