बुधवार, ११ ऑक्टोबर, २०२३

583. भौतिक...नोबेलच्या निमित्ताने...

      या विश्वातील सगळ्या भौतिक वस्तू या Atoms पासूनच बनल्या आहेत. आणि सर्व Atoms हे परत Sub-Atomic Particles पासून बनले आहेत. पण या Atoms च्या आतमध्ये काय चालले आहे याचा छडा लागला तर बऱ्याच गोष्टींचा बोध होईल. पण हा छडा लावणे हे महामुश्किल काम आहे. कारण हे Atoms एक तर डोळ्यांना दिसत नाहीत. आणि दुसरा त्याच्याहूनही मोठा प्रॉब्लेम म्हणजे ते अतिशय वेगाने फिरत असतात. समजा एखादा सिलिंग पंखा जोरात फिरत आहे. आणि तो बंद न करता त्यावर आपले नांव कोरणे शक्य आहे काय?  तर उत्तर आहे की सहज शक्य आहे. ज्या वेगाने तो पंखा फिरत आहे, त्याच वेगाने आत - बाहेर होणारे बॉलपेन घेतले तर दोघांचाही वेग एकसारखाच असल्यामुळे त्या बॉलपेनसाठी तो पंखा (Virtually ) स्थिरच असेल व त्यामुळे त्या पंख्यावर त्या पेनने लिहिणे सहज शक्य होईल. वेगाने फिरणाऱ्या हेलिकॉप्टरच्या पात्याचे किंवा Hummingbird चे फोटो काढण्यासाठी देखील हेच तंत्र वापरतात. तर आता हे Atoms किती वेगाने फिरतात?
        तर एका सेकंदाचे आधी एक अब्ज म्हणजे 1000000000 इतके भाग करा. त्यातील एक भाग घ्या. त्या भागाचे परत एक कोटी म्हणजे 10000000 इतके भाग करा. त्या भागाला म्हणतात एक Femtosecond. तर तो Atom एका Femtosecond मध्ये एक Oscillation पूर्ण करतो. एक हमिंगबर्ड उडत असताना त्याच्या पंखाची जी हालचाल होत असते तीचा वेग असतो एका सेकण्डला 80. म्हणजे एका सेकंदाचा केवळ 80 वा भाग. त्याचा फोटो काढण्यासाठी 1/1000 किंवा 1/2000 इतकी शटर स्पीड असलेला कॅमेरा लागतो. आणि Atom ची स्पीड तर एका सेकंदाचा 1/10000000000000000 इतकी आहे. तर इतका वेग असलेला (So Called ) कॅमेरा बनवण्याचे शीव धनुष्य शास्त्रज्ञांना उचलायचे होते. पण ही केवळ Atom चीच स्पीड झाली. Atom च्या आत असलेले Subatomic Particles तर याहून अधिक वेगाने फिरत असतात. म्हणजे एक Femtosecond शटर स्पीड असलेला कॅमेरा जरी तयार केला तरी त्यांचा फोटो निघाला तरी तो blurred च निघणार होता. पण हाही कॅमेरा बनवून त्या Subatomic Matters ची हालचाल टिपण्याचे शिवधनुष्य ज्या तीन शास्त्रज्ञानी उचलले त्यांना 3 October 2023 ला नोबेल पारितोषिक विभागून मिळाले.
त्यांची नांवे अशी 📼
1) Anne L' Huillier ✓
2) Ferenc Krausz ✓
3) Pierre Agostini ✓
या तिघांचे मनःपूर्वक अभिनंदन.

डॉ. प्रमोद कुलकर्णी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...