बुधवार, ३१ जुलै, २०२४

1304. पेरूची गोष्ट

       मधली सुट्टी झाली विद्यार्थ्यांनी डबा खायला गेल्या पटांगणावर खेळण्याचे गप्पा मारण्याचे असण्याचे आवाज यायला सुरुवात झाली केवळ 25 मिनिटाची सुट्टी असते पण मुलींना खूप मजा वाटते. यावेळी सेवा सदन चे बाहेर जाण्याचे गेट मात्र पूर्णतः बंद असते कुणालाही बाहेर जाऊन काही खरेदी करता येत नाही कोणी डबा आणलाच नसेल तर त्याची सोय आम्ही लावतो कारण शाळेमध्ये विद्यार्थिनी भांडार आहे आणि वसतिगृह ही आहे. त्यामुळे कोणी बाहेर जायचं नाही असाच दंडक होता. सुट्टी नंतर शाळा भरल्याची घंटा झाली मुली धावत धावत आपल्या वर्गात निघाल्या आणि नेमकी एक विद्यार्थिनी बाहेर जाताना मला दिसली मी गेटमध्ये तिला पकडलं ती बहुदा सहावीतली असावी म्हणजे अगदी छोटी होती अकरा वर्षाची. ती बाहेर जाऊन आत मध्ये येत होती तिच्या हातात एक पेरू होता आणि तो पेरू आणण्यासाठी ती धडपडून तिथल्या सेवकाचा डोळा चुकून बाहेर जाऊन आली होती. मी तिला बरोबर पकडले तिला रागावले बाहेरून काही आणून खायचं नाही हे कितीदा सांगितले तर तुम्ही अशा का वागता ग? अशी तिची कान उघडणी केली असे नियम मोडायचे नसतात ही शिस्त आहे आणि मी तिला पाच उठाबशा काढण्याची शिक्षाही दिली तिच्या हातातला पेरू मी काढून घेतला आणि वर्गात पाठवलं. त्यानंतर मी ऑफिसमध्ये आले पेरू समोरच्या टेबलावर ठेवला आणि कामात गर्क झाले थोड्यावेळाने लक्षात आलं मी त्या मुलीने खाण्याचे आशाने आणलेला पेरू इथे माझ्या टेबलवर पडून होता.
      थोडं वाईट वाटलं जरी मी रागावले असले तरी माझ्या लक्षात आलं की पेरू खाण्याचं तिचं वय आता आपल्याला कुठे पेरू खावासा वाटतो इतक्या प्रकर्षान. मनातून थोडा वाईटही वाटलं आपण तिचा पेरू काढून घ्यायला नको होता असंही वाटलं. ताबडतोब आमची  सेविका शांता आहे तिला मी बोलवले आणि विचारले शांता आपले सापडलेले पैसे किंवा अन्य काही वस्तू वगैरे विकून आलेले पैसे किती जमा झालेत तिने सांगितले आठशे रुपये जमा आहेत बाई अशा पैशांचा उपयोग आम्ही विद्यार्थिनींसाठीच करत असतो मुली वह्या विसरून जातात उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याचे रद्दी घालून आलेले पैसे सापडलेले आणि कोणीही न्यायला न आलेले पैसे  अशी रक्कम आणि मग त्यात अजून तितकीच रक्कम मी घातली त्यात आणि  ज्ञानप्रबोधिनी हराळी त्यांची तेथे शेती आहे त्या शेतीमधून मी पेरू मागवले. 2000 पेरूची ऑर्डर दिली दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता ऑर्डर प्रमाणे प्रबोधिनीतून  आमच्या विद्यार्थिनी साठी अतिशय उत्तम पेरू पाठवले होते शुक्रावारचा शेवटचा तास हा पिटीचा असायचा पण त्या दिवशी मी सर्व विद्यार्थ्यांना वर्गातच थांबायला सांगितले मॉनिटर ना बोलून घेतले खाऊ वाटण्याच्या टोपल्यांमधून वर्गातल्या हजेरी प्रमाणे पेरू भरले आणि सर्व वर्गांमधून पेरू वाटले मुलीना आश्चर्यच वाटलं की पिटीच्या तासाला पेरूचे वाटप का आहे ?आणि आज अचानक काय म्हणजे श्रावण शुक्रवार नाही कोणता सण नाही तरी बाई पेरू वाटताहेत. मग शेवटच्या दहा मिनिटाला मी मुलींना प्रार्थनेच्या जागी बोलावून घेतले त्यांनाही जरा आश्चर्यच वाटलं बाईंनी आपल्या सगळ्यांना पेरू का वाटले असावे. शिक्षकांच्या मनात प्रश्न की बाईंनी अचानक पेरू का वाटले.? मग मी त्यांना सांगितलं की मुलींनो आज पेरू वाटले याच तुम्हाला आश्चर्य वाटल असेलच कारण आज कुठलाही सण वार शुक्रवार किंवा प्रसाद वगैरे असं काहीच नाहीये पण एक घटना घडली काल मधल्या सुट्टीत मी एका मुलीच्या हातातला पेरू काढून घेतला ती शाळेच्या बाहेर जाऊन पेरू विकत घेऊन पळत आली होती मला तो पेरू काढून घेतल्याचे खूप वाईट वाटलं  तुमचे हे वय पेरू बोर चिंचा खाण्याचे पण अशा तऱ्हेने  शाळेचे नियम मोडून  केलेली कृती मला मुळीच आवडत नाही त्यामुळे मी तिच्या हातातून तो पेरू काढून घेतला थोडीशी शिक्षाही मी तिला काल केली होती पण मला ते खूप मनाला लागलं त्यासाठी मी ठरवलं की आपण आज मुलींना पेरू वाटू. या त्यासाठी खास हराळीवरून तुमच्यासाठी उत्तम पेरू आणून वाटप केले आहेत. मुलींना खूप आनंद झाला सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या.मग शिक्षकांनाही पेरू वाटले वसतिगृहात वाटले सेवकांना पेरू दिले तेव्हा कुठे माझ्या मनाला शांतता लाभली. लहान मुलांच्या हातून असं काही काढून घेणं हे खरोखर वाईट आहे पण काय करायचं थोडीशी शिस्त लावण्यासाठी असं कठोर व्हावं लागतं पण त्याची भरपाई मला इतक्या छान पद्धतीने करता आली याचा मला खूप आनंद वाटला. आजही पेरू पाहिला की मला त्या छोट्या मुलीची आठवण येते आणि पेरूची गोष्ट पुन्हा पुन्हा आठवते एवढासा पेरू पण त्या पेरूची एवढी मोठी गोष्ट झाली हे खरे !मी नुसता पेरू काढून घेतला आणि तिला शिक्षा केली इतपत झाल असत तर ते एकाच मुलीपर्यंत पोहोचल असतं पण माझ्या शाळेतल्या सुमारे अठराशे विद्यार्थीनी पर्यंत हा मेसेज पोहोचला की शाळेच्या वेळात नियम मोडून शाळेच्या बाहेर जाऊन असं काही खरेदी करायचं नाही आणि त्याबरोबर माझ्यातल्या संवेदन क्षमतेलाही हे थोडंसं आव्हानच होतं माझी संवेदन क्षमता मला पुन्हा पुन्हा बजावून सांगत होती की बाई तू अशीच रहा नियमात अडकलीस ,खूप कडक शिस्तीची कठोर असलीस  तरी संवेदना हरवू नकोस बरं कारण संवेदनाक्षम माणूस जीवनाचा खऱ्या अर्थाने आनंद घेत आणि आनंद देत जगू शकतो किती खर आहे ना? आपल्याला काय वाटतं?

शीला पतकी 
माजी मुख्याध्यापिका
सेवासदन प्रशाला सोलापूर 
8805850279

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...