Group मधील सदस्यांनो
उगीच रुसू नका
दुसऱ्याने पाठवलेले मॅसेज
खसकन पुसू नका
उगीच रुसू नका
दुसऱ्याने पाठवलेले मॅसेज
खसकन पुसू नका
Whats app वरचा संवाद
करू नका बंद
माणसाशी बोलण्याचा
लागू द्या रे छंद
मान्य आहे प्रत्येकालाच
कामाचा लोड असतो
तरी सुद्धा " आपल्यांसाठी "
वेळ काढावा लागतो
संवादच खुंटला तर
आपलेपणा राहील का ?
मोकळा वेळ असल्यावर
तो चांगला जाईल का ?
दिवसातून कमीत कमी
एकदा हाजरी लावत जा
दुसऱ्याच्या मॅसेजला
रिप्लाय तरी देत जा
करमत नाही , करमत नाही
असं म्हणून उपयोग नसतो
संपर्कात राहणं हाच
त्यावर एक उपाय असतो
गुर्मी आणि अहंकाराचा
वारा बिल्कुल लागू नये
" मला कुणाचीच गरज नाही "
असे मुळीच वागू नये
कोणतंही संकट येऊ द्या
" मी माझा समर्थ आहे "
एकटाच सारं निपटून घेईल
हा माणसाचा भ्रम आहे
हाय-हॅलो करणारे
शेकडो परिचित भेटतील
खरं संकट आल्यावर
पटकन दूर लोटतील
आपलीच माणसं आपल्याला
येत असतात कामी
म्हणून नाती धरून ठेवावीत
तुम्ही आणि आम्ही!
🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा