बुधवार, १७ जुलै, २०२४

1272. भारताची वाटचाल - निष्क्रिय भविष्याकडे ???

 आपण कुठे चाललो आहोत? ...🙏
 नुसतं राजकारण हे जीवन नाही.  बलशाली राष्ट्र बनवायचे असेल तर वेगळ्या पद्धतीने विचार करणे आवश्यक आहे.  उठा !! जागे व्हा 🙏
आज बालवाडीपासूनच फुकटचा भात, अंडी, शिरा देऊन बालमनापासूनच लाचारीची सुरुवात होते व पुढे तरूणपणी दहा रुपयांत जेवण, १०० यूनिट्स मोफत, वीज फुकट, रेशन सरसकट, आवास योजनेंतर्गत निरर्थक सूट, ऊठसूट कर्जमाफी ह्या गोष्टींची आशा लावून  सध्याच्या (पूर्वीच्या ही) सरकारने आणू घातलेल्या या योजना समाजाच्या मानसिकतेवर अतिशय घातक परिणाम करून जाणार आहेत. देशात सध्या जवळपास ६७% लोकसंख्या तरुणांची आहे, हेच प्रमाण महाराष्ट्रातही आहे. ज्या वयात आपले भविष्य  घडवण्यासाठी कष्ट करायला हवेत त्या वयातल्या तरुणाला महिना ६०० रुपये दिले की जेवण, मोफत वीज, सरसकट कर्जमाफी अशाने  त्यांची विधायक  क्रयशक्ती  संपून जाणार आहे.    
    यामध्ये अजून एक भयंकर गोष्ट म्हणजे असे की गेल्या १० वर्षांपासून  इ. १ ली ते ८ वी पर्यंत परिक्षाच नाही किंवा बौद्धिक क्षमता नसताना देखील विद्यार्थ्यांना पास करायचं. (९ वी साठी ही वर्गोन्नतीचे अलिखीत आदेश आहेत) त्यामुळे तरूणपिढीचा भविष्यकाळ खूप कठीण असणार आहे. ग्रामीण भाग असो किंवा शहरातील चौक बहुतांश ठिकाणी महागडे मोबाईल, बाइक, तोंडात गुटखा, अशी ही बहुतांश तरुणाई पार 'PM कसा चुकीचा?, CM कसा चुकतो?' पासून गावातल्या फ्लेक्सवर आपला फोटो कोणत्या पोजमध्ये टाकायचा? याच चर्चेत असते. आणि हे सुद्धा कोणतीही शैक्षणिक पात्रता नसतांना व बौद्धिक कुवत नसतांना. आता हीच तरुणाई या फुकटचे दान वाटणाऱ्या राजकीय पक्षांच्या सतरंज्या उचलायला उपलब्ध होते. फुकट जेवण, फुकट वीज, थोडासा बेरोजगार भत्ता, फुकट रेशन याने एक आख्खी कर्तृत्ववान  पिढी बरबाद होणार आहे.
   आजच्या तरुणाकडे आशिष्ठः, द्रढिष्ठाः, बलिष्ठाः ही सामर्थ्य असायला हवीत. हा तरुण ध्येयवादी असावा तरच तो या गोष्टींना लाथ मारेल व 'मला फुकटचे नको' असे सांगेल. सगळेच फुकट अशी सवय लागली की पुढच्या सरकारकडून हीच त्यांची अपेक्षा राहणार. कोणतीही गोष्ट आकाशातून फुकट पडत नसते, या साठी लागणारा निधी जे ५ - ६ टक्के करदाते आहेत ते व शेतकऱ्यांच्या मुळावर महागाईचे रुपात येऊन पडते. स्विट्झजरलैंडमध्ये ३ - ४ वर्षांपूर्वी सर्व नागरिकांना सरकारने तिजोरीत शिल्लक असलेली गलेलट्ठ रक्कम दरमहा फुकट देऊ केली होती. तेव्हा ९७% लोकांनी 'आम्हाला फुकटचा पैसा नको, आमची क्रयशक्ती कमी होईल' असे सांगून याला विरोध केला. आपल्याला स्विट्झजरलैंडची सौंदर्य, सुबत्ता दिसते पण त्या मागे प्रत्येक नागरिकाची जिद्द कर्तव्यनिष्ठता आपण विसरतो. आपल्याला जर खरच स्वतःला आणि देशाला संपन्न करून प्रगतिपथावर न्यायचे असेल तर 'सगळेच फुकट' ही मानसिकता सोडायला हवी आणि अशी अफू देणाऱ्या व्यवस्थेला दूर करण्याचा निश्चय आज मनापासून करायला हवा. सरकारने ही जीवनावश्यक वस्तू रास्त भावात द्यायलाच हव्यात.
    अन्न खाण्यासाठी पैसे नाहीत, किमान आपण राहत असलेल्या घराचे १०० युनिट चे बिल भरण्याचे पैसे नाहीत अशी अवस्था, अपवाद सोडता, कुठेही नाही. मोबाईल, राजकारण, अतिरंजित मीडिया, जात या विळख्यातून मुक्त होण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणाईला ही फुकटची अफू निर्बल निष्क्रिय करण्याचा धोका होतो व यातूनच मग आपल्या संतानी म्हंटल्या प्रमाणे 'रिकामे मन, सैतानाचे घर' यानुसार  दुराचार, बलात्कार, व्याभिचार, लुटमार, दलाली, कमी कष्टात कसे पैसे मिळवता येतील? तोडी-पाणीचे, कमिशनगीरीचे उद्योग वाढतात व राष्ट्राचे प्रगतीऐवजी यातून नुकसानच जास्त होते. आज तरुण पिढी राजकारण, नशा, सहज मिळणारा पैसा, श्रमदाना पासून अलिप्त यांमुळे होत असलेले दुष्परिणाम म्हणजेच तरुण पिढी ना आई-वडिलांचा आदर ठेवतात, ना वडीलधारी मंडळीचा, ना शिक्षकांचा. यावर कुठेतरी सकारात्मक विचार व्हायलाच हवा.
आपल्या भावी पिढीसाठी आपण काय विचार ठेवायचे, मार्गदर्शन कसे करायचे, ध्येय कसे ठरवायचे, आयुष्याला चांगले वळण लागण्यासाठी कसे चालायचे, हे नीट लक्षात घ्यावे.
आवडल्यास आत्मसात करा
🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...