शुक्रवार, २ मे, २०२५

1893. बिरदेव डोणे

 शाहिर विशारद मा डाॅ आझाद नायकवडी कोल्हापूर यांनी आय.पी.एस. अधिकारी बिरदेव डोणे यांचेवर भेटावयास गेलेवर तात्काळ पोवाडा तयार करुन मा बिरदेव ढोणे यांचे समोर सादरही केला.

 बिरदेव डोणे चमकला हिरा,
तळपला तारा, यमगे गावाला 
कृतार्थ माता बाळाबाई 
पिता सिद्धाप्पा धन्य होई
शाहीर आझाद पोवाडा गाई...!!१!!

माळराणी नित्य फिरणार,बकरी चारणार,कष्ट करणार 
डोणे कुटुंबाचं जग न्यारं
 पालावर गेलं जीवन सारं
राशीला उन थंडी वारं...!!२!!

 गद्य: पाचवीमध्ये नवोदय विद्यालयात निवड झाली नाही. पण इयत्ता आठवी मध्ये एन एम एम एस परीक्षेत गुणवत्ता यादीत येऊन वर्षाला सहा हजार रुपये याप्रमाणे चार वर्षाची चोवीस हजार रुपये स्कॉलरशिप मिळाली.

 एन.एम.एम.एस.गुणवत्ता यादीत
 बिरदेव आला शालेय जीवनात
 स्कॉलरशिप आली हातात 
आनंदाश्रूच्या बिरूच्या डोळ्यात...!!३!!

 महाविद्यालयीन जीवनात,पुणे शहरात, विद्यानगरीत 
सीओईपी कॉलेज देशातील खास 
अभियांत्रिकी पदवी घेण्यास 
बिरदेव शकू लागला समयास...!!४!!

 (चाल: वंदन करून भवानीला)
बिरदेवाचा पाहून अवतार
 चेष्टा करू लागली मुले फार
 हा आहे बहुदा धनगर 
प्रांजलने करून विचार
 बिरदेवाला देऊन आधार 
जोडमित्र झाले तयार...!!५!!

 बी.ई.सिव्हिल पदवी हाती आली. गाठली दिल्ली,आगेकुच केली 
यूपीएससी अभ्यासाची तयारी 
बिरोबाची आता दिल्ली वारी 
अजित शहांची मदत सारी...ll६!!

गद्य: अजित शहा यांनी दोन लाख पस्तीस हजार रुपये स्कॉलरशिप दिली.

यूपीएससी मुख्य परीक्षेस
अपयश आले हातास.
परवडेना दिल्लीत राहण्यास 
बिरदेव आला पुणे शहरास...!!७!!

 ज्ञान प्रबोधनी पुण्यात,प्रसिद्ध सर्वत्र,विद्यार्थी वर्गात 
बिरदेवाची सारी कहाणी ऐकून
 कुलकर्णी दांपत्याने विचार करून 
ज्ञानप्रबोधनीत घेतलं सामावून...!!८!!

पुन्हा तयारी नव्या जोमाची, 
यूपीएससीची,दिव्य स्वप्नाची
 युपीएससीचा निकाल लागला
 ५५१ क्रमांक आला 
बिरदेव डोणे आयपीएस झाला...!!९!!

यावेळी बिरदेव तळावर, होता माळावर, मेंढरं सभोवार
बातमी ऐकून बांध फुटला 
पिवळा भंडारा कपाळी शोभला 
मेंढपाळाचा पोरगा साहेब झाला...!!१०!!

कोल्हापूरची बिरदेव डोणे शान,
आमचा अभिमान,गातो गुणगान 
कार्यकर्तुत्वास मुजरा करण्यास 
शाहीर आझाद रचतो पोवाड्यास 
मुजरा मानाचा बिरदेवास...!!११!!

धन्यवाद 
शाहीरविशारद  डॉ.आझाद नायकवडीजी
(+918999389596)
( मंगळवार दिनांक २९ एप्रिल २०२५)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...