रावण जळत असताना रावणाने
हसून गर्दीकडे बघितलं
तपासा स्वतःच्या चारित्र्याला
मोठ्यानं त्यानं विचारलं. || धृ ||
हसून गर्दीकडे बघितलं
तपासा स्वतःच्या चारित्र्याला
मोठ्यानं त्यानं विचारलं. || धृ ||
केलाय मी गुन्हा
सीतेचं अपहरण करण्याचा
प्रयत्न नाही केला
मर्यादेची सीमा ओलांडण्याचा. || 1 ||
दिवसाढवळ्या रस्त्यावर
अब्रूचे लचके तोडतात
सभ्यपणाचा आव दाखवून
दरवर्षी मला जाळतात. || 2 ||
तुम्हा मानवां पेक्षा
राक्षस ठरलो भारी
केला नाही अपमान
सीतेचा माझ्या दारी. || 3 ||
हुंड्याच्या लालसेपोटी
तुम्ही हजारो सीता जाळल्या
वंशाच्या दिवट्या साठी
गर्भात कळ्या मारल्या. || 4 ||
हक्क नाही तुम्हांला
मला बदनाम ठरवण्याचा
प्रयत्न करा तुम्ही
स्वतःचे चारित्र्य सुधारण्याचा. || 5 ||
तुमच्या समाधानासाठी
दरवर्षी मला पेटवा
पण पेटवण्याआधी
पण पेटवण्याआधी
तुमच्यातील राम मला दाखवा || 6 ||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा