तो वर्गात मधल्या बाकावर बसायचा. हुशार नव्हताच पण street smart पण नव्हता . अबोल . घरचा गरीब .वर्गात एक दोन मित्रच .कसाबसा SSC झाला आणि कुठेतरी चिकटला. गरीब,नोकरी पण खास नाही.त्यामुळे लग्न पण उशिरा झाले. मध्यन्तरी खूप वर्ष गेली. reunion चे दिवस आले.जो तो reunion करू लागले. ह्याच्या batch चे पण reunion झाले. मित्राच्या आग्रहाखातर हा गेला .मग whatsaapp चे दिवस सुरु झाले . हा पण join झाला. Messages सुरु झाले. नवीन नवीन विषय,चर्चा. काही messages ह्याच्या डोक्यावरून जायचे. ग्रुप सोडायचा विचार करू लागला. ह्याच्या कडे पाठवण्या सारखे काहीच नव्हते. मग त्याने आयडिया केली. सणावारांना देव देवतांचे फोटो पाठवू लागला. पण त्याची मुलगी खूप हुशार निघाली. नेहमीच पहिली. 12 वित बोर्डाच्या परीक्षेत पहिली आली. त्याने खूप विचार करून ग्रुप वर आयुष्यातली पहिली पोस्ट टाकली. माझी मुलगी 12 वी बोर्डात पहिली आली. मग काय? अभिनंदनाचे messages धडाधड यायला लागले. ती पुढे काय करणार? डॉक्टर का engineer असे अनेक प्रश्न. तो गांगरला,भांबावला. तासा भराने त्याने दुसरी पोस्ट टाकली ती नोकरी शोधतेय मेडिकलला admission मिळाली आहे पण. फी परवडणार नाही त्यामुळे जाणार नाही.
आता मात्र कोणाचाच रिप्लाय आला नाही. तू मुलीला शिकव आम्ही मदत करू म्हणणारे नातेवाईक कधीच पांगले होते. संध्याकाळचे सात वाजले दाराची कडी वाजली. बघतो तर त्याच्या ग्रुप वरील 5-6 मित्र मैत्रिणी बाहेर उभे होते. तो ओशाळला. घरात इतक्या लोकांना उभे रहाण्यास पण जागा नव्हती. त्यातला एकाने पुढे येऊन त्याचा हातात cheque ठेवला. हि तुझ्या मुलीची मेडिकलची फी. तिच्या शिक्षणाची जबाबदारी आमची. त्याच्या डोळ्यात पाणी आले आणि पाणावल्या डोळ्यात त्याला शाळा, शाळेतला वर्ग,वर्गतली मुले मुली दिसू लागले.
रवींद्र भुरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा