बुधवार, २ एप्रिल, २०२५

1825. मैत्री स्त्री-पुरुषांमधील

     प्रत्येक जण एकटा असतो. कुणीतरी आपल असाव अस वाटत असत. नात्यामधील बेगडीपणा या एकटेपणाला खतपाणी घालत असतो. आपण  ऐकटे असतो म्हणून असे विचार येतात का? काही वेळेस हे आकर्षण असते, सुप्त ईच्छा, किंवा भावनेच्या भरात मनात आलेल्या भावना. या फक्त एकटेपणातुन आल्या आहेत का?  की अस काही आहे जे या सगळ्यांच्याच पलिकडे जाऊन वाटत आहे. खुप मोठीच उपमा देत आहे अस वाटेल तुम्हाला पण एकदा विचार अवश्य करून बघा. मनात कुठल्याच वासनेचा स्पर्श नाही.  प्रेमात एकमेकांच्या मिठीत विसावलेले.
      मिठी म्हटली की स्पर्श, या स्पर्शाचीही एक भाषा असते. स्पर्शात एक आश्वासन असत, आधार असतो, मी तुझ्या पाठीशी आहे, हा बळ देणारा, बिनधास्त करणारा संदर्भ असतो. याउलट स्पर्शात असणाऱ्या भावना चुक की बरोबर हे ओळखण्याची क्षमता प्रत्येक स्त्री पुरुषांमधे असते. पाप मनात न आणता केलेला भावपूर्ण स्पर्श नेहमीच पवित्र असतो. याउलट स्पर्श न करता मनात काही असेल तर  मनात आलेले ते विचार पाप असतात. पाप आणि पुण्य या संकल्पनेवर देखील व्यक्तीपरत्वे वेगवेगळी मते असूच शकतात. लहान बाळ बघितल्यावर किती आनंद होत असतो.त्याला जवळ घेण्याची ईच्छा प्रत्येक व्यक्तीस होते. त्यावेळेस फक्त निरागस भाव असतात. त्या स्पर्शात ममता असते, तिथेही प्रेम असतेच. भाऊ - बहीणच नाहीत तर इतर नात्यामधील कुठल्याच स्त्री पुरुषाविषयी  कधी असे विचार येतात का? मग स्त्री पुरुष मित्र मैत्रीण म्हणून एकत्र आल्यावर त्यात काहीतरी चुकीच नात असेल असे विचार का? 😐
      कोणत्याही  ठिकाणी काहीही विशेष नसताना, कुठलाच स्वार्थ नसतानाही उगीच वाटणारी ओढ म्हणजेच प्रेम. यात काळजी आहे.एकमेकांवर विश्वास आहे. आदर आहे. सदैव सुखात, आनंदात असावे ही ईच्छा आहे. हेच प्रेम मैत्रीच्या नात्यामधेही असूच शकत. जगाच्या नजरेत काही असू शकेल पण आपण आपल्याच नजरेत उतरायला नको. याची जाणीव ठेवून वागले तर चुक होण्यास कारणच उरत नाहीत. स्त्री पुरुष  नातेसंबंधाकडे बघण्याचा असा दृष्टीकोन का नाही. तुमचे विचार यापेक्षा वेगळे असू शकतात. शेवट काय तर काय चूक काय बरोबर आहे हे ज्याचं त्यानेच ठरवायचंय. कुठे थांबायच हे लक्षात आल्यावर प्रत्येक व्यक्तीस निखळ मैत्रीचा आनंद नक्कीच उपभोगता येईल...👍🙂

बस्स ईतकच ❤☺

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...