सोमवार, २३ ऑक्टोबर, २०२३

617. गुलाल....

  गुलाल हा गुलाबी मातीचे खानीतील दगडा पासून तयार केलेला भुकटी युक्त पदार्थ असतो.गुलाल हा हळद व लिंबू चे मिश्रणात गुलाबी रंग मिश्रीत करुण सुध्दा गुलाल बनविल्या जातो..पण तो गुलाल खुपचं महागडा होतो.गुलाल हा मुख्यत्वे हिंदू धर्मातील धार्मिक उत्सव , पूजाअर्चा, लग्नसमारंभ,मरण,तोरण ह्या विधींसाठी अत्यंत उपयुक्त असलेला पुजेतील साहित्य घटक आहे.
     संपूर्ण गाव कसं आज आनंदाच्या ओझ्याने वाकलं होत.कारण आज गावभर पोत्याने  गुलालाची मुठभर भरुन गुलालाची उधळण होणार होती.तशी आमच्या गावची गढीची माती पांढरी आणि शेतातील माती काळीशार चिकणी माती.त्यात गुलाबी रंगात माखलेला गुलाल.हा रंग गुलाबी उठून दिसत होता.मारोती महाराजांच्या सप्त्यांचा शेवटचा दिवस गावभर दिंड्यांचा ढोलांचा गजर. तेव्हा चालता बोलता माणसांचे प्रत्येकाचे जवळील खिष्यात गुलालाची पुडी.. ज्यांचे त्यांचे तोंडाला गुलालच गुलाल..
     दहीहंडी सुरु असतांनाच गुलालाची उधळण करायची प्रथा.त्यात गोपाल काला म्हटलं की पक्का गुलाल कपड्यावर व अंगावर चीपकून बसावा असा प्रस़ग..अगोदर दहीहंडीच्या दह्याचा ओलावा ठेवणारा दही गोपाल करीत केलेला मारा व त्यावर गुलालाचा फव्वारा घट्ट बसायचा. गुलालाचा रंग कपडे फाटे पर्यंत सख्य वाढविणारा प्रेमळ गुलाल..
      मुलामुलींच्या लग्न सोहळ्यात  व्याही भेट घेतांना एकमेकांच्या गालाला लावतात तो ही सोयरीकीचा गुलाल.मुलामुलींचे मामा उरभेट घेतांना एकमेकांच्या गालाला लावतात तो घट्ट नात्यांचा गुलाल.जेव्हा नवरी सासरी जाण्यासाठी सारं होतो. तेव्हा वधू पक्ष वर पक्षाला आग्रहाने कपाळी लावतो तोही गुलाल.आता लवकर जा तूमचे घराला तूमची सरबराई संपली‌.असा अलिखीत संकेत देणारा प्रतिनिधित्व गाजवणारा गुलाल..तूम्ही आता आमचे गावचे शीवेत घुटमळू नका असंही वर पक्षाला तंबी देणारागुलाल.आता  गुलाल लागलाय..जा..
     होळीच्या सणातीलच रंगपंचमीचा सण.हा सण भेदभाव विसरून होळी खेळतांना एकमेकांच्या अंगावर जातपात विसरून रंग उधळणारी ती गुलालाची आतिषबाजी..गुलाल पिचकारीत भरुणई अंगावर उधळल्या जातो.. सर्व लोक वय विसरून गुलालाचे संगतीत गुलाबी होवून गुलाल फेकत माखत रस्त्यांनी डोळ्यांचे तालावर डौलात चालतात..एकमेकांची मस्करी करीत नात्याचे बंधन तोडून जातपात विसरून गावगाड्यातील थटृटयाचे नाते जपणारा गुलाल..
     नागपंचमीचे सणात गुलाल बुक्का लावून नागदेवतेची मनोभावे पुजा करणारी ती अरबाळी  मंडळी..त्यांनी आपापल्या कपाळाला गुलालाचे मरवट भरुणच महादेवाचे गाणे व बारी म्हणतात..रस्त्यांनी चालतांना त्यांचे ठाव्यांचे भजनात  रंगणारा तोच खरा गुलाल..
    दर सोमवारी भोलेभक्त महादेवाला बेल फुलांसोबत चढावा देतात तो संगत देतो गुलाल.महादेवाला गुलाल कपाळी लावने हे भस्म लावल्या सारखेच मानल्या जातो..गुलाल रंग लाल गुलाबी असल्या मुळे रंगसंगतीने तो कपाळावर उठून दिसतो..प्रत्येक व्यक्ती त्या वेळेला स्व:ता दैवी स्वरुप समजून दिमाखात ऐटीत चालत असतो..तसे चालण्यासाठी भाग पाडतो तो कपाळावरील गुलाल..
      मय्यताचे संपूर्ण अंगावर  गुलालाची उधळण केल्या जातो.तसेच खादकरी तिरडीचे जेव्हा खांदे बदलविण्या साठी विसावा घेतात..त्या विसाव्याचे साहित्यात गुलाल एक महत्वाचा घटक असतो.मय्यताचा राखड सावडणे कार्यक्रम त्यातही गुलाला महत्वाचे स्थान दिलेले आहे.दशकिरयेतही गुलाल आपली महत्वाची भुमिका बजावत असतो..गुलाला शिवाय कामच भागत नाही असी ही  परंपरा आहे..
    निवडणूक आणि नेत्यांची निवडणूक जिंकल्यानंतर ची मिरवणूक काढतात.त्या मिरवणुकीत गुलाला शिवाय ती मिरवणूक पुर्णत्वास जातच नाही. गुलालाची उधळण ही तर खरे शौर्याचे प्रतिक आहे की काय? असे म्हणावयास वावगे होणार नाही..
     गणपती उत्सव असो वा देवीची मिरवणूक असो गुलाल हा उधळलल्याच जातो.एकमेकांना गुलाल लावून आनंद व्यक्त केल्या जातो.अश्या मिरवणूक मध्ये समाजात तेढ निर्माण होवू नये म्हणून विशिष्ट धर्माचे धार्मिक स्थळ कापडा़नी झाकल्या जातो.त्या इमारतीवर गुलालाचा डाग पडू नये म्हणून.ही खबरदारी घेतल्या मुळे बाकी अनर्थ टळतो.
       गुलाल हा जगण्याचे अंग असून दैनंदिन जीवनातील पुजा प्रकारातील अविभाज्य अंग बनलेल एक रसायन आहे. त्याचा वापर जन्मा पासून तर मृत्युपरयंत त्याचाच सहवास असतो..गुलाल हा रंगीत असून गंधीत ही असतो..जिवनात रंगही तोच भरतो व गंधही तोच उधळत असतो.म्हणूनच गुलाल अखीर गुलाल है...
हाच तो गुलाल..
(कथा सत्तेवर आधारीत आहे)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...