खर तर दोन्ही परिवारांचे सम्मेलन होणे, लग्नाआधी भरपूर विचार विमर्श होणे आवश्यक आहे . काल एक बातमी वाचली . मागच्या पन्नास वर्षांत जेवढे घटस्फोट झाले नाहीत , त्यापेक्षा जास्त घटस्फोट या पाच वर्षांत झाले. ही बातमी भयंकर आहे . धक्कादायक तर आहेच , बरोबर खूप विचार करायला भाग पाडणारी आहे . अस का होतय? कुठे चूक होतेय ? समाजाचा पाया असा का डगमगतोय ? मानसिक स्वास्थ्य बिघडलय का ? फोकस बदललाय का ?? आपल्या मुलांवर स्वतः पेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या आई वडिलांचे कुठे चूकतय का ?? माझा मुलगा किंवा मुलगी नेहमी आनंदी सूखी राहावे, असे रोज सकाळ संध्याकाळ देवाजवळ प्रार्थना करणारे आई वडिल मुलांना समजाविण्यात कमी पडतायेत का ? अपेक्षा वाढल्यात का ? सहनशक्ती कमी झाली का ? उच्च शिक्षित असणारी ही आजकालची मुल बेशिस्त वागतायेत का ?? मला कोणाची गरज नाही. असा विचार करतायेत का ?? खर तर जीवनस्तर वाढलाय. नवीन जगात भरपूर सोईंमुळे रोजचे आयुष्य सहज झालय. पण आनंदी जीवनाची परिभाषा बदलली आहे का? फोकस बदलला आहे का? न्युक्लिअर परिवार हे कारण आहे का ? Home Science पेक्षा अर्थ शास्त्र जास्त महत्वाचे झाले आहे का ?? Out side management बघता बघता inner म्हणजे आपल्या विचारांचे management करणे जमत नाहीये का? ऑफिस मध्ये अनेक जणांशी adjust करता येत पण घरातील चार लोकांशी adjust करता येत नाही .
खर तर लग्न आणि पूढे आनंदी , सुखी संसार ही दोन्ही पक्षांची गरज आहे . लग्न म्हणजे एक सामाजिक बंधन आहे . प्रत्येकाची गरज आहे. लग्न म्हणजे सुरक्षा , आधार, सामाजिक मान्यता आहे . आयुष्यात स्थिरता पाहिजे ना? सुख दुःखात सहभागी होणारा पार्टनर नको का ? लग्न कधीच अचानक ,एकदम होत नाही. म्हणजे बाजारात गेलो आणि लग्न ठरवून आलो .कपडे खरेदी केल्यासारख. अस लग्न कधी जमत नाही . मग ते love marriage असो ,नाही तर Arrange marriage असो. Live in relationship हा नवीन concept असो. एकमेकांना बघून, भेटून विचार करून सर्व चौकशी करून होत. मग गडबड कुठे होते ? कोणत्या वळणावर आपल पटणार नाही अस ठरवून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्या जातो. एवढ एकदम काय बिनसत? की बरोबर रहायला तयार नसतात
Perfect 10 अस कधी काही नसतच. आभाळाकडे तर कुठे, जमीन आहे.
खर तर लग्न successful करणे ही मुला मुलीची जबाबदारी तर आहेच, बरोबर दोन्ही घरच्या प्रत्येक सदस्याची ची पण जबाबदारी असते. त्यांना Supporting role मध्ये वागायचे असते आणि कुठे थांबायचे? हे पण कळले पाहिजे. दोन्ही पार्टीच्या प्रत्येक मेंबर्स चा रोल पण तेवढाच महत्त्वाचा असतो. आपले restrictions , limitations interference किती असावा ?? हे समजलेच पाहिजे. सासू ,नणंद तर या पारिवारिक सिनेमाचे मुख्य कलाकार आहेत. असा साधारण समज आहे . परंतु घरातील पुरूषांचा रोल पण तेवढाच महत्त्वाचा असतो. आज सकाळच्या या बातमीने मन विचलित झाल. या बातमीला चाचपडून बघाव, म्हणून मी सहज मागच्या दोन तीन वर्षांत जी लग्न attend केली , त्या सर्वांचे present status चेक केले .तर खरंच लक्षात आलं की जवळ जवळ मी सात लग्न attend केली आणि त्यांच्यातील तीन मुली घरी परत आल्या आहेत. मध्यमवर्गीय परिवारांची ही परिस्थिती भयावह आहे.
तो उत्साह, तो अमाप खर्च, ते दागिने, भारी साड्या ,ते चार दिवस संपन्न होणारे विविध समारंभ , ते फोटो सेशन्स, Pre wedding session ,beauty parlour मध्ये खर्च केलेले ते लाख रुपये, ते आणेभाके, ती सात वचन, घरातील सर्वांचे emotions, मोठयांचे आशिर्वाद सर्व मुसळ केरात. कशाचेचे महत्व नाही, किंमत नाही, कोणाची काळजी नाही . ना घरच्यांची ना स्वतः ची. माझं असं म्हणणं अजिबात नाही की , परिस्थिती काहीही असो, किती ही त्रास झाला तरी लग्न टिकवायचेच. परंतु थोडा वेळ घ्यावा. लहान सहान कारणांवरून लगेच वेगळं व्हायचं decision घेणे बरोबर नाही. आता पुन्हा अस म्हणायची वेळ आली आहे का? की ती जूनीच कांदे पोहे वाली पद्धतच चांगली होती.
आमच्या लग्नाला आता या नोव्हेंबर मध्ये पन्नास वर्ष पूर्ण होतील .आजही स्वभावाची एखादी वेगळी छटा दिसतेच .adjustment आजही करतोच. आता तर जग किती बदललय. मुला मुलींच्या होकारा शिवाय लग्न ठरतच नाहीत. आधुनिकतेच्या नावाखाली लग्ना आधी भेटी गाठी होतात. मग अस काय विचारायचे राहून जाते. ?? commitments नाही की विश्वासाची कमी की ego मध्ये येतो. मज्जा , Privacy , freedom आधुनिकता ,अति आत्मविश्वास अति महत्वाकांक्षा? की बाकी सदस्यांची लुडबुड? काय कारण असावे? जेव्हा आपल्या मुलाचे लग्न करायची वेळ येते, तेंव्हा कळत किती टेन्शन असत ते. यावर्षी ताईच्या परागचे लग्न करायचे आहे .विवाह संस्थेत नाव नोंदणी झाली आहे .मुली short list करणे हा मुख्य उद्देश्य. परागने आधीच सांगून ठेवले आहे . सुंदरते पेक्षा फॅमिली महत्वाची आहे . मला लग्न टिकवायचे आहे. पल्लवी देशमुख या मुलीला short list केले . सध्याची परिस्थिती बघता परागने आई बाबांना विश्वासात घेऊन सर्व सूत्रे आपल्या हातात ठेवली . सर्व मीटिंग एकत्र बसूनच होणार हे त्याने जाहीर केले. परागने आज देशमुख मंडळीला घरी येण्याचे आमंत्रण दिले. दोन्ही कडून पसंती सांगितल्यावर पराग म्हणाला, तुम्ही सर्व मोठे उपस्थित असताना मी बोलतोय याबद्दल गैरसमज करून घेऊ नये. माझ म्हणणं ऐकून घ्या. फक्त मीच नाही सगळ्यांचीच पूर्ण विचार करून स्पष्ट बोलावे. हे माझे म्हणणे आहे . आपण पूढच्या मीटिंग मध्ये marriage counselor ला पण बोलवू . त्यांचे अनुभव ऐकू. ती सर्व कारणे ज्यामुळे लग्नानंतर समस्या निर्माण होतात त्या लग्ना आधी ऐकू . म्हणजे Marriage counselor जवळ लग्नानंतर जाण्याची गरज पडणार नाही . आणि येथे लग्न करायचे की नाही असे विचार तुमचे आणि आमचे दोघांचे स्पष्ट होतील. म्हणतात ना, वेळ निघून गेल्यावर, केलेली किंमत त्याच काहीही वाटत नाही. मला माझ आयुष्य लग्नानंतर complete करायचे आहे .Finish करायचे नाही . जीवनाचा आनंद घ्यायचा आहे. दोन्ही घरचे तुम्ही सर्व मोठे आमच्या साठी नेहमीच आधार असणार आहात. तुम्ही आमची support system आहात. आम्हाला गरज पडल्यास आम्ही तुमचाच सल्ला घेणार आहोत . तुम्ही प्रेमापोटी काळजीपोटीच सल्ला दयाल .फक्त एकच विनंती आहे ती म्हणजे आमची ही मोहीम आम्हाला लढू दया. आम्हाला दोघांना एकमेकांना समजायचा वेळ द्या. आम्हाला adjust व्हायला वेळ लागणार आहे . आम्ही एकमेकांना समजून घेऊ. तडजोड करू. एकमेकांचा हात घट्ट पकडून ठेवू. फक्त एक विचार मी पण चूक करू शकतो एकदा मान्य केला तर खूप विरोध वाद कमी होतात. विश्वास नात्याची पहिली पायरी आहे . तडजोड दोन्ही कडून अपेक्षित आहे, बरोबर आहे. म्हणतात ना, जस भजनात सुरपेटी एकटी असून चालत नाही. त्याला तबला, मृदुंग ,टाळ यांची साथ लागतेच तेंव्हाच त्या भजनाला रंग चढतो. ते प्रभावी होत. तसेच आयुष्याचा प्रवास चांगला होण्यासाठी एकट राहून चालत नाही. प्रेमळ कुटुंबियांची साथ लागतेच. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकमेकांना समजून घेणारे नवरा बायको असतील , तर तो प्रवास जास्त चांगला सुखकर आनंददायी होतो.
संध्या बेडेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा