सोमवार, २३ ऑक्टोबर, २०२३

605. हिशोब का ठेवायचा...?

 काळाच्या निरंतर वाहत्या प्रवाहामध्ये..
आपल्या थोड्या वर्षांचा..
हिशोब का ठेवायचा ..! ! 

आयुष्याने भर भरून दिले असताना..
जे नाही मिळाले त्याचा..
हिशोब का ठेवायचा..!! 

‌मित्र‌.. मैत्रीणींने दिले आहे,
अलोट प्रेम ईथे...
तर शत्रूंच्या बोलण्याचा,
हिशोब का ठेवायचा..!! 

येणारा प्रत्येक दिवस,
आहे प्रकाशमान ईथे..
तर रात्रीच्या अंधाराचा,
हिशोब का ठेवायचा..!! 

आनंदाचे दोन क्षण ही,
पुरेसे आहेत जगण्याला..
तर मग उदासिनतेच्या,
क्षणांचा..
हिशोब का ठेवायचा..!! 

मधुर आठवणींचे क्षण,
इतके आहेत आयुष्यात..
तर थोड्या दु:खदायक गोष्टींचा..
हिशोब का ठेवायचा..!! 

मिळाली आहेत फुले इथे,
कित्येक सहृदयांकडुन..
मग काट्यांच्या टोचणीचा..
हिशोब का ठेवायचा..!! 

चंद्राचा प्रकाश आहे,
जर इतका आल्हाददायक..
तर त्या वरील डागांचा 
हिशोब का ठेवायचा..!! 

जर आठवणीनेच होत असेल,
मन प्रफुल्लित ..
तर  न भेटण्याचा,
हिशोब का ठेवायचा..!! 

काही तरी खुप चांगलं आहे सगळ्यांमधे..
मग थोड्या वाईटपणाचा,
हिशोब का ठेवायचा..!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...