दुपारची वेळ होती. ओपिडीत जरा निवांतच बसलो होतो. बाहेर रणरणता उन्हाळा ! समोरील पत्र्याच्या सावलीचा आडोसा घेत एक म्हतारे बाबा बसले होते. वयाने व अनुभवाने आलेल्या सुरकुत्या चेहऱ्यावर दुरुनही स्पष्ट जानवत होत्या. मी आपल उगाच त्यांना बोलत कराव म्हणून चौकशी केली. बाबाही आपुलकीने बोलत होते. भोळी भाबडी असाता हे लोक. जाताना बाबांनी त्याच्यांकडे असलेली दोन तीन संत्र्यापैकी एक मला देवू केली. मी खर तर थोड संकोचलो,पण त्यांनी प्रेमाने देवू केकेल्या त्या संत्रीला मी नाही म्हणू शकलो नाही.
देण्याच्या वृत्तीतही ते
किती समाधानी होते.
मी ते संत्री घेतली आणि कॕबीन मध्ये येऊन टेबलावर बाजुला ठेवली. नंतर कसलं तरी पुस्तक चाळत बसलो. जरा वेळानं राजवाड्यातली एक बाई आपल्या बाळाला कड्यावर घेऊन आली. सोबत अजुन एक तीन चार वर्षाचा मुलगा ही होता.अतिशय हालाखीतल जगणे त्यांच्या वाट्याला आले असावे असे एकंदरीत त्यांच्या मळकट कपड्यांवरून जाणवत होते. ते छोटे बाळ तापेणे फनफनले होते. मी त्याला तपासुन औषधी लिहीण्यासाठी माझ्या खुर्चीवर येऊन बसलो. औषधी लिहीताने असे लक्षात आले कि मगाच पासून तिच्या सोबत आलेल ते दुसर लेकरु टेबलावर ठेवलेल्या त्या संत्र्याकडे एकटक बघत होतं. मी त्याला नाव विचारले. तो ओशाळला पण काही बोलला नाही. त्याची नजर अजुनही त्या संत्र्यावर खीळलेली होती. ती एक संत्री मी उचलून त्याला देवू केली. त्याने एकदा आपल्या आई कडे बघितलं. ती कड्यावरच्या बाळामध्ये व्यस्त होती. मी परत त्या मुलाचा हात हातात धरून ती संत्री त्याच्या हातावर ठेवली. त्याला म्हटलं आवडते ना तुला मग खा की, तसा तो चटन म्हणाला.
" नग..घरी जायील अन अक्का संग खायीन " .
आणि एक मंद स्मित करत ओपिडी बाहेर पडला.
त्या लेकराच्या चेहऱ्यावर आलेला तो आंनद आणि त्या बाबांच्या चेहर्ऱ्यावर असणारा निस्वार्थीपणाची भावना. काही देण्याची वृत्ती ते समाधान या गोष्टींचा कुठे काही ताळेबंद बसतो का? हा विचार माझ्या मनात चमकून गेला. विचार करत बसलो. खरच आनंद आणि समाधान हे मानण्यात असत.
आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानून, आनंद मानून त्यातूनही देण्याची वृत्ती अंगी जोपासता आली तर सुखाची व्याख्या किती सहज समजते.
@......डॉ.प्रविण तांबे
- ७७०९५८६०८२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा