गुरुवार, १७ एप्रिल, २०२५

1861. ब्रेनहेमरेज वर एक महत्त्वाचा संदेश

     ब्रेनहेमरेज वर एक महत्त्वाचा संदेश, कृपया वाचा आणि शेअर करा.
एका पार्टीत एक महिला हलकासा धक्का लागून किंचित तोल जाऊनही स्वतःला सावरते. तिने आजूबाजूच्या लोकांना सांगितले की, "काही नाही, नवीन बूटमुळे एका विटेला ठेच लागली."
(जरी काही लोकांनी ॲम्ब्युलन्स बोलवण्याची ऑफर दिली होती)
मित्रांनी तिला मदत करून स्वच्छ केले आणि नवीन प्लेटही आणून दिली. पण असे वाटत होते की ती पूर्णपणे बरी नाही ! संध्याकाळभर ती पार्टी एन्जॉय करत राहिली, परंतु नंतर तिच्या पतीचा फोन आला की तिला रुग्णालयात नेण्यात आले आणि त्याच रात्री तिचा मृत्यू झाला.  
खरं तर, त्या पार्टीदरम्यान तिला ब्रेन-हेमरेज झाला होता.
जर त्या ठिकाणी असलेल्या लोकांपैकी कोणीही त्याची वेळेत ओळख केली असती, तर आज ती महिला जिवंत असती!
ब्रेन-हेमरेजने प्रत्येकजण मरत नाही, पण काहींना आयुष्यभर अपंगत्व आणि असहाय्य जीवन जगावे लागते!
स्ट्रोकची लक्षणे ओळखणे खूप महत्त्वाचे आहे
केवळ एका मिनिटात तुम्ही स्ट्रोक ओळखू शकता:
न्यूरोलॉजिस्ट सांगतात की, जर स्ट्रोक आलेल्या व्यक्तीला तीन तासांच्या आत उपचार मिळाले, तर स्ट्रोकचा परिणाम पूर्णपणे उलटा (reverse) करता येऊ शकतो.
त्यामुळे सर्वात महत्त्वाचे आहे स्ट्रोकची त्वरित ओळख करून योग्य उपचार मिळवणे!
न्यूरोलॉजिस्टनी STR नावाची तीन महत्त्वाची सूत्रे सांगितली आहेत, जी लक्षात ठेवली तर आपण एखाद्याचे प्राण वाचवू शकतो.
ही तीन लक्षणे ओळखा (STR Test):
* S = Smile (त्या व्यक्तीला हसण्यास सांगा.)
* T = Talk (त्याला एक सोपे वाक्य बोलायला सांगा, जसे - 'आज हवामान छान आहे'.)
* R = Raise (त्याला दोन्ही हात वर उचलायला सांगा.)
जर वरील तीनपैकी एकही गोष्ट व्यवस्थित करता येत नसेल, तर त्वरित ॲम्ब्युलन्स बोलवा आणि न्यूरो-तज्ञ असलेल्या रुग्णालयात दाखल करा.
याशिवाय, एक महत्त्वाचे लक्षण:
त्याला जिभ बाहेर काढायला सांगा.
जर जीभ सरळ बाहेर न येता एका बाजूला झुकत असेल, तर तोदेखील स्ट्रोकचे लक्षण असू शकते.
ही माहिती शेअर करा आणि कोणाच्यातरी जीव वाचवा!
एक प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट म्हणतात की, हा संदेश वाचणाऱ्या प्रत्येकाने तो किमान १० लोकांना पाठवला तरीही कोणाच्यातरी जीवन वाचू शकते.
ही माहिती जनहितार्थ शेअर करा !
"वेळ गूंगा नाही, फक्त मौन आहे ! कोण तुमचा खरा आहे, हे वेळच सांगतो."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...