सोमवार, २२ जुलै, २०२४

1293. आत्महत्या आणि गरोदरपणा

       घरच्यांचा विरोध आहे म्हणून पळून जाऊन लग्न केलं. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा  तालुक्यातील इंजिनियर तरुणाचं त्याच्या नात्यातीलच एका इंजिनिअर मुलीबरोबर प्रेम झालं. पण लग्नाला या दोघांना दोघांच्याही घरून प्रखर विरोध होत होता. शेवटी दोघांनी पळून जाऊन लग्न केलं. मुंबईमध्ये जाऊन एका नामांकित कंपनीमध्ये दोघेही चांगल्या पगाराच्या नोकरींवर रुजू झाले होते. दोघांचा राजा राणीचा संसार सुरू होता. दोघांनी ठरवलं होतं आता आपण आपलं बाळ घेऊनच घरी जायचं. बाळ पाहिलं की म्हणजे आपलं नातवंड पाहिलं की दोन्ही घरातील होणाऱ्या आजीआजोबांचा विरोध आपोआप मावळेल आणि दोन्ही कुटुंब नक्कीच आपल्याला आपलंस करतील. दोघांचे जॉब आणि संसार तर व्यवस्थित चालला होता पण लग्न होऊन वर्ष झालं तरी मुलबाळ होण्याचं काही लक्षण दिसेना. तेव्हा ते दोघे डॉक्टरकडे गेले. वेगवेगळ्या तपासण्या झाल्या आणि उपचार सुरू झाले. दोघेही कंटिन्यू 4 वर्ष उपचार घेत होते. या चार वर्षात त्यांचे 5/6 डॉक्टर बदलून झाले. त्या दोघांनी नोकरी करून कामावलेला सर्व पैसा ट्रीटमेंटवर खर्च केला. इतकं करूनही प्रेग्नेंशी काही होईना. इतक्यात उजाडला आपल्या सर्वांना नको असलेला 2020 सालातील मार्च महिना. कोव्हीडमुळे 2020 मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन जाहीर झालं. कामावलेलं सर्व पैसे तर हॉस्पिटलवर खर्च झाले होते. या लोकडाऊनमध्ये रूम भाडं दिले नव्हते पोटाला खायचं काय असा प्रश्न होता आणि पहिला लोकडाऊन संपला आणि त्यांच्या नामांकित कंम्पनीने त्यांना सांगितलं की काही दिवसासाठी आपल्या कंपनीने तुम्हा दोघांना ब्रेक दिला आहे. जवळ पैसा नाही, जॉब नाही आता कोव्हीडमुळे नवीन जॉब पण मिळत नाहीत. आता काय करायचं दोघांच्या समोर मोठा प्रश्न होता आणि दोघांनी परस्थितीशी हार मानून एक निर्णय घेतला, ""गड्या आपलं गाव बरं!!!म्हणतं  महेशने आपल्या गावी म्हणजे घरी जायचा निर्णय घेतला नव्हे ते दोघेही निष्पाप जीव घरी पोहोचले.
     ध्येय एकच होतं स्वतःचं बाळ घेऊन घरी जाऊ. पण नियतीला ते मान्य नव्हतं. शेवटी दोघेही म्हणजे महेश आणि पूजा आपल्या गावी मंगळवेढा येते आले. महेशच्या घरच्यांनी त्यांच्या बरोबरच पुजाची सुद्धा खेटरपूजा केली. दोघेही खूप अपमानित झाले होते पण अपमान सहन करण्याशिवाय दोघांसामोरही पर्याय नव्हता. घरी येऊन दोन तीन दिवस झाले होते आणि बोलत बोलत महेशच्या आईने पूजाचा उल्लेख वांझोटी असा केला. वांझोटी हा शब्द पूजाच्या खूप जिव्हारी लागला. इंजिनियर असणारे महेश आणि पूजा दोघेही खूप रडले. शेवटी ठरवलं आता असं लाजिरवाणं जीवन नको. मुलबाळ तर नाहीच, कामावलेले सर्व पैसे डॉक्टरच्या मड्यावर घातले आहेत. आता नोकरी पण नाही, नको आता हे अपमानित जीवन. दोघांनी ठरवलं आता आपण आपलं आयुष्य संपवू. खिशात पैसा असल्यावर माणूस काहीही करू शकतो पण आपण तर आता भिखारी झालोय. शेवटी महेश आणि पूजा दोघांनी आत्महत्या करायचा निर्णय घेतला. लॉकडाऊन नुकताच संपलेला नुकताच जून महिना सुरू झाला होता. पण मारायच्या आगोदर महेशची एकच इच्छा होती की पूजा तुला आणि मला आवडणारी पुरणपोळी आणि आमरस आपण दोघे खाऊ आणि नंतर झोपताना आपण दोघे पण देवाला स्मरून विष खाऊन झोपू 😢.
       ठरलं पुरणपोळी आणि आमरस खाऊन आत्महत्या करायची. महेशने गावातील मित्राकडून उसने पैसे घेऊन दाल, गूळ, आंबे आणले. संध्याकाळीचे सात वाजले होते. पूजा आमरस आणि पुरणपोळी बनवण्यात गुंतली होती आणि महेश दोघांच्याही मोबाईल मधील पर्सनल मेसेज डिलीट करत होता. दोघांच्याही मोबाईलमध्ये काही पर्सनल गोष्टी होत्या त्या सर्व महेश डिलीट करत होता. कारण या दोघांनी आत्महत्या केल्यावर मोबाईल इथेच राहणार होते. आपल्या काही पर्सनल गोष्टी जगाला कळू नये म्हणून महेश सर्व काही डिलीट करत होता. डिलीट करताकरता त्याला पूजाच्या एका मैत्रिणीने व्हाट्सअपवर पाठवलेला लेख दिसला. लेख येऊन बरेच दिवस झाले होते पण पुजाने तो लेख रीड केला नव्हता. महेशने तो लेख वाचला आणि लेखात आशेचा किरण दिसल्याने महेशने पुरणपोळी लाटणाऱ्या पूजाला तो लेख वाचायला लावला. तो माझा म्हणजे डॉ. वैभवसिंह भोसलेचा मातृत्व बद्दल लेख होता. तोच पुजाच्या मैत्रिणीने तिला सेंड केला होता. शेवटचा चान्स म्हणून दोघांनी मला कॉल करायचं ठरवलं.
     संध्याकाळीचे आठ वाजत आले होते मी डॉ. भोसले माझ्या कामात बिझी होतो. इतक्यात मला महेश आणि पुजाचा कॉल आला. महेशने मी 🖕वर लिहिलेली सर्व स्टोरी मला सांगितली आणि शेवटी म्हटला की सर आता आमरस पुरणपोळी खाऊन आम्ही आत्महत्या करणार आहोत. मी निशब्द झालो होतो तरी माझ्या बोलण्यात सहजपणा आणत म्हटलं, ठीक आहे जरूर आत्महत्या करा. पण माझ्यासाठी आत्महत्या फक्त 24 तास पोस्टपोन कराल का?? तुम्ही दोघे फक्त 24 तास बोनस जगा !! 😑 तुम्हाला उद्या रात्रीची आमरस पोळी माझ्याकडून मिळेल. तुम्ही दोघेही पटकन उद्या सकाळी माझ्याकडे या. बाळ होण्याचं चान्स असतील तर मी हो म्हणून सांगेन नसेल तर तुम्ही काय करायचं ते ठरवलं आहे ते तुम्ही करू शकता. इतक्यात पूजा मला म्हणाली की सर उद्या तुमच्याकडे येण्यासाठी पैसे नाहीत आमच्याकडं आणि आम्ही तुमची फी कुठून देऊ. मी आत्मविश्वासपूर्वक पूजाला सांगितलं की बेटा तु माझ्या लहान बहिणीसारखी आहेस तुमच्याकडून मला फी नको. मला तुम्हा दोघांना हसताना पाहायचं आहे, तूझ्या मांडीवर मला बाळाला पाहायचं आहे. बेटा तु काळजी करू नकोस उद्या तुम्ही दोघे माझ्याकडे येण्यासाठी किती पैसे लागतात ते मी लगेच महेशला फोन पे करतो. ती मुलगी रडत रडत म्हणाली सर 500 बस झाले आणि हाच सर महेशचा फोन पे नंबर आहे. मी लगेच महेशच्या नंबरवर 500 रुपये फोन पे केले.
    दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजताच ते दोघे माझ्या ओपिडीसमोर आले मला कॉल आला सर आम्ही आलोय. मी म्हटलं मी शेतात आहे मला यायला दहा वाजतील. मी ओपिडीत आलो, ते दोघेही माझ्या समोर बसले होते, दोघांच्याही नजर शून्यात होत्या आणि काही मिनिट मी पण शून्यात नजर ठेऊन विचार करत होतो की या निष्पाप पोरांना रात्री जर माझा लेख किंवा नंबर मिळाला नसता तर आता माझ्या समोर बसलेले हे निष्पाप जीव आता चितेवर असले असते. 😢 वाचकहो मी डॉक्टर असलो तरी माणूस आहे, मला पण भावना आहेत. मला पण कुटुंब आहे. आई, वडील, बहिणी, भाऊ एका कुटुंबवत्सल कुटूंबातील असलेला डॉक्टर हजारो विद्यार्थी घडवणाऱ्या सुभाष भोसले गुरुजींचा मुलगा पण आहे. महेश आणि पूजाचे सर्व जुने रिपोर्ट पाहिले प्रॉब्लेम तर माझ्यादृष्टीने नॉर्मल होता. दोघांनचीही सर्व तपासणी झाली आणि मी शेवटी त्या दोघांना एकच सांगितलं. (पेशंटचे पूर्ण नाव आणि त्यांचे शारीरिक प्रॉब्लेम येते लिहिता येत नाहीत. 🙏)
अरे येड्यानो आत्महत्याचे विचार पण मनात आणू नका तुम्ही माझ्याकडे 100% आई बाबा बनणार. फक्त तुम्हाला अजून चार व्हिजिट कराव्या लागतील. पूजा नव्हे पण महेश हिरमुसाला चेहरा करून म्हणाला सर तुमची फी द्यायला आमच्याकडं पैसे नाही. दोघांचे पण जॉब लॉकडाऊन मध्ये गेले आहेत. मी थोडंसं रागातच महेशला म्हटलं, तुझ्याकडे पैसे येतील तेव्हा मला फी दे, नसेल तर माझी फी तुझी बायको पूजाची भाऊबीज ओवाळणी समज, पण माझ्या चार व्हिजिट पूर्ण कर. भरल्या डोळ्याने ते दोघे म्हणजे महेश आणि पूजा माझ्या ओपिडीतून बाहेर पडले.
     मी ट्रीटमेंट तर सुरु केली होती, त्या दोघांना फक्त चार व्हिजिट करायला सांगितलं होतं ! त्या दोघांनी दोन व्हिजिट पूर्ण पण केल्या आणि त्यांचा मला कॉल आला की सर... कंठ दाटून आलेल्या आवाजात दोघे पण रडक्या आणि दाटलेल्या आवाजात इतकेच बोलले की सर  पा *ळी चुकली. आम्ही आई बाबा होणार. ते दोघेही आनंदी होते. त्यांना माझी फी मागण्याचे धाडस मला झाले नाही. पुढे मे 2021 मध्ये त्या जोडप्यास मुलगा झाला. लगेच महेशने कॉल करून मला सांगितलं सर आम्हाला मुलगा झाला. पुढे तो बरेच बोलला की सर तुमचे उपकार वगैरे, वगैरे... वगैरे आणि... वगैरे... सर तुमचे नाव वैभवसिंह तर आम्ही पण बाळाचं नाव वैभव ठेवलंय..वगैरे... वगैरे..त्यांच्या आनंदा समोर मी माझी फि विसरून पण गेलो आहे !!

🙏🙏🙏💉💉🙏🙏🙏

डॉ. वैभवसिंह सुभाष भोसले.
सोलापूर.
व्हाट्सअप नंबर :- 9011950609

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...