शनिवार, ३ मे, २०२५

1897. सप्तपदी

 मळवट भरुनी सौभाग्याचा, 
पुण्याईने तुज वंदिते. 
प्रथम  आद्यविनायका, 
पहिले पाऊल टाकिते...  //१//

मंगळसूत्र हे पावित्र्याचे, 
आप्तस्वकीया गुंफीत गेले. 
कुलदेवतेला स्मरुनी, 
दुसरे पाऊल टाकिते...   //२//

झीण झीण झंकाराती काकणे,
अन्नपूर्णा हो मज संगती. 
तिसरे पाऊल रामरायाचे,
सीता तुझी होऊनी टाकते...   //३//

अखंडित मन माझे,
अंगठीत या सामावले. 
सामावली सुख-दुःखे तुझीही,
चौथे पाऊल असे सांगिते...  //४//

कानन कुंडल मज खुणवती,
नकोस जावु शब्दापलीकडे. 
गोमातेचा आदर्श ठेवुनी,
पाचवे पाऊल अंगणी टाकिते...  //५//

नम्रतेने साद घालती,
पायातील नवी पैंजणे. 
सहाव्या पाउली स्वर्गही ठेंगणा,
माता-पित्यांच्या आशीर्वादे...  //६//

साज लेवुनी संस्कारांचा,
सप्तपदी मी हसत चालते. 
शिव-पार्वतीसम साथ राहीन,
देवाधिदेवा भाग्य असे दे...  //७//

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...