काही गोष्टी वेळच्या वेळीच समजून घेतल्या नाहीत आणि त्यांची काळजी घेतली नाही तर खूप मोठी किंमत चुकवावी लागते.
कारण हिंदीमध्ये म्हणतात "अब पछताये होत क्या जब चिड़ियाँ चुग गई खेत". असे नंतर वाटायला नको म्हणूनच आहे त्या परिस्थितीत प्रत्येकालाच धैर्य आणि मनोबल स्थिर ठेवण्याची आवश्यकता आहे.
एखाद्या व्यक्तीला आपण आरोग्यसंपन्न कधी म्हणू शकतो ? तर ....
१.शारीरिक स्वास्थ्य
२.मानसिक स्वास्थ्य
३.आर्थिक स्वास्थ्य
४.कौटुंबिक स्वास्थ्य
५.सामाजिक स्वास्थ्य,
या प्रत्येक टप्प्याची घडी व्यवस्थित बसवल्यास ती व्यक्ती समृद्ध आहे, असे आपण म्हणू शकतो.
तसे पाहिले तर हे सर्व एकमेकांशी खूप गुंतलेले आहेत.
जसे, वही मधील एखादे पान निघाले असता पूर्ण वहीची शिवण अस्ताव्यस्त होते, तसेच वरील मुद्द्यांपैकी एक जरी हलले तरी ती व्यक्ती एका अर्थाने स्वस्थ, स्थिर नाही, असे आपण म्हणू शकतो.
यासाठी आपण जर आपल्या मनात, आपल्या आयुष्यात वेगवेगळे निश्चित आणि योग्य असे कप्पे केले तर खूप सोपं होते.
या अनुषंगाने आपल्या रोजच्या जगण्याचे उद्दिष्टे..
यात २१ दिवसांचे उद्दिष्टे, ६-८ महिन्यांनी साध्य करण्याची उद्दिष्टे,
काही वर्षांनी पूर्ण करण्याचे ध्येय आणि पूर्ण आयुष्यात पाहिलेले असे स्वप्न हे काय आहेत, हे जाणून घ्यायचा प्रयत्न करूया.
उद्दिष्टे ठरवण्यासाठी सगळ्यात आधी स्वतःला ओळखून पाहू.
आपण कोण आहोत, कशासाठी जगत आहोत,
आपल्याला नेमके काय करायचे आहे,
कसे करायचे आहे,
कधी करायचे आहे अशासारखे प्रश्न स्वतःला एकदा नाही,
तर ठराविक काळानंतर अनेकदा विचारायला हवे, नाही का ?
(What, When, Why, How and When)
त्यासाठी काही प्रमाणात शिस्त, काटेकोरपणा आणि नियमबद्धता असावी.
नाहीतर "दिवस येईल तसा जाईल" आणि "आला दिवस गेला" असे म्हणण्या पलीकडे काहीच उरत नाही.
आणि मग मनुष्यजाती आणि पशुजाती यात फरक तो काय !
इथे अत्यंत भावलेले असे वाक्य आठवते.
"Instead of worrying about what you cannot control, shift your energy to what you can create."
या विचाराने संकटाचा हा काळ जर संधी म्हणून घेतला तर २४ तासही कमी पडतील.
अगदी रोजच्या छोट्यातल्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधूया,
त्यात प्राविण्य मिळवण्याचा प्रयत्न करूया,
काही नवीन शिकायचे राहून गेले असल्यास, एखादी आवड/ छंद, काही व्यक्तिगत,
काही सभोवतालच्या सामाजिक पातळीवर काम करण्याच्या गोष्टी लक्षात घेतल्या तर लक्षात येईल...की करता येण्यासारखे खूप आहे. आपली To- do- list पुन्हा एकदा अपडेट करण्याची ही संधी मानूया..
Design the list and Try to Implement thoroughly.
कारण केलेला निश्चय आणि सातत्य यातील ऊर्जा अलौकिक आहे, आणि त्यातच अर्धे-अधिक ध्येय पूर्णत्वास आलेले दिसते.
त्यासाठी 'जिवंत राहणे' आणि 'जगणे' या दोघांमधील फरक लक्षात घेता आला तर इंग्रजीमध्ये जसे म्हणतात, "Live to Eat" or "Eat to Live"..
हे अगदी लहानपणापासून कानावर आलेले शब्द प्रत्येकाने स्वतःला विचारले तर आपल्याला आहे त्या परिस्थितीत हा काळ खूप उत्तमप्रकारे घालवता येईल..
शेवटी "Love What You Do And Do What You Love" हे खरेच आहे !
चला तर. आपापल्या आवडी निवडी, प्राधान्य लक्षात घेऊन भविष्यात उत्तुंग भरारी घेत उज्वल यश संपादन करूया.
यात विद्यार्थी, नोकरदार वर्ग, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक आणि समस्त बंधू भगिनी यांनी नियोजन बद्ध पद्धतीने काम केले तर आनंद, द्विगुणित होऊन समाधान आणि शांतीची अनुभूती नक्कीच येईल.
🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा