बाप सुरुवात करतो– ३०० रुपये महिना.
मुलगा सुरूवात करतो– ३०००० रुपये महिना.
संसारात पडल्यावर
दोघांचा जमाखर्च सारखाच असतो.
मुलगा बापाला चिमटा घेत
‘सेम पिन्च!’ म्हणतो.
●┈┉❀꧁꧂❀┉┈●
तसे रोज संध्याकाळी ते सगळे
पोळी भाजी वरण भातच खातात अजूनही.
सासू एखाद्या रविवारी हट्ट करून
उडपीची इडली आणि मंगला थिएटरला
‘ड्रीम गर्ल’ बघायला जाऊ म्हणायची.
सून आता एखाद्या रविवारी
‘डॉमिनोज् पिझ्झा’ खाऊ आणि PVR ला
‘ड्रीम गर्ल’ बघायला जाऊ म्हणते.
दोन ‘ड्रीम गर्ल’ मध्ये फरक असला, तरी
सासू-सुनेचं ‘ड्रीम’ साधारण सारखंच असतं.…
सून सासूला चिमटा घेत
‘सेम पिन्च!’ म्हणते.
●┈┉❀꧁꧂❀┉┈●
दुसऱ्या शहरात नोकरी लागते.
घर घ्यायची वेळ येते..
मुलगा होम लोन ची चौकशी करतो.
हप्ते बापानंही फेडले,
हप्ते मुलगाही सुरू करतो…
सून FD RD मोडते… दागिने समोर ठेवते.
अजून एका छपराला त्यांचं आडनाव मिळतं.
सासू ३० वर्षांपूर्वीचे पिठाच्या डब्यात लपवलेले
पैसे, दागिने आठवते..
सासू सुनेला चिमटा घेत
‘सेम पिन्च!’ म्हणते.
●┈┉❀꧁꧂❀┉┈●
बजाज स्कूटरसाठी चार खेटे घालतो.
थोडे पैसे साठवतो, थोडं कर्ज घेतो.
मुलानं WagonR साठी कार लोनची
चौकशी केल्यावर बाप तेच दिवस आठवतो.
बाप मुलाला चिमटा घेत
‘सेम पिन्च!’ म्हणतो..
●┈┉❀꧁꧂❀┉┈●
नवऱ्यानं चिंतामणी रंगाची कांजीवरम
आणि नाग वाकी हेरून ठेवलेली असते,
बायकोसाठी.
कधीतरी शिल्लक पडल्यावर घ्यायला.
दुसऱ्या नवऱ्यानं बदामी रंगाचा ‘वन पीस’
आणि हिर्याचं पेंडेंट बघितलेलं असतं,
बायकोसाठी.
कधीतरी शिल्लक पडल्यावर घ्यायला.
पण या पाडव्याच्या ओवाळणीत मात्र
तो बंद पाकीटच ठेवतो..
एक नवरा दुसऱ्या नवऱ्याला
‘सेम पिन्च!’ म्हणतो.
●┈┉❀꧁꧂❀┉┈●
फार काही बदललं नाही.
तेव्हाही आणि आत्ताही.
अजूनही जमाखर्च मांडताना
महिनाअखेर येतेच!
तरीही अजूनही महिनाअखेरीला
किचन भरलेलं असतंच.
अजूनही कपाटात खाली लपवलेलं
पाकीट जड असतंच.
काटकसरीच्या मडक्यातून
अजूनही बचत झिरपते !
अजूनही बापाला मुलानं गुणल्यानंतर
उत्तर ‘चौकोनी कुटुंब’ हेच येतं !
एक पिढी दुसऱ्या पिढीला
‘सेम पिन्च!’ म्हणते !
— अवनी गोखले-टेकाळे
मुलगा सुरूवात करतो– ३०००० रुपये महिना.
संसारात पडल्यावर
दोघांचा जमाखर्च सारखाच असतो.
मुलगा बापाला चिमटा घेत
‘सेम पिन्च!’ म्हणतो.
●┈┉❀꧁꧂❀┉┈●
तसे रोज संध्याकाळी ते सगळे
पोळी भाजी वरण भातच खातात अजूनही.
सासू एखाद्या रविवारी हट्ट करून
उडपीची इडली आणि मंगला थिएटरला
‘ड्रीम गर्ल’ बघायला जाऊ म्हणायची.
सून आता एखाद्या रविवारी
‘डॉमिनोज् पिझ्झा’ खाऊ आणि PVR ला
‘ड्रीम गर्ल’ बघायला जाऊ म्हणते.
दोन ‘ड्रीम गर्ल’ मध्ये फरक असला, तरी
सासू-सुनेचं ‘ड्रीम’ साधारण सारखंच असतं.…
सून सासूला चिमटा घेत
‘सेम पिन्च!’ म्हणते.
●┈┉❀꧁꧂❀┉┈●
दुसऱ्या शहरात नोकरी लागते.
घर घ्यायची वेळ येते..
मुलगा होम लोन ची चौकशी करतो.
हप्ते बापानंही फेडले,
हप्ते मुलगाही सुरू करतो…
सून FD RD मोडते… दागिने समोर ठेवते.
अजून एका छपराला त्यांचं आडनाव मिळतं.
सासू ३० वर्षांपूर्वीचे पिठाच्या डब्यात लपवलेले
पैसे, दागिने आठवते..
सासू सुनेला चिमटा घेत
‘सेम पिन्च!’ म्हणते.
●┈┉❀꧁꧂❀┉┈●
बजाज स्कूटरसाठी चार खेटे घालतो.
थोडे पैसे साठवतो, थोडं कर्ज घेतो.
मुलानं WagonR साठी कार लोनची
चौकशी केल्यावर बाप तेच दिवस आठवतो.
बाप मुलाला चिमटा घेत
‘सेम पिन्च!’ म्हणतो..
●┈┉❀꧁꧂❀┉┈●
नवऱ्यानं चिंतामणी रंगाची कांजीवरम
आणि नाग वाकी हेरून ठेवलेली असते,
बायकोसाठी.
कधीतरी शिल्लक पडल्यावर घ्यायला.
दुसऱ्या नवऱ्यानं बदामी रंगाचा ‘वन पीस’
आणि हिर्याचं पेंडेंट बघितलेलं असतं,
बायकोसाठी.
कधीतरी शिल्लक पडल्यावर घ्यायला.
पण या पाडव्याच्या ओवाळणीत मात्र
तो बंद पाकीटच ठेवतो..
एक नवरा दुसऱ्या नवऱ्याला
‘सेम पिन्च!’ म्हणतो.
●┈┉❀꧁꧂❀┉┈●
फार काही बदललं नाही.
तेव्हाही आणि आत्ताही.
अजूनही जमाखर्च मांडताना
महिनाअखेर येतेच!
तरीही अजूनही महिनाअखेरीला
किचन भरलेलं असतंच.
अजूनही कपाटात खाली लपवलेलं
पाकीट जड असतंच.
काटकसरीच्या मडक्यातून
अजूनही बचत झिरपते !
अजूनही बापाला मुलानं गुणल्यानंतर
उत्तर ‘चौकोनी कुटुंब’ हेच येतं !
एक पिढी दुसऱ्या पिढीला
‘सेम पिन्च!’ म्हणते !
— अवनी गोखले-टेकाळे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा