गुरुवार, १ मे, २०२५

1886. मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

"मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते
एवढेच मला सरणावर जातांना कळले होते.
सोलापूर येथील सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकार यांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐
या फॅमिली कडे स्वताचे तीन प्रायव्हेट चार्टर्ड विमाने आहेत. कित्येकशे कोटींची मालमत्ता आहे. पण मनाचं स्वास्थ्य कुठाय? अतिशय धक्कादायक! सोलापूरचे ख्यातनाम न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या आणि संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र हादरले...
       सोलापूर राज्यभरातील हजारो रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेले आणि मेंदूवरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांत पारंगत असलेले सोलापूरचे प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आज स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रचंड संपत्ती, समाजात प्रतिष्ठा आणि वैद्यकीय क्षेत्रात बुद्धिमत्तेचे प्रतीक मानले जाणारे डॉ. वळसंगकर यांची ही आत्महत्या सर्वांनाच हादरवून टाकणारी ठरली आहे. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, यामागचे कारण त्यांच्याच हॉस्पिटलमधील प्रशासकीय अधिकारी म्हणून एक महिला कामावरती तिच्या त्रासामुळेच डॉक्टरांनी आत्महत्या केली  असून, पोलिसांनी तपास करून महिलेला अटक केली आहे .
      डॉ. वळसंगकर यांच्या नावावर राज्यातील अनेक रुग्णालयांतून रुग्ण पाठवले जात असत. त्यांच्याकडे ऑपरेशनसाठी महिने महिने प्रतीक्षा यादीत रुग्ण राहात असत. वैद्यकीय सेवेमुळे त्यांना “सोलापूरचे भूषण” असेही संबोधले जात होते. आत्महत्येच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. डॉक्टर वळसंगकर हे आपल्या शांत, संयमी स्वभावामुळे ओळखले जात होते. ही आत्महत्या केवळ एका डॉक्टरची नाही, तर समाजातील मानसिक तणावाच्या वाढत्या समस्येवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना ठरत आहे.
         सोलापूर महाराष्ट्रभरातील हजारो रुग्ण ज्यांच्याकडून ऑपरेशन करून घेण्यासाठी कित्येक महिने प्रतीक्षा यादीत असायचे, सोलापूरचे भूषण आणि प्रचंड संपत्ती, प्रतिष्ठा तथा बुद्धिमत्तेचे प्रतीक असलेले सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी शुक्रवारी रात्री स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोलापूर जिल्ह्यात स्वतःचे चार्टर्ड प्लेन असलेले ते एकमेव व्यक्ती असल्याचीही माहिती समोर येत आहे.
      शुक्रवारी रात्री कुटुंबियांसमवेत भोजन केल्यानंतर डॉ. वळसंगकर आपल्या खोलीत गेले. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. शिरीष वळसंगकर हे सोलापूर आणि महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रातील एक अत्यंत आदरणीय नाव होते. गुंतागुंतीच्या मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांचा मोठा लौकिक होता. पैसा पद प्रतिष्ठा असलं म्हणजे भौतिक सुख सुविधाचा वापर करून सुखी आयुष्य जगता येत किंवा अध्यात्मात लिंन असलं की मानसिक शांतता लाभते ह्या सर्व गैरसमजा समजावरचा पडदा सुशांत सिंग राजपूत, परम पूज्य भैयू महाराज यांनी केव्हाच हटवला होता पण एका न्युरोसर्जनला आत्महत्या करायची वेळ येते म्हणल्यावर डिप्रेशन कोणालाही कधीही येऊ शकतं मित्रांनो हे सिद्ध झालं आहे. त्यासाठी पैसा पद प्रतिष्ठा यासोबतच मानसिक समाधान, आंनदी आयुष्य आणि आजूबाजूला जिवाभावाची माणसं असणं देखील खूप आवश्यक आहे.
     अखंड महाराष्ट्राला खळखळून हसवणारे दादा कोंडके त्यांच्या आत्मचरित्रात अगदी तळमळीने लिहतात तें अगदी हृदयाला पिळवटून टाकत पण कदाचित ती आता काळाची गरज बनली आहे. दादा म्हणतात की, हे ईश्वरा मला पुढच्या जर माणसाचाच जन्म दिलास तर मला पद प्रतिष्ठा धन दौलत काहीच देऊ नकोसं पण माझी म्हणता येतील आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करतील अशी जिवाभावाची जिवलग माणसं दे. एकटेपणा माझ्याच काय कोणाच्याही वाट्याला देऊ नकोस तो फार वेदनादायी असतो. संपूर्ण महाराष्ट्राला हसवणाऱ्या दादा कोंडके च्या आत किती दुःख वेदना दडलेल्या होत्या यावरूनच समजतं.
त्यामुळे माणसाच्या गर्दीत रहा पण गर्दीत राहूनही एकटं राहु नका मित्रांनो. संपर्कात राहा, बोलत राहा – मानसिक आरोग्य हीसुद्धा जबाबदारीच आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...