बुधवार, ९ ऑगस्ट, २०२३

468. अत्यंत महत्वाचे...

      दोन पाय त्यामधील अवयव अत्यंत vital असा. त्यावर क्रिकेट खेळताना चुकून जरी बॉल लागला तर जीव जातो की राहतो अशी अवस्था होते. तसेच शर्टाची बटणे मोजा आणि तिसरे बटन लक्षात घ्या. जिथे बरगड्या संपून पोट चालू होते. इथे जठर, यकृत, स्वादुपिंड असे मऊ अवयव असतात आणि तिसऱ्या बटनाचा भाग अत्यंत जीवघेणा बनू शकतो. केव्हा? जेव्हा तिथे जोरदार प्रहार होईल तेव्हा!!! बॉक्सिंगमध्ये एक खास ठोसा असतो त्याला 'हुक' म्हणतात. त्यात जमिनीकडून वर आकाशाकडे मूठ जोरदार रीतीने आणून ठोसा दिला जातो. तो खास ठोसा हनुवटी वर मारला जातो. तर हाच हुक त्या तिसऱ्या बटनाखाली वरील कृतीने हाणला तर कोणताही गडी क्षणात आडवा होतो. आयला....मी एक डॉक्टर असून हे मारामारी व जीवघेणे शॉट्स का सांगत आहे? तर विषय 'बलात्कार' हा आहे.
    आया, बायांनो, माय, भगिनींनो नीट वाचा, लक्षात ठेवा जेव्हा एखादा अनाचारी तुमच्याशी लगट करायला लागला की जीव खाऊन या दोन जागी हल्ला करा. तुम्हाला जमिनीवर आडवं पाडल्यावर दुराचारी तुमचेवर अत्याचार करू बघेल त्यावेळी थोडं सावध मन ठेवून बेशुद्ध पडल्याचं नाटक करा. तो त्याची पॅण्ट काढेल काढू द्या. तो तुमच्या अंगावर ओणवा व्हायला लागला रे लागला की त्याच्या दोन पायात अशी किक हाणा की त्याला त्याच्या सात पिढ्या आठवतील. डोळे हा एक आणखी अत्यंत महत्वाचा भाग. डोळ्यात सरळ बोटे, नखे रुतवावी.
या प्रसंगी फक्त मन हरू देऊ नका. शरीरात इतकी ऊर्जा निर्माण होईल की पूछो मत फक्त वरील माहिती नीट लक्षात ठेवा. घरी, ऑफिसमध्ये, किटी, भिशी इथे एकेमकात गप्पा मारता तर याची मारामारीची प्रॅक्टिस आवर्जून करा. पुन्हा एकदा उजळणी
1)दोन पाय व त्यामधील अवयव.
2)शर्टाचे तिसरं बटन.
3)डोळे.
- डॉ नील वाघमारे उर्फ क्षणस्थनील बाकी शून्यच 
अत्यंत महत्वाचा संदेश... वाचा आणि शक्य तेवढ्या महिलावर्गापर्यंत पोहोचू द्या....
छायाचित्र साभार - गुगल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...